LIVE BLOG : चंद्राबाबू नायडूंनी दोन दिवसात दोनवेळा घेतली शरद पवारांची भेट
चंद्राबाबू नायडूंनी दोन दिवसात दोनवेळा घेतली शरद पवारांची भेट
ABP News Bureau
Last Updated:
19 May 2019 11:12 PM
#BREAKING
सिल्वासा - पालघरजवळ महाराष्ट्राच्या सीमेशेजारील केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिलवासामधील मसाट भागातील मनिष केमिकल कंपनीला भीषण आग,
केमिकल्सच्या साठ्याचे स्फोट,
अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल,
आगीचे कारण अस्पष्ट
धुळे : काँग्रेसचे आमदार डी एस अहिरे यांच्या गाडीच्या धडकेत दोन भावांचा मृत्यू, धुळे-साक्री-पिंपळनेर रस्त्यावर धाडणे फाट्याजवळ इनोव्हा कार-मोटरसायकलची समोरासमोर धडक, आमदार अहिरे देखील जखमी असल्याची माहिती
पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 75.25 टक्के मतदान झाले.किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.या पोटनिवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लोकसभेच्या निवडणुकांबरोबर जाहीर केला जाणार आहे.
एकूण 22 हजार 482 पैकी 8 हजार 119 पुरुषांनी तर 8,799 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
हिंगोली : हिंगोलीमधील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला.
गोवा : पणजी पोटनिवडणुकीसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 31.93 टक्के मतदान
गोवा पणजी पोटनिवडणुकीत दुपारी 1 वाजेपर्यंत 45.78 टक्के मतदानाची नोंद
सातारा : पुणे-बंगळुरु महामार्गावर खंबाटकी घाटात अपघातात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बलेरो जीपची धडक, जखमींना उपचारासाठी खंडाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल
नवी मुंबई :
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळा घाटात दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी, रविवार असल्याने वाहनांच्या संख्येत वाढ, वाहतूक संथ गतीने सुरु
मोदीविरोधात शड्डू, चंद्राबाबू नायडू दोन दिवसात दोनवेळा शरद पवारांच्या भेटीला, राहुल गांधींचीही भेट
नवी मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळा घाटात दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी., रविवार असल्याने वाहणांच्या संख्येत वाढ, वाहतूक संथ गतीने सुरु
गोवा : पणजी पोटनिवडणूक, मतदान केंद्र 9 मधील मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबले, मशीन बदलण्याचे काम सुरु
नवी दिल्ली : चंद्राबाबू नायडूंनी गेतली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट, दोघांमध्ये जवळपास 20 मिनिट चर्चा, राहुल गांधींच्या भेटीनंतर चंद्राबाबू शरद पवारांच्या भेटीला, निकालाआधी चंद्राबाबूंकडून भेटीगाठींना वेग
गोवा : पणजी पोटनिवडणुकीसाठी पहिल्या 2 तासात 14.36% मतदान
कोल्हापूर : हातकणंगले वडगाव रोडवर भीषण अपघात, ट्रक आणि क्रूझरची समोरासमोर धडक, 8 जण गंभीर जखमी तर तिघांची प्रकृती चिंताजनक, पोलीस घटनास्थळी दाखल
केदारनाथ जवळील गुहेत रात्रभर ध्यानधारणा करुन नरेंद्र मोदी बाहेर, केदारनाथनंतर नरेंद्र मोदी बद्रीनाथला दर्शनासाठी जाणार
मुंबई : मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर मेगाब्लॉग, हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा
नाशिक : सप्तश्रुंगी गडावर पाण्याचा टँकर 200 फूट दरीत कोसळून चालक गंभीर जखमी, चालकाचा ताबा सुटल्याने सिमेंटचा कठडा तोडून टँकर दरीत, जखमी चालकावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
Background
राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. केदारनाथच्या चरणी लीन झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा रात्रभर गुहेतच मुक्काम, पराभवाची कल्पना आल्यानं मोदींकडून देवाचा धावा, विरोधकांचं टीकास्त्र
2. लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज 8 राज्यातल्या 59 जागांसाठी मतदान, पंतप्रधान मोदींसह, योगी आदित्यनाथ, ममतांची मोठी परीक्षा, अभिनेतेही आखाड्यात
3. नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी घेतली राहुल गांधी, शरद पवार, मायावती आणि अखिलेश यादवांची भेट
4. हिंदू शब्द प्राचीन धर्मग्रंथात नसून तो मुघलांनी दिला, अभिनेता कमल हसनचे वादग्रस्त वक्तव्य, कमलच्या ट्वीटवरुन नव्या वादाला तोंड
5. मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सरसावले, अध्यादेशाला हायकोर्टात आव्हान देणार, राज्यपालांनाही पत्र
6. मान्सून भारताच्या वेशीवर, अंदमान-निकोबारसह बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला.. तर 25 मे पर्यंत मराठवाडा, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज