LIVE BLOG | मुंबई इंडियन्स वि. हैदराबाद सनरायझर्स सामना बरोबरीत,

मसूद अजहरला दुसरा मोठा झटका, पाकिस्तानमध्येही मसूदला बंदी घालण्यात आली आहे.

ABP News Bureau Last Updated: 02 May 2019 11:48 PM
#IPL2019 मुंबई इंडियन्स वि. हैदराबाद सनरायझर्स सामना बरोबरीत, सुपरओव्हर नंतर ठरणार विजेता
चंद्रपूर : नाल्यात बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू, राजुरा तालुक्यातील मंगी नाला येथील आज दुपारची घटना, सार्थक अल्हाट (12), मंजीत सिंग (14) आणि शुभम गाजेरे (14) अशी मुलांची नावं, सर्व उप्परवाही येथील रहिवासी
चंद्रपूर : नाल्यात बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू, राजुरा तालुक्यातील मंगी नाला येथील आज दुपारची घटना, सार्थक अल्हाट (12), मंजीत सिंग (14) आणि शुभम गाजेरे (14) अशी मुलांची नावं, सर्व उप्परवाही येथील रहिवासी
रमजानच्या काळात पालिका रुग्णालयात नमाजाची   परवानगी हवी, समाजवादी पार्टीचे वैद्यकीय संचालकांना पत्र
यवतमाळच्या देऊळगाव वळसा येथे अन्नातून विषबाधा, चाळीस ते पन्नास रुग्ण दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल
यवतमाळच्या देऊळगाव वळसा येथे अन्नातून विषबाधा, चाळीस ते पन्नास रुग्ण दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल
डॉ. झाकीर नाईकविरोधात ईडीकडून पहिलं आरोपपत्र दाखल, 193.6 कोटींची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा मुंबईच्या पीएमएलए कोर्टात आरोप, एनआयएनं साल 2016 मध्ये आयआरएफवर बंदी घातल्यापासून नाईक भारतात परतलेला नाही
#BREAKING राजगड किल्ल्याच्या पायथ्याला विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला, उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर उपचार सुरु, 151 विद्यार्थ्यांचा समावेश
#BREAKING राजगड किल्ल्याच्या पायथ्याला विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला, उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर उपचार सुरु, 151 विद्यार्थ्यांचा समावेश
हिंगोली : हिंगोली स्टेशनच्या प्रवेशद्वारावर मोठा खड्डा, पूर्णा -अकोला रेल्वे लाईनवर पांगरा शिंदे रेल्वेस्टेशनच्या मुख्य प्रवेश द्वारावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळं प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे
#BREAKING राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीतील प्रचार सभांचा खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार, राज्य अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती
मसूद अजहरला दुसरा मोठा झटका, पाकिस्तानमध्येही मसूदला बंदी, संयुक्त राष्ट्राच्या आदेशानंतर पाकिस्तानकडून कारवाई
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होणार, सोमवारपासून पाणी कपात लागू, याआधी आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा सुरू होता
वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट येथे एसीबीच्या कारवाईत महिला वनरक्षकास लाच घेताना रंगेहाथ अटक, लता भोवते असं महिला अधिकाऱ्याचं नाव, मुरम भरलेला ट्रक बिट क्षेत्रातून जाऊ देण्यासाठी पाच हजाराच्या लाचेची मागणी 3 हजार रोख घेतांना अटक
#BREAKING मुंबई लोकल रेल्वेचे मोटरमनचा लोकेश इंदोरा यांचा मृत्यू, हार्बर लाईनवर शुक्रवारी बफरला धडकलेल्या लोकलचे मोटरमन होते लोकेश इंदोरा, मानसिक तणावातून मृत्यू झाल्याचा कामगार युनियन यांचा आरोप
#BREAKING मनसे कार्यकर्ता मारहाण प्रकरण, भाजप नगरसेवक विजय चिपळेकरसह 9 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयाने फेटाळला, सर्व आरोपी फरार
मराठा आरक्षणानुसार पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार, चंद्रकांता पाटलांची माहिती
वर्धा : हिंगणघाट येथील वनरक्षक लता भोवतेला लाच घेताना रंगेहाथ अटक, मुरम भरलेला ट्रक बिट क्षेत्रातून जाऊ देण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी, 3 हजार रोख घेताना अटक
