LIVE BLOG : आचारसंहिता भंग प्रकरणी राष्ट्रवादीविरोधात तक्रार

मुंबई : आचारसंहिता भंग प्रकरणी राष्ट्रवादी पक्षाविरोधात मरिन ड्राईव्ह पोलिसात तक्रार दाखल, आचारसंहितेच्या काळात शासकीय निवासस्थानी जाहीरनामा प्रसिद्ध करणे गैरलागू असतानाही धनंजय मुंडेंनी नियम मोडल्याचा ठपका

ABP News Bureau Last Updated: 02 Apr 2019 10:08 PM
वर्धा : स्वावलंबी मैदानात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचीही सभा होणार, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली, तिथेच राहुल गांधीही संबोधित करणार
वर्धा : स्वावलंबी मैदानात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचीही सभा होणार, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली, तिथेच राहुल गांधीही संबोधित करणार
आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून निवड
बुलडाणा : निवडणूक नाकाबंदी दरम्यान खामगावमधील शिवाजीनगर पोलिसांनी 4 लाख 49 हजार रुपये पकडले, इंडिगो कारमधून रक्कम नेताना कारवाई, निवडणूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी, रक्कम बुलडाणा येथील बँकेमधून आणल्याची चालकाची माहिती
गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर
गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर
नागपूर : केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल जयदीप कवाडे यांच्याविरोधात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार, संपूर्ण महिला समाज आणि स्मृती इरानींचा जाहीर सभेत अपमान केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी
केवळ स्ट्रक्चरल ऑडिटरवर अवलंबून राहण्यापेक्षा पालिकेने स्वत:ची यंत्रणा तयार करावी, हायकोर्टाने सुनावलं,

सीएसएमटी पूल दुर्घटनेवरुन पालिकेच्या ढिसाळ कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे,

तुमच्या अभियंत्यांसह आयआयटी किंवा व्हीजोटीआयमधील तज्ञांची मदत का घेत नाही? हायकोर्टाचा पालिकेला सवाल
मुंबई : आचारसंहिता भंग प्रकरणी राष्ट्रवादी पक्षाविरोधात मरिन ड्राईव्ह पोलिसात तक्रार दाखल, आचारसंहितेच्या काळात शासकीय निवासस्थानी जाहीरनामा प्रसिद्ध करणे गैरलागू असतानाही धनंजय मुंडेंनी नियम मोडल्याचा ठपका
#पालघर : डहाणू तलासरी परिसरात 3.0 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
#पालघर : डहाणू तलासरी परिसरात 3.0 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
काँग्रेसचा आजचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असून ते कधीच पूर्ण होणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते जालन्यात बोलत होते. भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजपकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यानंतर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. खरंतर हा जाहीरनामा कालच प्रसिद्ध व्हायला हवा होता म्हणजे हे एप्रिल फूल आहे हे समजलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पालघर दौऱ्याला सुरुवात, युती होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले होते, आता त्यांनाच पाण्यात बुडवा, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश
सांगली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निश्चित,

भाजपाचे बंडखोर गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार, संध्याकाळी पाच वाजता अधिकृत घोषणा होणार : सूत्र
सांगली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निश्चित,

भाजपाचे बंडखोर गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार, संध्याकाळी पाच वाजता अधिकृत घोषणा होणार : सूत्र
गोवा : मांद्रे मतदारसंघातून भाजपतर्फे दयानंद सोपटे यांनी भगवती देवीचे आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप सरचिटणीस सदानंद तानावडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मुंबई महापालिकेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांचे अर्ज दाखल
स्थापत्य समिती मुंबई शहर - प्रीती पाटणकर, स्थापत्य समिती मुबई उपनगर - उपेंद्र सावंत, बाजार आणि उद्यान समिती - उमेश माने, आरोग्य समिती - अमेय घोले, विधी समिती - शितल म्हात्रे, महिला आणि बाल विकास - हर्षिला मोरे
आजपासून मुंबई, ठाण्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, ईशान्य मुंबईचा तिढा अजूनही कायम, तर मनोज कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे पक्षाची सूचना, संसदीय केंद्रीय बोर्ड करणार अंतिम निर्णय

चंद्रपूर : दोन मुलांना संपवून इसमाची आत्महत्या, पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने कृत्य, बल्लारपूर शहरातील हृदयद्रावक घटनेने शहर हळहळले. ऋषिकांत कडुपाले (वय 40 वर्ष), नारायणी (वय 5 वर्ष), कार्तिकी (वय 2 वर्ष) यांचा मृतांमध्ये समावेश, पोलिस तपास सुरु

भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी प्रचारासाठी आपली कंबर कसली आहे. आज सकाळी महानगरपालिका आवारातील बागेत ज्येष्ठ नागरिकांची त्यांनी भेट घेतली. नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बागेत सकाळी शहरातील नागरिक व्यायाम, योगा करायला येतात. त्यांच्यात सहभागी होत शिवाचार्यांनी योगासनंही केली.

नाशिक : पेठरोडवरील हॉटेल राऊ चौफुलीवर द्राक्षाने भरलेल्या पिकअपची पोलिसांच्या दुचाकीला धडक, मध्यरात्री झालेल्या या अपघातात म्हसरुळ पोलिस ठाण्याचे नंदू जाधव आणि राजेश लोखंडे हे दोन बीट मार्शल गंभीर जखमी

औरंगाबाद : सुभाष झांबड यांना काँग्रेसकडून बी फॉर्म नाही, मात्र अर्जात राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार असा उल्लेख, 4 एप्रिलपर्यंत बी फार्म देण्याची मुदत, तर अब्दुल सत्तार राधाकृष्ण विखे पाटलांच्या भेटीला, सर्व घडामोडींमुळे औरंगाबाद काँग्रेस उमेदवार बदलण्याच्या चर्चांना उधाण
नागपूर : पंजाबराव धोबे या वृद्ध व्यक्तीचा उष्माघातेने मृत्यू झाल्याची शक्यता, धोबे यांचा मृतदेह काल संध्याकाळी नंदनवन परिसरात फूटपाथवर आढळून आला, पोलिसांकडून सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद

Background

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. लोकसभेसाठी पुण्याच्या काँग्रेस उमेदवाराचा सस्पेन्स संपला, मोहन जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब, पुण्यात आता बापट विरुद्ध जोशी लढत
2. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी अर्ज भरायला आजपासून सुरुवात, गिरीश बापट, रावसाहेब दानवे, गोपाळ शेट्टींसह उदयनराजेही अर्ज दाखल करणार, ईशान्य मुंबईच्या भाजप उमेदवाराचा मात्र पत्ता नाही
3. आमदार जोगेंद्र कवाडेंचा मुलगा जयदीप कवाडेचं स्मृती इराणींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, नागपुरात नाना पटोलेंच्या प्रचारसभेतला प्रकार
4. चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री, कोल्हापुरात राजू शेट्टींचा घणाघात, भाजपच्या वळचणीला सव्वाशे कारखानदार असल्याचीही टीका
5. बीडमधल्या चिंचाळा तांडा गावात दोन चिमुरड्यांचा हृदयद्रावक मृत्यू, पाण्याचे ड्रम ठेवलेली बैलगाडी अंगावर उलटली, मराठवाड्यात पाणीसंकट तीव्र
6. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी विजय, दिल्लीचा डाव 152 धावांत आटोपला, पंजाबच्या सॅम करनची हॅटट्रिक

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.