LIVE BLOG : राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, तब्बल 40 मिनिटं चर्चा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 19 Feb 2019 11:07 PM
युतीच्या घोषणेनंतर नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तब्बल 40 मिनिटं दोघांमध्ये चर्चा, युतीवर केलेल्या टीकेनंतर भेटीला महत्त्व
जागावाटपानंतर सत्तेतही समांतर सन्मान मिळणार, मला शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा आहे, युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच शिवसैनिकांना संबोधलं
निवडणुकांच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता नऊवरुन 12 टक्क्यांवर
युती होणारच होती, यात काही आश्चर्य नाही, सत्तेची उब दोघांनाही सोडायची नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या शिवसेना-भाजपला कानपिचक्या, युतीला महाराष्ट्रात 45 काय, 48 जागा मिळतील, पवारांचा खोचक टोला
पुलावामातील शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी सांगली महापालिकेकडून दहा लाखांची मदत, पालिकेचे सर्व नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचं वेतन
शिवजयंतीच्या खर्चाला फाटा देत शहीद जवानांना मदत, राहुरी तालुक्यातील वळण गावचा निर्णय, शहरातून फेरी काढून निधी गोळा, शाळेतील विद्यार्थ्यांसह गावकरी सहभागी
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कारचा अपघात, मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर भाताणजवळ अपघात, एक प्रवासी गंभीर जखमी












दोन सूर्यकिरण विमानं कोसळली, बंगळुरुत वायुसेनेच्या कार्यक्रमादरम्यान दुर्घटना



दोन सूर्यकिरण विमानं कोसळली, बंगळुरुत वायुसेनेच्या कार्यक्रमादरम्यान दुर्घटना



दोन सूर्यकिरण विमानं कोसळली, बंगळुरुत वायुसेनेच्या कार्यक्रमादरम्यान दुर्घटना



अहमदनगर :
वादग्रस्त श्रीपाद छिंदमसह 70 जणांना एक दिवस शहरबंदी, श्रीपाद छिंदम, त्याचा भाऊ श्रीकांत याच्यासह 70 जणांना शहरात एक दिवस बंदीची नोटीस,
तोफखाना पोलिसांनी 50, कोतवाली पोलिसांनी 10 तर भिंगार कॅम्प पोलिसांची 10 जणांवर कारवाई




राज्यभरात आज शिवजयंतीचा उत्साह, शिवनेरी किल्ल्यावर आज शिवजन्मोत्सव सोहळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागरराव शिवनेरीवर जाणार

Background

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा



1. शिवसेना-भाजप युतीचं घोडं अखेर गंगेत न्हालं, लोकसभेला शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढवणार, तर विधानसभेसाठी मित्रपक्षांना जागा देत 50-50 चा फॉर्म्युला

2. युतीसाठी भाजपने पालघरच्या जागेवर पाणी सोडलं, तर व्यापक शेतकरी कर्जमाफी, नाणारची जागा बदलण्याची शिवसेनेची मागणी मान्य

3. स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिवसेना-भाजपसोबतच्या युती-आघाडी तोडा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, अशोक चव्हाणांचे जिल्हास्तरावर आदेश

4. तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, उस्मानाबादमधील भीषण अपघातात सोलापूरच्या सात जणांचा मृत्यू

5. पैशांच्या व्यवहारासाठी एनीडेस्क अॅप धोकादायक, आरबीआयची बँक ग्राहकांना सूचना, तातडीने अॅप अनइन्स्टॉल करण्याचे निर्देश

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.