- Home
-
Election
-
Elections
LIVE BLOG | अहमदनगरमध्ये मजुरांची चार घरं आणि गोठ्याला आग, आगीत सहा वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू
LIVE BLOG | अहमदनगरमध्ये मजुरांची चार घरं आणि गोठ्याला आग, आगीत सहा वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
ABP News Bureau
Last Updated:
23 Apr 2019 11:14 PM
काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपमांच्या प्रचारसभेत सहभागी झालेल्या पैलवान नरसिंह यादव निलंबित, नरसिंह यादव मुंबईत सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत
अभिनेते सनी देओल यांना भाजपकडून पंजाबच्या गुरदासपूरमधून उमेदवारी जाहीर, तर किरण खेर यांना चंदीगढमधून उमेदवारी
पंढरपूर : मंगळवेढा शहरातील कृष्ण तलावात आठ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू
ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना 3 मे रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश, आयसीआयसीआय-व्हिडिओकॉन प्रकरणी समन्स
मुंबई : मुंबई सागरी किनारा महामार्ग प्रकल्प रखडला, तीन जूनपर्यंत कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामावरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम, पर्यावरण संवर्धनाच्या मुद्यावर हायकोर्टाची स्थगिती
श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी 'आयसिस'ने स्वीकारली
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातल्या वरोरा नाका चौकात आदिवासी समाजाकडून निदर्शने, काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध, काँग्रेस नेत्यांच्या पोस्टरला चपला मारून आणि थुंकून व्यक्त केला राग
अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भगवती गावात मजुरांची चार घरं आणि गोठ्याला आग, या आगीत सहा वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू, दोन शेळ्यांचाही मृत्यू
'मुका'मोर्चा कार्टून प्रकरणी 'सामना'चे संपादक संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध वॉरंट
'मुका'मोर्चा कार्टून प्रकरणी 'सामना'चे संपादक संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध वॉरंट
2002 च्या गुजरात दंगलीतील पीडित बिल्किस याकूब रसूल (बिल्किस बानो) 50 लाख रुपये नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश, या दंगलीमध्ये बिलकिस बानोसोबत सामूहिक अत्याचार झाला होता. या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेले IPS आर. एस. भगोरा यांचं 2 पोस्ट पदावनती करण्याची राज्य सरकारची शिफारस देखील मान्य करण्यात आली आहे. भगोरा 31 मे रोजी निवृत्त होत आहेत.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून अवमाननेची औपचारिक नोटीस, यापूर्वी नोटीस जारी न करता फक्त खुलासा मागितला होता, पुढील सुनावणी 30 एप्रिल रोजी राफेल फेरविचार याचिकेसोबत होणार
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत 16 टक्के मराठा आरक्षण लागू करण्याविरोधातील याचिकेवरील सुनावणी गुरूवारपर्यंत तहकूब
चंद्रपूर : जिल्हाध्यक्ष पदावरून सुभाष धोटे यांची हकालपट्टी होणार असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले संकेत
ठाणे : अखेर ठाण्यात सभेचा तिढा सुटला, ठाणे पालिका मुख्यालयासमोरील रस्ता सभा घेण्यासाठी दिला, ठाणे पालिकेनेच दिली परवानगी, आज होणारी उद्धव ठाकरे यांची सभा आणि 26 तारखेला शरद पवार यांची सभा देखील याच ठिकाणी होणार
Background
1. तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात14 मतदारसंघात आज मतदान, राजकीय मातब्बरांची परीक्षा, निवडणूक आयोगाकडून चोख व्यवस्था
2. देशात 15 राज्यांसाठी 117 जागांसाठी आज लढाई, राहुल, अमित शाह, मुलायम यांचाही मतदारांकडून फैसला, थोड्याच वेळात मोदींचं मतदान
3. तिसऱ्या टप्प्यात मोदी नामाची सुप्त लाट, सामनातून उद्धव ठाकरेंना विश्वास, साध्वी प्रज्ञावर मात्र टीकास्त्र
4. कोर्टानंही चौकीदार चोर है मान्य केल्याचं विधान करणाऱ्या राहुल गांधींची दिलगिरी, अवमान प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय सुनावणार
5. राज ठाकरे राहुल शेवाळेंविरोधातही जिंकणार नाही, मनोहर जोशींचा टोला, राज यांना निवडणूक लढवण्याचं आव्हान
6. साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी, दहशतवादाचे सावज ठरलेल्या 8 भारतीयांमध्ये जेडीएस नेत्यांचाही समावेश