Lok Sabha Election LIVE BLOG | गडचिरोलीतील चार केंद्रांवरील मतदान पुढे ढकललं
नक्षलवादाची झळ सोसणारा गडचिरोली-चिमूर हा लोकसभा मतदारसंघ अनुसचित जमातीसाठी राखीव आहे.
ABP News Bureau
Last Updated:
11 Apr 2019 11:32 PM
चार महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन वर्ध्यातील दाम्पत्याने मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणं एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी शेख दाम्पत्याने पूर्ण केली. त्यामुळे 5 वर्षातून एकदा होणाऱ्या या उत्सवात सहभागी होत मतदानाचा हक्क त्यांनी बजावून दाम्पत्याने आई-वडिलांसह मतदानाचं कर्तव्यही पार पाडलं. जिल्हा परिषद येथे चार महिन्याच्या चिमुकलीला घेऊन येत त्यांनी मतदान केले. आफ्रिन शेख असे या महिलेचे नाव असून शहाबाज असे मुलीच्या वडिलांचे नाव आहे. सहकुटुंब 42 अंश सल्सिअस तापमानात या दाम्पत्याने चिमुकलीसह येत मतदान केलं.
गडचिरोलीत कालच्या स्फोटानंतर सुरु असलेल्या ऑपरेशन्स आणि सततच्या गोळीबारामुळे निवडणूक कर्मचारी वेळेत चार मतदान केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे इथलं मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे.

गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील तुमडीकसा मतदान केंद्रावरील मतदान पथकावर नक्षलवाद्यांचा गोळीबार, मतदान पथक बेस कॅम्पवर परतत असतानाची घटना, पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर नक्षलवादी जंगलात पसार
#BREAKING लोकसभा निवडणूक, महाराष्ट्र पहिला टप्पा मतदान : दुपारी 3 वाजेपर्यंत आकडेवारी, चंद्रपूर - 42.68 टक्के
#BREAKING गडचिरोलीत मतदान संपल्यानंतर नक्षलवाद्यांकडून हल्ल्या, सी सिक्सटी कमांडो पथकाचे तीन जवान जखमी, एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोदी परिसरातील घटना, बेस कॅम्पवर परतणाऱ्या नक्षलविरोधी सी सिक्सटी कमांडो पथकाला नक्षलवाद्यांनी केलं टार्गेट, नक्षलवाद्यांकडून आईडीचा स्फोट करुन गोळीबार
वर्धा 55.36 टक्के, नागपूर 53.13 टक्के, यवतमाळ-वाशिम 53.97 टक्के, भंडारा-गोंदिया 60.50 टक्के, चंद्रपूर 55.97 टक्के, रामटेक 51.72 टक्के, गडचिरोली 61.33 टक्के
विदर्भात तीन वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी : यवतमाळ-वाशिम 43 टक्के, वर्धा 44.67 टक्के, नागपूर 39 टक्के, भंडारा-गोंदिया 47 टक्के
लोकसभा निवडणूक, महाराष्ट्र पहिला टप्पा मतदान : दुपारी 3 वाजेपर्यंत आकडेवारी, रामटेक 45 टक्के
#BREAKING लोकसभा निवडणूक, महाराष्ट्र पहिला टप्पा मतदान : दुपारी 3 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी : नागपूर - 38.35 टक्के, वर्धा - 44.67 टक्के, यवतमाळ-वाशिम - 40 टक्के, गोंदिया-भंडारा - 47 टक्के
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४६.१३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे. वर्धा ४३.९०%, रामटेक (अ.जा.) ४४.५०%, नागपूर ४१.२५%, भंडारा-गोंदिया ४९.०५%, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) ५७%, चंद्रपूर ४६.३०% आणि यवतमाळ-वाशिम ४३.३५%.