#BREAKING यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांना मराठा आरक्षण लागू नाही, पुढील वर्षापासून हे आरक्षण लागू होणार, नागपूर खंडपीठाचा निर्णय
#BREAKING इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी डी.जी. वंजारा आणि एन. के. अमीन यांना मोठा दिलासा, माजी पोलीस अधिकाऱ्यांनी दोषमुक्तीसाठी केलेली याचिका गुजरात सीबीआय कोर्टानं स्वीकारली
2008 ते 2014 या कालावधीत यूपीए सत्तेत असताना तब्बल सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक, काँग्रेसचा दावा, तारीख-वार आणि ठिकाणाच्या तपशीलासह काँग्रेसचा दावा
महाराष्ट्र दिनाला गडचिरोलीत झालेल्या हल्याच्या पार्श्वभूमीवर गौतम नवलखा यांना अटकेपासून दिलेला दिलासा रद्द करा, राज्य सरकारची हायकोर्टात मागणी. गौतम नवलखा यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवर राज्य सरकार ठाम. मात्र १२ जूनपर्यंत अटकेपासून दिलेला दिलासा कायम
#CBSE Results : हन्सिका शुक्ला आणि करिष्मा अरोरा सीबीएसई परीक्षेत देशात पहिल्या,
दोघींनाही 499 गुण
अहमदनगर महापालिका अभियंत्यावर बूट फेकल्याचे प्रकरण, राष्ट्रवादीचे आमदार आणि लोकसभा उमेदवार संग्राम जगताप यांची शिवसेनेसह उपनेते अनिल राठोड यांच्यावर टीका, खोटे गुन्हे दाखल करण्याचा यांचा धंदा, अनेक कार्यकर्त्यांची घरं उद्ध्वस्त केली, मीही गेल्या वर्षी याला बळी, जगतापांचा दावा
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, सर्व झोनचे निकाल एकाचवेळी जाहीर
दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार, पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा घ्यावा, आचारसंहितेची अडचण नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
#BREAKING #GadchiroliNaxalAttack : निवडणुकीच्या धामधुमीनंतर राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक,
बैठकीत नक्षली हल्ला आणि दुष्काळावरील उपाययोजनांवर चर्चा होणार,
आचारसंहिता शिथिल झाल्यास मंत्री दुष्काळी दौरा करणार
मुळशी तालुक्यातील वळणे गावात सहलीसाठी गेलेले तिघेजण धरणात बुडाले,
एका मुलीच्या मृतदेह बाहेर काढण्यात यश,
दोन मुलांचा शोध सुरु
गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले अमृत भदाडे यांना श्रद्धांजली म्हणून आज, उद्या आणि परवा नागपूर जिल्ह्यातील त्यांच्या मौदा या गावातील व्यवहार बंद राहणार
गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले अमृत भदाडे यांना श्रद्धांजली म्हणून आज, उद्या आणि परवा नागपूर जिल्ह्यातील त्यांच्या मौदा या गावातील व्यवहार बंद राहणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर,
नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देणार
गडचिरोली जिल्ह्यात काल (1 मे) झालेल्या नक्षली हल्ल्यानंतर पोलिसांकडून परिसराची छाननी सुरु, पहाटेपासून पोलीस कुरखेडा परिसरात प्रत्येक रस्त्यावर लँड माईन, बॉम्ब पेरले गेले आहे का याची तपासणी करत आहेत.

Background

1. गडचिरोलीत नक्षलींनी घडवलेल्या स्फोटात 15 जवानांसह चालक शहीद, महाराष्ट्रावर शोककळा तर नेत्यांकडून राजकारणाला ऊत

2. बुरखाबंदी बाळासाहेबांची भूमिका असल्यानं त्यावर ठाम, सामनातल्या अग्रलेखावर राऊत कायम, तर बुरखाबंदी शिवसेनेची भूमिका नसल्याचं गोऱ्हेंचं स्पष्टीकरण

3. बारामती भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास उडेल, माझाच्या मुलाखतीत शरद पवारांचं विधान, तर पवारांना पराभवाची चाहूल लागल्याचा भाजपचा टोला

4. बेताल विधानांचा सपाटा लावणाऱ्या साध्वी प्रज्ञाची बोलती बंद, 3 दिवसांसाठी प्रचारबंदी, बाबरीसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई

5. अखेर संयुक्त राष्ट्राकडून मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाकिस्तान-चीनच्या आडमुठेपणाचा पराभव

6. ओडिशातल्या पुरीमध्ये 180 किमी प्रति तासाच्या वेगाने धडकणार फनी वादळ, संकटाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.