- Home
-
Election
-
Elections
Loksabha Election 2019 LIVE BLOG | राज्यातील दहा मतसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी

आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी अशा 13 राज्यांमधील 97 जागांवर आज मतदान होणार आहे.
ABP News Bureau
Last Updated:
19 Apr 2019 12:06 AM
राज्यातील दहा मतसंघात एकूण 62.43 टक्के मतदान
बुलडाणा - 62 टक्के, अकोला - 61.76 टक्के, अमरावती - 63.08 टक्के, हिंगोली - 63.38 टक्के, नांदेड - 62.97 टक्के, परभणी - 62.74 टक्के, बीड - 64.37 टक्के, उस्मानाबाद - 62.75 टक्के, लातूर - 62.02 टक्के, सोलापूर - 59.57 टक्के
राज्यात 10 जागांवर दुपारी पाच वाजेपर्यंत 57.22 टक्के मतदान झालं आहे. बुलडाणा - 57 .8 टक्के, अकोला - 54.45 टक्के, अमरावती 55.43 टक्के, हिंगोली - 60.69 टक्के, नांदेड - 60.88 टक्के, परभणी - 58.50 टक्के, बीड - 58.44 टक्के, उस्मानाबाद - 57.04 टक्के, लातूर 57.94 टक्के, सोलापूर - 51.98 टक्के = एकूण - 57.22 टक्के

वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात मतदान केलं. कृषीनगर भागातील पोदार इंटरनॅशनल शाळेतील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
परभणी : मतदान करतानाचे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या तिघांवर लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परभणीतील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनेकांनी मतदान करतानाचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले होते.
बुलडाणा - 46 टक्के, अकोला - 45 .39 टक्के, अमरावती - 45.63 टक्के, हिंगोली - 49.13 टक्के, नांदेड - 50.4 टक्के, परभणी - 45.53 टक्के, बीड - 46.29 टक्के, उस्मानाबाद - 46.13 टक्के, लातूर - 44.10 टक्के,
सोलापूर - 45 टक्के = एकूण मतदान - 46.63
हिंगोली - उन्हाचा पारा वाढल्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे ओस पडली आहेत. तसंच मतदारांची संख्याही हळूहळू कमी होऊ लागली आहे. ऊन कमी झाल्यानंतर मतदार घराबाहेर पडतील, असंच काहीसं चित्र सध्या हिंगोलीत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे.

बीड - मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचं मतदान
उस्मानाबाद - मतदानावेळी फेसबुक लाईव्ह करणाऱ्या चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड : विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचं मतदान
सोलापूर | प्रकाश आंबेडकर यांचाही ईव्हीएमवर आरोप, वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबल्यास कमळाला मत जात असल्याचा आरोप, तक्रार मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी मशीन सील केल्याची प्रकाश आंबेडकरांची माहिती

सोलापूर - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर दर्गा आणि मंदिरात दर्शनाल, सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात आंबेडकरांची हजेरी, मुस्लिम समाजातील प्रसिद्ध शाहहुजूरअली दर्ग्यालाही भेट, बसप नगरसेवक आनंद चंदनशिवेही उपस्थित
सकाळी 11 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
▶️लातूर -19.97 टक्के ▶️अकोला -16.95 टक्के

सोलापूर | वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबलं, तरी कमळालाच मतदान, प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांचा गंभीर आरोप

उस्मानाबाद : राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या प्रणव पाटीलचं मतदान करताना फेसबुक लाईव्ह
हिंगोली मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 16.95 % मतदान
अकोला : बाळापूर तालुक्यातील कवठा मध्ये एकाने ईव्हीएम मशिन फोडली, मशिन फोडणारी श्रीकृष्ण नावाची व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात, इव्हीएमला विरोध असल्यानं मशिन फोडल्याचा दावा

लातूर : शंभरी पार केलेल्या शेख मौला यांचं मतदान
लातूर : पीकविमा प्रश्नी आनंदवाडी येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, सव्वा दहा वाजेपर्यंत एकही मतदान नाही, 1174 मतदारांचा बहिष्कार

पंढरपूर : कॉंग्रेस आमदार भारत भालके यांचं मतदान

परभणी : मानवत तालुक्यातील शेवडीमध्ये मतदार आणि पोलिसांत जोरदार वाद, मतदान करुन केंद्रात थांबण्यावरुन वाद, पोलिसांची गाडी गावकऱ्यांनी फोडली
उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 6.99 टक्के मतदान
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 5 टक्के मतदान
लातूर : लातूर मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 9 टक्के मतदान
परभणी लोकसभा मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.3 टक्के मतदान
सजवलेल्या गाडीत येऊन 103 वर्षांच्या राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी केले मतदान , आतापर्यंत 17 वेळेस केले मतदान

हिंगोली : खासदार राजीव सातव यांनी कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला

