LIVE BLOG : राहुल गांधींनी अध्यक्षपद कायम ठेवावं, याबाबत ठराव : अशोक चव्हाण

देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

ABP News Bureau Last Updated: 30 May 2019 06:16 PM
निवृत्त परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता
निवृत्त परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता
राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक, प्रामुख्याने राहुल गांधींनी राजीनामा मागे घ्यावा, त्यांनी अध्यक्षपद कायम ठेवावं असा ठराव : अशोक चव्हाण
दिल्लीत शिवसेनेचा मराठी बाणा, शिवसेना खासदार अरविंद सावंत केंद्रीय मंत्रिपदाची मराठीतूनच शपथ घेणार
मोदींचा शपथविधी, उद्धव ठाकरे 6 वाजता राष्ट्रपती भवनासाठी रवाना होणार
राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? विरोधीपक्ष नेतेपदाच्या संख्याबळासाठी खटाटोप करण्याची चिन्हं
राहुल गांधी पोहोचले दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी दिल्लीत सहा जनपथवर शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात बैठक सुरू काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन नेत्यांमधील ही पहिली भेट
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

तडवी कुटुंबीयांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट

घेतली. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

मोदी-शाह यांच्याबाबत राज ठाकरे आणि आमची भूमिका एकच असल्याने ही भेट घेतली. भेटीत

कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. राज ठाकरे यांची मोदी-शहा यांच्याविरोधात भूमिका होती म्हणून समाधान व्यक्त करण्यासाठी भेट घेतल्याचं माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरे यांना सोबत घ्यायचं का याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असंही माणिकराव ठाकरे म्हणाले.

मुंबई : मंत्रिपदावरुन शिवसेनेत राडा सुरु झाला आहे. मंत्रिपद मुंबईत गेल्याने ग्रामीण भागातले खासदार नाराज आहेत. दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उरलेली मंत्रिपदं लोकांमधून निवडून आलेल्या खासदारांना द्या, राज्यसभेतल्या खासदारांना मंत्रिपद नको, अशी कुजबूज शिवसेना खासदारांमध्ये वाढली आहे. लोकसभेच्या खासदारांमुळे अनिल देसाई यांचा पत्ता कापला आहे. त्यामुळे उरलेलं मंत्रिपद कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात सुप्रीम कोर्टाने आणखी एक झटका दिला आहे. खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना दिलेलं 10% आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केलं आहे. कायदा बनण्याआधीच प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती, नव्या आरक्षणानुसार जागा वाढवल्या नव्हत्या या दोन कारणांमुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते पुढील एक महिना टीव्हीवरील चर्चेत (debate show) सहभागी होणार नाहीत, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांची माहिती. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसचा निर्णय

राष्ट्रीय सरंक्षण अकादमीच्या 136 वा दीक्षांत समारंभ आज पुण्यात पार पडत आहे. या सोहळ्यात एकुण 251 विद्यार्थ्यांच दीक्षांत समारंभ पडणार आहे. विज्ञान विभागाचे 114, कॉम्प्युटर सायन्स 82 तर 7 कला विभागाचे विद्यार्थी सहभागी होत आहेत. यावेळी विद्यार्थी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करतात. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एअर चीफ मार्शल बीएस धनुआ हे उपस्थित राहणार आहेत.
सांगली : सांगलीमध्ये रंगणार मोदींच्या शपथविधी सोहळा प्रसंगी 'चाय विथ शपथविधी सोहळा, सलगरे अमृततुल्य चहा कडून शपथविधी सोहळा प्रसंगी देण्यात येणार मोफत चहा
नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा दिल्लीत पार पडणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी देखील होत आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना देखील देशात कॅबिनेटमध्ये मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे.अरविंद सावंत भल्या पहाटे त्यांच्या शिवडी येथील घरून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासह त्यांचे कुटुंब देखील दिल्लीला रवाना झाले आहे.

मोदींसह भाजप अध्यक्ष अमित शाह उपस्थित
मोदींकडून अटलजींच्या समाधीला अभिवादन
थोड्याच वेळात मोदी शहीदांना नमन करणार

नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, शपथविधीआधी गांधीजी, अटलजी आणि शहीदांना अभिवादन
गांधीजींना राजघाटवर नमन केल्यानंतर अटलजींना अभिवादन करण्यासाठी मोदी अटलजींच्या समाधीस्थळाकडे
गांधीजींना राजघाटवर नमन केल्यानंतर अटलजींना अभिवादन करण्यासाठी मोदी अटलजींच्या समाधीस्थळाकडे
आज नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार, थोड्याच वेळात राजघाटवर जाऊन गांधीजींना नमन करणार
आज दुसऱ्यांदा मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार, गांधीजींना नमन करण्यासाठी मोदी राजघाटवर

Background

1. आज संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, विरोधकांसह बिमस्टेकचे प्रमुख उपस्थित राहणार

2. जेटलींच्या निवृत्तीमुळे अर्थमंत्रीपद पियुष गोयलांना संधी मिळण्याची शक्यता, मोदींच्या इतर मंत्रिमंडळाची सर्वांनाच उत्सुकता

3. शिवसेनेकडून अरविंद सावंत यांना मंत्रिपदाची संधी, कुटुंबियांसह उद्धव ठाकरे दिल्लीत तर अधिवेशनानंतर अन्य मंत्री शपथ घेणार

4. लोकसभेतल्या पानिपतानंतर आघाडीत मोठी अस्वस्थता,  अनेक बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा, काँग्रेस नेत्यांकडून मात्र इन्कार

5. प्रकल्पाच्या मान्यतेसाठी केंद्रीय मंत्र्याकडून बॉलिवूडच्या 2 नायिकांची मागणी, सुब्रह्मण्यम स्वामींच्या ट्विटनं स्फोट, मंत्र्याची नावं मात्र गुलदस्त्यात

6. इंग्लंडमध्ये आजपासून आयसीसी विश्वचषकाची रणधुमाळी, यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये रंगणार सलामीचा सामना

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.