LIVE BLOG | जळगाव : भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

जळगावमधील अमळनेरमध्ये भाजपच्या मेळाव्यात जोरदार राडा झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष उद्य वाघ आणि समर्थकांनी पक्षाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केली.

ABP News Bureau Last Updated: 10 Apr 2019 11:35 PM

जळगाव : माजी आमदार बी एस पाटील मारहाणप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह सहा जणांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई : दंतवैद्यक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत 16 टक्के मराठा आणि 10 टक्के सवर्ण आरक्षण यंदातरी नको

, दोन विद्यार्थिनींची मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका, शुक्रवारी नागपुरात होणाऱ्या सुनावणीवर याचिकेचं भवितव्य अवलंबून

नागपूर खंडपीठाने तूर्तास पहिली यादी जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे.
अक्कलकोट येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेतून परतताना दुचाकीचा अपघात होऊन महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू,
बंदोबस्ताचे काम संपवून परतताना पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या आरती साबळे या महिला कर्मचार्‍याचा मृत्यू
जळगाव-अमळनेर येथील भाजपच्या सभेत राडा,
भाजपचे माजी आमदार बी. एस. पाटलांना भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांची मारहाण,
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांसमोरच राडा
गडचिरोलीतील एट्टापल्ली तालुक्यातील जांभीयाजवळ नक्षलवाद्यांकडून आयईडीचा स्फोट,
निवडणुकीच्या पूर्वसंध्येला नक्षलवाद्यांचा हल्ला,
निवडणूक काळात दहशत पसरविण्याचा प्रयत्न
गडचिरोलीतील एट्टापल्ली तालुक्यातील जांभीयाजवळ नक्षलवाद्यांकडून आयईडीचा स्फोट,
निवडणुकीच्या पूर्वसंध्येला नक्षलवाद्यांचा हल्ला,
निवडणूक काळात दहशत पसरविण्याचा प्रयत्न
अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांनी चौथ्यांदा अर्ज भरला. अर्ज भरताना गांधी कुटुंबातल्या सर्व सदस्यांची उपस्थिती. सोनिया,प्रियंका,रॉबर्ट वढेरा यांच्यासह रेहान, मियारा यांचीही उपस्थिती.
अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांनी चौथ्यांदा अर्ज भरला. अर्ज भरताना गांधी कुटुंबातल्या सर्व सदस्यांची उपस्थिती. सोनिया,प्रियंका,रॉबर्ट वढेरा यांच्यासह रेहान, मियारा यांचीही उपस्थिती.
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटावर निवडणूक आयोगाची बंदी, मोदींचा बायोपिक उद्या होणार होता प्रदर्शित
वैद्यकीय अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत दहा टक्के सवर्ण आरक्षण लागू करण्याविरोधातील याचिकांवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार, सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु असल्याने मुंबई उच्च न्यायालयाचा सुनावणी घेण्यास नकार
अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, कोर्टानेही सांगितलं चौकीदार चोर है, राहुल यांचा पुन्हा पंतप्रधानांवर निशाणा
अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, कोर्टानेही सांगितलं चौकीदार चोर है, राहुल यांचा पुन्हा पंतप्रधानांवर निशाणा
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला, लालूंची प्रकृती गंभीर नसल्याच्या सीबीआयच्या दाव्यानंतर कोर्टाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमूर्ती अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस,

कर्नाटक उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांची सर्वोच्च न्यायालयासाठी निवड,
नवी दिल्ली : राफेल विमान डील प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला धक्का, पुराव्याच्या कागदपत्रांना घेतलेला आक्षेप तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने फेटाळला
नवी दिल्ली : राफेल विमान डील प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला धक्का, पुराव्याच्या कागदपत्रांना घेतलेला आक्षेप तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने फेटाळला
मुंबई : वडाळा स्टेशनवरच मोनोरेल ठप्प, प्रवाशांचा खोळंबा, तांत्रिक बिघाडामुळे मोनो वडाळा ब्रिजजवळ बंद
राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. अहमदनगरमधील सभेत 12 मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील भाजप प्रवेश करणार आहेत. तर 17 मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलुजच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपप्रवेश करणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंना टोलनाक्यावर धक्‍काबुक्‍की, लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटपून निघालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अन्य अधिकार्‍यांना अर्वाच्च शिवीगाळ आणि धक्‍काबुक्‍की, टोल कर्मचारी विजय शामराव शेवडेसह एकावर गुन्हा
ठाण्यात इमारतीच्या 32 व्या मजल्यावरून उडी मारून 17 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना , प्रथमेश महेश परब असे मृत युवकाचे नाव

Background

1. छत्तीसगडच्या दंतेवाड्यात भाजप आमदारावर नक्षली हल्ला, आयईडी स्फोटात आमदाराचा मृत्यू, तर 5 जवान शहीद, दंतेवाड्यात उद्या पहिल्या टप्प्याचं मतदान

2. शहीद जवानांच्या नावाखाली मतं मागणाऱ्या मोदींवर कारवाई करा, काँग्रेसची मागणी, तर मुंबईत सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख असलेलं प्रचारसाहित्य जप्त

3. औसाच्या सभेत हातात हात घालून उद्धव ठाकरे आणि मोदींची एन्ट्री, उद्धव लहान भाऊ असल्याची मोदींची प्रतिक्रिया तर पंतप्रधानांकडून शरद पवारांवर पुन्हा निशाणा

4. राहुल गांधी आज अमेठीसाठी उमेदवारी अर्ज भरणार, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार

5. निवडणुकांच्या तोंडावर छापेमारीचं सत्र, काँग्रेस खासदार अहमद पटेल यांच्या अकाऊंटन्टच्या घरावर छापा, सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप

6. कलंक सिनेमातील नवं गाणं रिलीज, गाण्यात माधुरीचा दिलखेच अंदाज, 17 एप्रिलला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.