LIVE BLOG : पुणे विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा, स्पाइसजेटची सेवा विस्कळीत

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 30 Apr 2019 12:08 AM
नेशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जेईई मेन एप्रिल 2019 चा निकाल जाहीर. जानेवारी नंतर 7 ते 12 एप्रिल 2019 दरम्यान झाली होती परीक्षा.
खोपोलीजवळ द्रुतगती महामार्गावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात, तिघे जखमी,
मोठी हानी टळली, वाहतूक विस्कळीत
शिर्डी विमानतळावर धावपट्टीवरुन स्पाईस जेटचे विमान घसरले,
विमानातील सर्व प्रवासी सुखरुप, धावपट्टी सुरळीत करण्याचे काम सुरु
माटुंग्यातील बीग बाजारमध्ये आग, सर्व कर्मचारी सुखरुप, परिसरात धुराचं साम्राज्य
माटुंग्यातील बीग बाजारमध्ये आग, सर्व कर्मचारी सुखरुप, परिसरात धुराचं साम्राज्य
गोवा : ताळगाव पंचायतीवर माजी आमदार बाबूश मोन्सेरात गटाचे वर्चस्व, सर्व 11 प्रभागातील उमेदवार विजयी, आग्नेल कुन्हा सरपंच तर रेघा पै होणार उपसरपंच, बाबूश यांची घोषणा
जळगाव : शहरातील तांबापुरा परिसरात दोन गटात झालेल्या वादात तुफान दगडफेक, मध्यरात्रीच्या सुमारास घटना, दगडफेकीत सात जण जखमी, दंगल घडविल्याच्या कारणावरून पोलिसांनी 18 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला
सोलापूरचा पारा वाढताच, पारा पुन्हा 44.3 अंशावर, आजही पारा वाढण्याची शक्यता, प्रशासनातर्फे काळजी घेण्याचे आवाहन

गुंगीचं बिस्कीट देऊन प्रवाशाला लुटणाऱ्यांना अटक, कल्याण स्थानकात घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद, जीआरपी क्राईम ब्रँचने ठोकल्या 'बंटी बबली'ला बेड्या

पुणे : पुणे विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा, स्पाइसजेटची सेवा विस्कळीत, काल 11 वाजता दुबईला जाणारे विमान उड्डाण तांत्रिक कारणामुळे लेट,190 प्रवासी रात्रीपासून विमातळावर अडकले, असुविधांचा फटका
लातूरमध्ये बहीण भावाचा बुडून मृत्यू, जिल्ह्यातील हरीजवळगा या गावात शेततळ्यात पोहायला गेलेल्या बहीण भावाचा बुडून मृत्यू, सूरज माने (14) आणि मेघा माने (16) अशी मृत मुलांची नावं
भिवंडी : भिवंडी शहरातील नेहरूनगर परिसरात एका युवकावर धारदार चाकूने हल्ला करून हत्या, अजीम आयुब बाउद्दिन (21) असे मयत तरुणाचे नाव

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मतदानासाठी मतदारांना पैसा वाटत असल्याच्या कारणावरून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज
बीडमध्ये उष्माघाताने पोस्टमनचा मृत्यू, टपाल वाटप करुन घरी आलेल्या 38 वर्षीय पोस्टमन विक्रम भीमराव गायकवाड यांचा मृत्यू, बीडमधील बनसारोळा इथली घटना

Background

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान, महाराष्ट्रातील 17 मतदारसंघात तगडी फाईट, मावळमध्ये पवार कुटुंबाची तर नाशकात भुजबळांची प्रतिष्ठा पणाला

2. चौथ्या टप्प्यात देशभरातील 9 राज्यांच्या 71 जागांसाठी आज मतदान, सुमारे 13 कोटी मतदार 943 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार, 14 उमेदवार पीएचडीधारक

3. राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतःला मागासवर्गीय सांगत असल्याचा मायावतींचा आरोप, जातीवरुन प्रियांक गांधींचाही हल्लाबोल, तर जेटलींचा विरोधकांवर पलटवार

4. ममता, मायावती, चंद्राबाबू हे पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार, राहुल गांधींना अप्रत्यक्ष आव्हान देणारा शरद पवारांचा अंदाज, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

5. दिग्विजय सिंह यांनी हिंदू दहशतवाद जन्माला घातला, सुमित्रा महाजन यांची 'एबीपी माझा'ला स्फोटक मुलाखत, साध्वी प्रज्ञाची पाठराखण करताना हेमंत करकरेंवर गंभीर आरोप

6. राज ठाकरे म्हणजे लोकसभेसाठी महाआघाडीने आऊटसोर्स केलेले नेते, निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचं पहिल्यांदाच टीकास्त्र, लोकमत वृत्तपत्राला पंतप्रधानांची मुलाखत

7. अकोला आणि चंद्रपूर जगातील सर्वाधिक उष्ण शहर, पारा 47. 2 अंशांवर, परभणी, हिंगोलीतही पारा पंचेचाळिशी पार, कडाक उन्हात डोसा, ऑम्लेट आणि चपातीही भाजली

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.