लोकसभा निवडणूक, महाराष्ट्र पहिला टप्पा मतदान : दुपारी 3 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी : नागपूर - 39 टक्के, वर्धा - 44.67 टक्के, यवतमाळ - 40 टक्के
महाराष्ट्र पहिला टप्पा : दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 30.19 टक्के मतदान झाल्याची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती
वर्धा 30.22%, रामटेक 23.19%, नागपूर 27.47%, भंडारा-गोंदिया 32.02%, गडचिरोली-चिमुर 41.87%, चंद्रपूर 30.5%, यवतमाळ-वाशिम 26.09% मतदान
यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या युतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी वाशिम शहरातील राजेंद्र प्रसाद विद्यामंदिर येथे आपल्या मतदानाचा अधिकार बजावला
विदर्भातील मतदान टक्केवारी :
दुपारी एक वाजेपर्यंत 30 टक्के मतदान
▶️वर्धा 30.22 टक्के
▶️रामटेक - 23.29 टक्के
▶️नागपूर - 27.47 टक्के
▶️भंडारा-गोंदिया - 32.02
▶️चंद्रपूर - 30.5 टक्के
▶️गडचिरोली-चिमुर 42 टक्के
▶️यवतमाळ-वाशिम - 26.9 टक्के
यवतमाळ - 1 वाजेपर्यंत 26.9 टक्के मतदान
रामटेक - 1 वाजेपर्यंत 23.19 टक्के मतदान
रामटेक - 1 वाजेपर्यंत 23.19 टक्के मतदान
नागपूर - 1 वाजेपर्यंत 27.43 टक्के मतदान
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात आज मतदान मतदान पार पडत आहे. 'चला हवा येऊ द्या' फेम हास्य कलाकार अंकुर वाढवेने पुसद या आपल्या मूळगावी मतदान केलं.
वर्धा - 1 वाजेपर्यंत 30.22 टक्के मतदान
रामटेक - 12 वाजेपर्यंत 18.10 टक्के मतदान
विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघात सुरु असलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम बिघाडाबाबत 39 तक्रारी, प्रदेश काँग्रेसच्या वॉर रुमची यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल
विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघात सुरु असलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम बिघाडाबाबत 39 तक्रारी, प्रदेश काँग्रेसच्या वॉर रुमची यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल
गोंदिया : सामाजिक न्याय आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचं सपत्नीक मतदान, सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत मतदान
गोंदिया : सामाजिक न्याय आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचं सपत्नीक मतदान, सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत मतदान
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पत्नी अमृता फडणवीस आणि मातोश्रींसह मतदान
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं चंद्रपूरच्या हिंदी सिटी हायस्कूलमध्ये मतदान
रामटेक - 11 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान
नागपूर - 11 वाजेपर्यंत 18 टक्के मतदान
नागपूर - 11 वाजेपर्यंत 18 टक्के मतदान
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील सर्वात वयोवृद्ध मतदाराने मतदानाचा हक्क बजावला, 102 वर्षीय पुखराज बोथरा यांचं मतदान, पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून आजपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये न चुकता मतदान, नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
गडचिरोली : अतिदुर्गम अशा कसनसून पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्राजवळ सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला, यात कोणतेही नुकसान झाले नाही.
चंद्रपूर : सकाळी 11 वाजेपर्यंत 18.89 टक्के मतदान
गडचिरोली-चिमुर - सकाळी 11 वाजेपर्यंत 18.01 टक्के मतदान
वर्धा - सकाळी 11 वाजेपर्यंत 15.76 टक्के मतदान
भंडारा गोंदिया - सकाळी 11 वाजेपर्यंत 15.5 टक्के मतदान
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची सकाळी 11 पर्यंतची मतदानाची टक्केवारी 12.06 टक्के
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची सकाळी 11 पर्यंतची मतदानाची टक्केवारी 12.06 टक्के
गडचिरोली : वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज डॉ. राणी बंग आणि अभय बंग यांचं मतदान
गडचिरोली : वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज डॉ. राणी बंग आणि अभय बंग यांचं मतदान
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 'प्रहार' पक्षाच्या उमेदवार वैशाली येडे यांचं राजूर गावात मतदान
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 'प्रहार' पक्षाच्या उमेदवार वैशाली येडे यांचं राजूर गावात मतदान
रामटेक : 9 वाजेपर्यंत 4.9 टक्के मतदान
चंद्रपूर : 9 वाजेपर्यंत 5.35 टक्के मतदान
चंद्रपूर : 9 वाजेपर्यंत 5.35 टक्के मतदान
गडचिरोली चिमुरमधील भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार अशोक नेते यांचं मतदान
गडचिरोली चिमुरमधील भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार अशोक नेते यांचं मतदान
गडचिरोली चिमुरमधील काँग्रेस उमेदवार नामदेव उसेंडी यांचं मतदान
गडचिरोली चिमुरमधील काँग्रेस उमेदवार नामदेव उसेंडी यांचं मतदान
गडचिरोली : 9 वाजेपर्यंत 5.30 टक्के मतदान
नागपूर - 9 वाजेपर्यंत 9.33 टक्के मतदान
गोंदिया जिल्ह्यात 9 वाजेपर्यंत 8.61 टक्के मतदान
वर्धा लोकसभा मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 7.32 टक्के मतदान
वर्धा लोकसभा मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 7.32 टक्के मतदान
भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्नी वर्षा; कन्या पूर्णा, नियती आणि अवनी यांच्यासह गोंदिया येथे मतदानाचा हक्क बजावला.
भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्नी वर्षा; कन्या पूर्णा, नियती आणि अवनी यांच्यासह गोंदिया येथे मतदानाचा हक्क बजावला.
नागपुरातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचं मतदान
यवतमाळ वाशिम सकाळी 9 वाजेपर्यंत 6.31 टक्के मतदान
वाशिम जिल्ह्यात पहिल्या दोन तासात 4.74 टक्के मतदान
वर्धा लोकसभा मतदारसंघात सेवाग्राम, देवळी गावात मतदार यादीत घोळ, अनेक मतदारांची तक्रार, घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव, इतरांचे नाव नाही, ज्येष्ठ नागरिक एक तास नाव शोधून वैतागले
वर्धा लोकसभा मतदारसंघात सेवाग्राम, देवळी गावात मतदार यादीत घोळ, अनेक मतदारांची तक्रार, घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव, इतरांचे नाव नाही, ज्येष्ठ नागरिक एक तास नाव शोधून वैतागले
वर्धा मतदार संघात सेवाग्राम, देवळी गावात मतदारांच्या मतदारयादीत नाव नसल्याच्या तक्रारी, अनेक ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर पोहोचले, एक तास नाव शोधलं पण नाव नाही. कुणाच्या घरातील एक सदस्याचे नाव आहे पण इतरांचे नाही
वर्धा : मतदार संघात सेवाग्राम, देवळी गावात मतदारांच्या तक्रारी, मतदारयादीत नाव नाही
चंद्रपूर : भाजप उमदेवार हंसराज अहिर यांनी मतदानापूर्वी घेतले माता महाकालीचे दर्शन
यवतमाळ : माणिकराव ठाकरे यांनी हरु गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केले
वर्धा भाजप उमेदवर रामदास तडस यांनी सहकुटुंब केलं मतदान, तडस यांनी देवळी गावात मतदान केले
वर्धा भाजप उमेदवर रामदास तडस यांनी सहकुटुंब केलं मतदान, तडस यांनी देवळी गावात मतदान केले
नागपूरचे काँग्रेस उमेदवार नाना पटोले गणेश टेकडी मंदिरात आज सकाळी पूजा करताना
नागपूरचे काँग्रेस उमेदवार नाना पटोले गणेश टेकडी मंदिरात आज सकाळी पूजा करताना
नागपूरच्या धरमपेठ शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदान करणार आहेत. याठिकाणी VVPAT मशीन बंद असल्याने मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.
यवतमाळ-वाशिम : काँग्रेस उमेदवार माणिकराव ठाकरे मतदानासाठी रांगेत
गोंदिया : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल सहकुटुंब मतदान करण्यासाठी गोंदिया येथील NMD कॉलेजमध्ये दाखल
गोंदिया : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल सहकुटुंब मतदान करण्यासाठी गोंदिया येथील NMD कॉलेजमध्ये दाखल
भंडारा गोंदिया : भाजप उमेदवार सुनील मेंढे सपत्नीक मतदानाला
भंडारा गोंदिया : भाजप उमेदवार सुनील मेंढे सपत्नीक मतदानाला
यवतमाळ : भाजप बंडखोर आणि अपक्ष उमेदवार पीबी आडे यांचं मतदान
यवतमाळ : भाजप बंडखोर आणि अपक्ष उमेदवार पीबी आडे यांचं मतदान
यवतमाळ : भाजप बंडखोर आणि अपक्ष उमेदवार पीबी आडे यांचं मतदान
नागपूर : धरमपेठ शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदान करणार, याच मतदान केंद्रावर (पोलिंग बूथ नं 56) VVPAT मशिनमध्ये बिघाड, तासाभरापासून मतदार रांगेत
रामटेकमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि उमेदवार कृपाल तुमाने यांचं मतदान, उन्हाची तमा न बाळगता लोकशाहीच्या सणाला बाहेर निघा, मतदान करण्याचं आवाहन
भंडारा : भंडारा गोंदिया जिल्ह्यातील भाजप बंडखोर आणि अपक्ष उमेदवार राजेंद्र पटले यांचं सपत्नीक मतदान
भंडारा : भंडारा गोंदिया जिल्ह्यातील भाजप बंडखोर आणि अपक्ष उमेदवार राजेंद्र पटले यांचं सपत्नीक मतदान
चंद्रपूर : आनंदवनातील कुष्ठरोगी मतदानाचा हक्क बजावत आहेत
चंद्रपूर : कॉंग्रेस उमेदवार बाळू धानोरकर मतदान करण्यासाठी सपत्नीक लोकमान्य टिळक महाविद्यालयात दाखल
गोंदिया : गोंदियातील रामनगर मतदान केंद्रातील 276 बुथवर मतदान सुरु होण्याआधी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड
यवतमाळच्या मतदानकेंद्रांवर अनेक ठिकाणी 10 ते 15 मिनिटे उशिराने मतदान सुरु, सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी
यवतमाळच्या मतदानकेंद्रांवर अनेक ठिकाणी 10 ते 15 मिनिटे उशिराने मतदान सुरु, सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी
यवतमाळ : दादासाहेब मांडळे विद्यालयात मतदारांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत

विदर्भातील सात जागांसह देशभरातील 91 मतदारासंघांमध्ये मतदानाला सुरुवात
सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल
सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल
सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल
अवघ्या काही मिनिटांत मतदानाला सुरुवात होणार
Background
मुंबई : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, म्हणून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. यंदा सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील.
नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहिर, नाना पटोले यासारख्या दिग्गज नेत्यांसह 116 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहेत. चार जागांवर भाजप आणि काँग्रेसचा थेट सामना होणार आहे, तर दोन जागांवर काँग्रेस आणि शिवसेना भिडणार आहेत.
14 हजार 919 मतदान केंद्रांवर जवळपास 1.30 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी 66.71 लाख पुरुष, 63.64 लाख महिला, तर 181 तृतीयपंथी मतदार आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमुरमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत मतदान होईल.
पहिल्या टप्प्यात 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यातील प्रमुख लढती (07)
नागपूर - नितीन गडकरी (भाजप) VS नाना पटोले (काँग्रेस)
वर्धा - रामदास तडस (भाजप) VS चारुलता टोकस (काँग्रेस) VS अॅड. धनंजय वंजारी (वंचित बहुजन आघाडी)
यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (शिवसेना) VS माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
गडचिरोली-चिमुर अशोक नेते (भाजप) VS नामदेव उसेंडी (काँग्रेस)
चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप) VS बाळू धानोरकर (काँग्रेस)
रामटेक - कृपाल तुमाणे (शिवसेना) VS किशोर गजभिये (काँग्रेस)
भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे (भाजप) VS नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड मानला जाणाऱ्या नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सामना भाजपवर शरसंधान साधून काँग्रेसमध्ये घरवापसी करणाऱ्या नाना पटोले यांच्याशी होणार आहे.
नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडेंनी पोटनिवडणुकीत जिंकलेली भंडारा-गोंदियाची जागा परत मिळवण्यासाठी भाजपने सुनील मेंढे यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांच्याविरोधात पुन्हा कुकडेंना उमेदवारी न देता राष्ट्रवादीने नाना पंचबुद्धेंना तिकीट दिलं आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर चौथ्यांदा चंद्रपुरातून खासदारपदी विराजमान होण्यास उत्सुक आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळू उर्फ सुरेश धानोरकरांचं आव्हान आहे.
वर्ध्यात विद्यमान खासदार रामदास तडस यांना काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस टक्कर देणार आहेत. गडचिरोली-चिमुरमध्ये विद्यमान खासदार अशोक नेतेंसमोर काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांचं आव्हान आहे.
यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. तर बच्चू कडू यांच्या 'प्रहार'कडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आणि अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटिका वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पहिला टप्पा - (91)
आंध्र प्रदेश - 24
अरुणाचल प्रदेश - 2
आसाम - 5
बिहार - 4
छत्तीसगढ - 1
जम्मू काश्मिर - 2
महाराष्ट्र - 7
मणिपूर-1
मेघालय - 2
मिझोराम - 2
नागालँड-1
ओदिशा - 4
सिक्कीम - 1
तेलंगणा- 17
त्रिपुरा- 1
उत्तर प्रदेश - 8
उत्तराखंड - 5
पश्चिम बंगाल - 2
अंदमान निकोबार - 1
लक्षद्वीप - 1
संबंधित बातम्या :