LIVE BLOG : विधानसभेला राष्ट्रवादी जास्त जागांसाठी आग्रही

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या विचार सुरु, निर्णय मुख्यमंत्र्यांकडे, केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाबाबत ठरवतील, चंद्रकांतदादा पाटील लाईव्ह

ABP News Bureau Last Updated: 01 Jun 2019 10:31 PM
पुणे : राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या, वैयक्तिक कारणामुळे काल दुपारी कोथरूड येथील राहत्या घरी आत्महत्या, बँक स्ट्रोक प्रकारात 7 सुवर्णपदक विजेता
धुळे: स्पोर्ट्स बाईकवर स्वार तिघांनी दुचाकीस्वाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकून 12 लाखाची रक्कम चोरली
लातूरमध्ये शिक्षकांचं ठिय्या आंदोलन, बदलीचा प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन, दोन दिवसानंतरही घेतली नाही दखल
गोंदिया: मुर्कडोह गावातील नाल्यात लपवून ठेवलेलं नक्षल साहित्य जप्त
मुंबई : विधानसभेला राष्ट्रवादी जास्त जागांसाठी आग्रही, लोकसभेच्या निकालानुसार आगामी विधानसभा निवणुकीत काँग्रेसकडे जास्त जागांची मागणी
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना इडीची नोटीस, दीपक तलवार व्यवहारप्रकरणी कारवाई, 6 जूनला चौकशी
देशाचे गृहमंत्री कोल्हापूरचे जावई, अमित शाह यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत करणार : चंद्रकांतदादा पाटील
प्रफुल्ल पटेल यांना इडीची नोटीस, दीपक तलवार व्यवहारप्रकरणी कारवाई, 6 जूनला चौकशी होणार
शिवसेनेच्या माजी आमदाराने शिवसेनेच्या खासदाराला पाडलं, चंद्रकांत खैरेंच्या पराभवावरुन चंद्रकांतदादा पाटील यांचं वक्तव्य, मात्र रावसाहेब दानवेंनी जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केली नसल्याचाही दावा
#BREAKING
#शिर्डी : एक वर्षाच्या आतील आपत्यासह साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या पालकांना नोंदणी करावी लागणार, आजपासून अंमलबजावणी
मंदिर परिसरात शुक्रवारी पाच महिन्याची बेवारस मुलगी सापडली होती, त्यानंतर साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय
शिवसेनेला केंद्रात आणखी एक मंत्रिपद मिळू शकेल : चंद्रकांतदादा पाटील
पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत विश्वास होता, मात्र बारामतीचा अंदाज चुकला, पवारांची दमछाक करण्यात मात्र यश : चंद्रकांतदादा पाटील
विधानसभेसाठी शिवसेनेसोबतचा फॉर्म्युला बदलणार नाही : चंद्रकांतदादा पाटील
जागावाटपाचा निर्णय अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस घेतील, : चंद्रकांतदादा पाटील
राधाकृष्ण विखे पाटील यांनी अद्याप काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही : चंद्रकांतदादा पाटील
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या विचार सुरु, निर्णय मुख्यमंत्र्यांकडे, केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाबाबत ठरवतील : चंद्रकांतदादा पाटील
रावसाहेब दानवेच तूर्तास भाजप प्रदेशाध्यक्षपदी : चंद्रकांतदादा पाटील
मुंबईत चार तासांपासून राष्ट्रवादीच्या मॅरेथॉन बैठका, विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत खलबतं, विलिनीकरणाबाबत चर्चा झाली नसल्याची गणेश नाईक यांची माहिती
राजनाथ सिंह यांच्याकडून अमित शाह यांनी गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारला


आपण 52 खासदार आहोत, पण मी खात्री देतो की हे 52 खासदार भाजपविरोधात इंचा-इंचाची लढाई देतील, सत्ताधा-यांना विविध मुद्द्यांवर हैराण करायला ही पुरेशी संख्या आहे. आक्रमक राहा, आत्मपरीक्षण करा- राहुल गांधीचं काँग्रेस संसदीय दलाच्या बैठकीत वक्तव्य.
काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांची माहिती, काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत निर्णय
सोनिया गांधी काँग्रेसच्या संसदीय समितीच्या नेत्या होण्याची शक्यता, काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह उपस्थित
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची थोड्याच वेळात बैठक, मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चर्चा, शरद पवार, दिलीप वळसे पाटील, भास्कर जाधव, धनंजय महाडिक, छगन भुजबळ, सचिन अहिर, गणेश नाईक बैठकीसाठी दाखल
मध्य रेल्वेलवर टिटवाळा ते कल्याण दरम्यान ‘पॉवर ब्लॉक’, लोकल, एक्स्प्रेस सेवेवर परिणाम, या ब्लॉकमुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
नायगावमधील बीडीडी चाळीतील एकाघराचा स्लॅब कोसळला, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडीडी चाळीच्या विकासाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे
देशातल्या सर्व शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांचं वार्षिक अनुदान, नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, शहिदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीतही वाढ

Background

 




    1. देशातल्या सर्व शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांचं वार्षिक अनुदान, नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, शहिदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीतही वाढ





 




    1. मोदींचे चाणक्य अमित शाह देशाचे नवे गृहमंत्री, राजनाथ सिंहांकडे संरक्षण तर सीतारमण यांच्याकडे अर्थ खात्याची धुरा, गडकरीच असणार देशाचे रोडकरी





 




    1. बेरोजगारीनं गाठला गेल्या 45 वर्षांतला उच्चांक, तर अखेरच्या तिमाहीत आर्थिक विकास दरही गडगडला, नव्या अर्थ मंत्र्यांसमोर मोठं आव्हान





 




    1. शिवसेनेच्या वाट्याला सलग तिसऱ्यांदा अवजड उद्योग मंत्रालयाचा भार, मर्जीप्रमाणे रेल्वे आणि उर्जा खातं न मिळाल्यानं मातोश्रीवर नाराजी, सुत्रांची माहिती





 




    1. लहान मुलांमधील लठ्ठपणाविरोधात एफडीएची मोहिम, मुंबईतल्या शाळांच्या कँन्टीनमधील जंकफूड रोखण्यासाठी नियमावली, 2200 शाळांना पत्र धाडलं





 




    1. विंडीजच्या ओशाने थॉमस आणि जेसन होल्डरच्या भेदक आक्रमणासमोर पाकिस्तानचा अवघ्या १०५ धावांत खुर्दा, विश्वचषकाच्या इतिहासात पाकची दुसरी नीचांकी धावसंख्या



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.