LIVE BLOG | रमजानदरम्यान पहाटे पाच वाजता मतदानाची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली
सरकारने येत्या 15 दिवसात नक्षलवाद्यांचा बिमोड करावा अन्यथा आंदोलन सुरू करणार असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
ABP News Bureau
Last Updated:
05 May 2019 11:10 PM
रमजानदरम्यान पहाटे पाच वाजता मतदान होणार नाही, मुस्लिम संघटनांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली, कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याने निर्णय
संगीतकार गायक डॉ वसंतराव देशपांडे यांचा जन्मशताब्दी महोत्सव वसंतराव देशपांडे संगीत सभेतर्फे रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, गायक पंडित शंकर अभ्यंकर, गायिका फैय्याज,गायक सत्यशील देशपांडे आणि अच्युत गोडबोले यांनी वसंतरावांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. तर वसंतरावांचे शिष्य चंद्रकांत लिमये, गायिका नुपूर गाडगीळ, पद्मभूषण प्रभाताई अत्रे यांच्या संगीत मैफिलीने या महोत्सवात रंगत आणली.
लातूर : चेरा पाटीजवळ भीषण अपघात, पाच ठार, सहा जखमी
वाशीम: लग्न लावून गावाकडे परतत असताना अपघात,
दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर, हिंगोली ते कनेरगाव नाका रोडव कार झाडावर आदळल्याने अपघात
वाशीम: लग्न लावून गावाकडे परतत असताना अपघात,
दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर, हिंगोली ते कनेरगाव नाका रोडव कार झाडावर आदळल्याने अपघात
यवतमाळ : राज्य सरकारने येत्या 15 दिवसात नक्षलवाद्यांचा बिमोड करावा अन्यथा आम्ही हल्ल्याच्या ठिकाणापासून पुढे आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील आरंभा टोल नाक्यावर 20 लाखांच्या बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूसह ट्रक जप्त, 50 लाखावर मुद्देमाल जप्त, समुद्रपूर पोलिसांची कारवाई
हनुमानाबाबत वादग्रस्त पोस्ट, 30 जणांवर गुन्हा दाखल,
मुलगा आणि नातवावर गुन्हा दाखल झाल्याच्या धक्क्याने वृद्धाचा मृत्यू
गडचिरोली :
नक्षल्यांनी केली नागरिकाची हत्या,
भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मर्दहुर गावातील घटना,
डोंगा कोमटी वेडदा मृतकाचं नाव
हिंगोली : रात्री चोरट्यांनी नऊ दुकाने फोडली, हिंगोली मधल्या कळमनुरी तालुक्यातील बाळापूर, डोंगरकडा, वारंगाफटा या तीन गावात एकाच रात्री दुकानाचे शटर तोडून चोरी
मालेगाव : मालेगाव शहरातील ताश्कंदबाग या ठिकाणी एका बंगल्यात राहणाऱ्या वृध्द महिलेसह तिच्या मुलावर भरदिवसा दुपारी दोन वाजेच्या सुमारास पिस्तुलचा धाक दाखवत मारहाण करुन लाखोची लूट केल्याची घटना घडली आहे.
बेळगाव : रणरणत्या उन्हात रस्त्यावर बसून भाजीपाला,फळे आणि अन्य वस्तूची विक्री करणाऱ्यांना प्रेमाची आणि मायेची सावली स्माईल फाऊंडेशनने उपलब्ध करून दिली आहे. बिट द समर मोहिमेअंतर्गत स्माईल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील विक्रेत्यांना मदत केली. फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या आकाराच्या छत्र्या त्यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी दिल्या आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, एक वर्ष कैदेच्या शिक्षेची शक्यता, भाजपचा डाव असल्याची केजरीवालांची टीका
फनी चक्रीवादळाची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन केला,
ममता यांनी मोदींशी बोलणे टाळले,
दोन्ही वेळा ममता दौऱ्यावर असल्याचे उत्तर देण्यात आले
मुंबई : अंधेरी परिसरात एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग, गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती, अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : अंधेरी परिसरात एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग, गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती, अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
धुळे : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर चक्कर येऊन पडलेल्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, नाणे येथील ग्रामपंचायत शिपाई भुतेसिंग निंबा देवरे यांना 29 एप्रिलला भोवळ
धुळे : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर चक्कर येऊन पडलेल्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, नाणे येथील ग्रामपंचायत शिपाई भुतेसिंग निंबा देवरे यांना 29 एप्रिलला भोवळ
मुख्यमंत्र्यांना दुष्काळ निवारणाचे निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी थेट दुष्काळी भाग गाठला, मुंबईहून सांगलीतील आटपाडी गाठत दुष्काळी परिस्थितीची पाहणी
मुख्यमंत्र्यांना दुष्काळ निवारणाचे निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी थेट दुष्काळी भाग गाठला, मुंबईहून सांगलीतील आटपाडी गाठत दुष्काळी परिस्थितीची पाहणी
पिंपरीत 8 ते 9 जणांच्या टोळक्याची दोघांना बेदम मारहाण, हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु
मुंबईहून माथेरानला फिरायला गेलेल्या पर्यटक महिलेचा आठशे फूट खोल दरीत कोसळून मृत्यू, शनिवारची घटना, मृतदेह दरीतून बाहेर काढला
पुण्यात गुंजन टॉकीज चौकात पालिकेची ड्रेनेजची लाईन फुटली,
चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळा,
पालिका पाणीपुरवठा विभाग ड्रेनेजची पाहणी करुन पाणी बंद करण्याचा प्रयत्न करत आहे
पुण्यात गुंजन टॉकीज चौकात पालिकेची ड्रेनेजची लाईन फुटली,
चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळा,
पालिका पाणीपुरवठा विभाग ड्रेनेजची पाहणी करुन पाणी बंद करण्याचा प्रयत्न करत आहे
काश्मीर : अनंतनाग जिल्ह्यात भाजप नेत्याची हत्या,
गुल मोहम्मद मीर यांची दहशतवाद्यांकडून पाच गोळ्या झाडून हत्या
नाशिकच्या चांदवडमधील खैसवाडा येथे दरोडा टाकण्यासाठी गेलेले दरोडेखोर आणि ग्रामस्थांमध्ये हाणामारी, या हाणामारीत एका दरोडेखोराचा मृत्यू तर 5 ग्रामस्थ गंभीर जखमी
Background
1. राज ठाकरेंच्या सभांचा खर्च मागण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही, पु. ल. देशपांडेंच्या सभांचा दाखला देत शरद पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल
2. पाचव्या टप्प्यातल्या मतदानासाठी अमेठी, रायबरेलीतला प्रचार थंडावला, उद्या मतदान, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि स्मृती इराणींची परीक्षा
3. रोड शो दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर हल्ला, जीपवर चढून केजरीवालांना तरुणाकडून चापट, आप कार्यकर्त्यांनी हल्लेखोराला चोपलं
4. राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या इसमाला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण, अंबरनाथमधला प्रकार, उठाबशा काढतानाचा व्हीडिओ मनसेकडून व्हायरल
5. आजपासून तीन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज, नागपूरचा पारा 44 अंशांवर, हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
6. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सनरायझर्स हैदराबादवर चार विकेट्सनी विजय, केन विल्यम्सनची अर्धशतकी झुंज अपयशी