अकोला : गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचं सपत्नीक मतदान, अकोल्यातील जठारपेठ भागातील महाराष्ट्र कन्या शाळा मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

लातूर - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क
नांदेड : सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे 7 टक्के मतदान

सोलापूर : भाजप उमेदवार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी बजावला मतदानाचा हक्क, अक्कलकोटमधील गौडगाव गावात डॉ. जयसिद्धेश्वर यांचं आपल्या 106 वर्षांच्या वडिलांसोबत मतदान, महास्वामींचं मौनव्रत असल्याने माध्यमांशी बोलणं टाळलं
नांदेड : लेबर कॉलनी येथे तीन मतदान केंद्र अचानक बदलली. ऐनवेळी मतदारांची धावपळ

हिंगोली : लोकसभेचे शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत पाटील यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
बीड: सकाळी 9 वाजेपर्यंत बीड मतदारसंघात 3.11 टक्के मतदान

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी बजावला मतदानाचा हक्क
सोलापूर : भाजपचे उमेदवार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी बजावला मतदानाचा हक्क, अक्कलकोटमधील गौडगाव गावात डॉ. जयसिद्धेश्वर यांनी केलं मतदान, आपल्या 106 वर्षांच्या वडिलांसोबत बजावला मतदानाचा हक्क
नांदेडमधील सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण 78 मशिनमध्ये बिघाडाच्या तक्रारी, मशिन बदलून मतदान सुरु
महाआघाडीचे स्टार प्रचारक तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यानी आपल्या मूळ गावी सावळा या गावात जाऊन मतदानाचा हक्क बजावला

परभणी : शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांचं मतदान

परभणी : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांचं मतदान

अमरावतीतील युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचं मतदानापूर्वी देवदर्शन

लातूर : दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कुटुंबीय मतदान केंद्रावर दाखल
अकोला : भाजप उमेदवार संजय धोत्रे यांचं मतदान

बंगळुरु : प्रख्यात अभिनेते आणि बंगळुरु मध्य मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रकाश राज यांचं मतदान

लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं लातूर शहरातील आदर्श कॉलनीतील मतदान केंद्रावर मतदान
बुलडाणा लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार बळीराम सिरस्कार यांचं अकोला जिल्ह्यातील पारस येथे मतदान

लातूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांनी त्यांचे मूळ गाव कासराळ येथे कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला

सोलापूर : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं सहकुटुंब मतदान
अकोला नजीकच्या गुडधी येथे व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड, अर्धा तासाच्या दुरूस्तीनंतर व्हीव्हीपॅट मशीन सुरु

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार ओम राजे निंबाळकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाआधी लातूरकरांची पाण्यासाठी वणवण, सकाळ सकाळी महिलांची पाण्यासाठी झुंबड, मात्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगाही लावल्या

नांदेड : जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचं पत्नीसह कामगार कल्याण मंडळ येथील सखी मतदान केंद्रावर मतदान

बीड : मोरेवाडी येथे चार मतदान केंद्रांवर सखी मंच बुथ स्थापना, केज मतदारसंघात अंबाजोगाई येथे चार आणि केज येथे एका बूथची सर्व जबाबदारी महिलाच घेणार, मतदान केंद्र अध्यक्षापासून सुरक्षा यंत्रणासुद्धा महिलाच सांभाळणार

सोलापूर : बुधवार पेठ परिसरातील वडार गल्ली येथील लक्ष्मण महाराज प्रशाला आणि हत्तुरे वस्ती येथील मतदान केंद्रावर अर्धा तास उशिराने मतदान सुरु
हिंगोली : हिंगोलीमधील सेनगाव तालुक्यातील आडगाव येथे बूथ क्रमांक दोनवर अर्धा तासापासून ईव्हीएम मशीन बंद, मतदार अर्ध्या तासापासून ताटकळत उभे

नांदेड : लग्नाआधी नवरदेव मतदानाला, जिल्हा परिषद शाळेतील कौठा या बुथवर सकाळी 6.30 वाजता नवरदेव हजर झाला, सात वाजता मतदान करुन यवतमाळला लग्नाला रवाना
लातूर : हरगुळ येथील मतदान केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रातील बूथ क्रमांक 23 मधील मतदानयंत्र एक मत दिल्यानंतर बंद पडलं, अधिकाऱ्यांकडून मतयंत्र सुरु करण्याचे प्रयत्न सुरु

गेल्या वेळी जितकी मोठी लाट होती, त्यापेक्षा जास्त चटके लोकांना बसले, त्यामुळे मतदारांना मोदी सरकारची जुमलेबाजी कळून चुकली : प्रणिती शिंदे

भाजपने पाच वर्षांत टीकेशिवाय काहीही काम केलं नाही, भीती वाटल्याने भाजपने उमेदवार बदलला : सुशीलकुमार शिंदे

लातूरच्या ग्रामीण भागात मतदान प्रकियेला सुरुवात, मतदानासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी
हिंगोली : सकाळी सात वाजता पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात. दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. हिंगोली लोकसभेसाठी सहा विधानसभा मतदारसंघात ही मतदान प्रक्रिया 1989 मतदान केंद्रावर पार पडत आहे . सकाळी सात वाजता पासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली आहे.

सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचं मतदान

सोलापुरात काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचं मतदान
दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात
Background
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान आज पार पडणार आहे. राज्यातील 10 मतदारसंघांसह देशभरातील 97 जागांसाठी मतदान होणार आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात आज मतदान होईल. सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, अशोक चव्हाण, प्रीतम मुंडे, आनंदराव अडसूळ यासारख्या दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे.
या टप्प्यातील सर्वाधिक उमेदवार बीड मतदारसंघात (36) असून सर्वात कमी उमेदवार लातूर मतदारसंघात (10) आहेत. याव्यतिरिक्त बुलडाणा मतदारसंघात 12, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी अशा 13 राज्यांमधील 97 जागांवर आज मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे
दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती
अकोल्यात तिरंगी सामना
अकोल्यात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रेंना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. तर काँग्रेसने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. 2014 मधील निवडणुकीत धोत्रेंनी हिदायत पटेल यांना पराभवाची धूळ चारली होती, त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी पटेल उत्सुक असतील. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर अशा दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यंदाही अकोल्यातील लढत तिरंगी होणार आहे. अकोल्यात गेल्या वेळी प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी होते.
सोलापुरातही तिहेरी लढत
भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट करत डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे नाही-नाही म्हणताना काँग्रेसकडून पुन्हा रिंगणात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची शिंदेंना संधी आहे. मात्र आंबेडकरांचं आव्हान तगडं ठरल्यास सोलापुरातही तिहेरी लढत होणार.
अमरावतीत पुन्हा अडसूळ विरुद्ध नवनीत राणा
शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ पुन्हा निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. नवनीत राणा आपल्या 'युवा स्वाभिमान पार्टी'कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र त्यांना महाआघाडीचा पाठिंबा आहे. त्यामुळे 2014 मधील हायव्होल्टेज ड्रामाची पुनरावृत्ती होणार, हे निश्चित.
नांदेडमधून काँग्रेसचा महाराष्ट्रातला एकमेव खासदार
गेल्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे अवघे दोन खासदार निवडून आले होते. दोघंही जण यंदा पुन्हा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यास अनुत्सुक होते. अखेर त्यापैकी एक असलेले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. तेही ना'राजी'नाम्याचं नाट्य झाल्यानंतर. खरं तर नांदेड हा अशोक चव्हाणांचा पारंपरिक मतदारसंघ. मात्र शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या प्रताप पाटील चिखलीकराची टक्कर त्यांना असेल. त्यामुळे काँग्रेसच्या एकमेव खासदाराला आपली जागा टिकवण्याचं आव्हान आहे.
विद्यमान खासदाराला 'बाद' करणारा उस्मानाबाद
उस्मानाबादेतून शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाडांना बाद करत ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादीकडून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकमेकांचे हडवैरी मानल्या जाणाऱ्या दोन भावांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. ओमराजे निंबाळकर यांनी 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर 2014 साली राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचा दारुण पराभव केला होता.
बीडचा सोपा गड
बीडचा गड भाजपसाठी तुलनेने सोपा मानला जातो. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीने बजरंग सोनावणे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.
बुलडाण्यातून शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे रिंगणात आहेत.
मराठवाड्यात चित्र काय?
परभणीतूनही शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश विटेकर मैदानात उतरले आहेत. लातूरमध्ये भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करत सुधाकरराव शिंगारे यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसने मच्छिंद्र कामंत यांना उतरवलं आहे. हिंगोलीतील काँग्रेसचे खासदार राजीव लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्यामुळे पक्षाने सुभाष वानखेडेंना उमेदवारी दिली. तर हेमंत पाटील यांना शिवसेनेने तिकीट दिलं आहे.
पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या विदर्भातील सात मतदारसंघांसह देशभरात 91 ठिकाणी मतदान पार पडलं होतं.
दुसरा टप्प्यात कोणत्या राज्यात किती मतदारसंघ (97)
आसाम - 5
बिहार - 5
छत्तीसगड - 3
जम्मू काश्मिर - 2
कर्नाटक - 14
महाराष्ट्र - 10
मणिपूर - 1
ओदिशा - 5
तामिळनाडू - 39 (सर्व)
त्रिपुरा - 1
उत्तर प्रदेश - 8
पश्चिम बंगाल - 3
पुदुच्चेरी - 1
संबंधित बातम्या :