- Home
-
Election
-
Elections
LIVE BLOG | सीएसएमटी पुल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांचं पहिलं आरोपपत्र कोर्टात सादर
LIVE BLOG | सीएसएमटी पुल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांचं पहिलं आरोपपत्र कोर्टात सादर
सीएसएमटी पुल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांचं पहिलं आरोपपत्र कोर्टात सादर
ABP News Bureau
Last Updated:
09 May 2019 11:32 PM
बारामती : राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना 50 कोटी रुपये खंडणीची मागणी, जानकर यांची क्लीप व्हायरल करुन बदनामीची धमकी देणाऱ्या 5 जणांना पोलीसांनी घेतले ताब्यात
अकोल्यातील राष्ट्रीय कुस्तीपटू शुभम मोरेश्वर कडोळेची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट
ठाण्यात मनसे-भाजपा कार्यकर्ते भिडले, मनसेने रस्त्यावर लावलेल्या शेतकरी ते ग्राहक थेट आंबा विक्री स्टॉलवरुन वाद, मनसे कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको, मनसे कार्यकर्त्यांकडून 'चौकीदार चोर है' च्या घोषणा, अखेर नौपाडा पोलिसांकडून लाठीचार्ज
सीएसएमटी पुल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांचं पहिलं आरोपपत्र कोर्टात सादर, ऑडिटर नीरज देसाईच्या भूमिकेसह अन्य प्राथमिक बाबींवर भर, अटकेत असलेल्या अन्य पालिका कर्मचाऱ्यांविरोधात लवकरच पुरवणी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता
औरंगाबाद : शहरातील रामानगर येथील कचरा डेपोला आग, कचरा डेपोतील किमान 100 ट्रक कचरा जाळून राख
ठाणे : कुख्यात खंडणीखोर, डी कंपनीचा सूत्रधार फजलू रेहमानला ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक, साबरमती कारागृहातून ताब्यात घेऊन केली अटक, फजलू साबरमती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता
पुणे : मुलीच्या कुटुंबीयांनी जावयावर पाच गोळ्या झाडल्या, आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबीयांचं कृत्य, जखमी तरुणावर उपचार सुरु, हिंजवडीमधील धक्कादायक घटना
नाशकात दुष्काळासंदर्भात आढावा बैठकीला सुरवात,
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक,
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दुष्काळ दौऱ्यानंतर महत्वाची बैठक
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली,
नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय कायम
,
यावर्षीची प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार होणार नाही,
कायदा होण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा करत काही विद्यार्थ्यांच्या वतीने ही याचिका दाखल केली होती
,
थोडक्यात या वर्षीच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणानुसार प्रवेश होणार नाहीत.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट झाला आहे. दररोज चोरीच्या घटनांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास भाऊसिंगजी रोडवरील महापालिकेच्या मुख्य इमारती शेजारी असणाऱ्या, योगीराज मोबाईल दुकानात चोरीची घटना घडली. चोरट्याने खिडकीतून दुकानात प्रवेश करत सुमारे तीन लाखांचे मोबाईल हँडसेट आणि 80 हजारांची रोख रक्कमेची चोरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने चोरट्याचा शोध घेत आहेत.
गडचिरोली : गडचिरोलीत पुन्हात नक्षल्यांचे अग्नितांडव, रस्त्याच्या कामावर असलेल्या दोन वाहनांची जाळपोळ, एटापल्ली तालुक्यातील घोटसुर येथील घटना, दहा दिवसात नक्षल्यांनी केलेली पाचवी घटना
गडचिरोली : गडचिरोलीत पुन्हात नक्षल्यांचे अग्नितांडव, रस्त्याच्या कामावर असलेल्या दोन वाहनांची जाळपोळ, एटापल्ली तालुक्यातील घोटसुर येथील घटना, दहा दिवसात नक्षल्यांनी केलेली पाचवी घटना
हयात नसताना राजीव गांधींवर टीका होणं चांगलं नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसंच नारायण राणे यांचं आत्मचरित्र मी वाचलेलं नाही, वाचल्यावर बोलेन, त्यांनी काय लिहिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अकोला : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात एका कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट. 6 मे रोजी याच कार्यालयात झाली होती किसनराव हुंडीवाले यांची हत्या. पोलीस घटनास्थळी दाखल.
पुणे : देवाची उरळीत साडी सेंटरला लागलेली भीषण आग तीन तासांनंतर आटोक्यात, आगीमुळे हे साड्यांचे गोडाऊन जळून खाक, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, आगीत पाच कामगारांचा गुदमरुन मृत्यू
नाशिक : समीर भुजबळ यांच्या आई हिराबाई मगन भुजबळ यांचं नाव भायखळा विधानसभा मतदारसंघात आढळलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी हिराबाई यांचं नाव नाशिकमध्ये न आढळल्याने भुजबळ कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी
प्रशासनावर आरोप केले होते. मागील सर्व निवडणुकीत हिराबाई भुजबळ यांनी नाशिकमध्येच मतदान केल्याने त्यांचं नाव भायखळ्यामध्ये कसं गेलं, असा सवाल भुजबळ कुटुंबीय विचारत आहेत.

सातारा : ठोंबरेवाडी येथे आगीत दोन घरे जळून खाक. घरातील संसारोपयोगी वस्तू,धान्य जळून सुमारे 15 लाखांचे नुकसान
सातारा : ठोंबरेवाडी येथे आगीत दोन घरे जळून खाक. घरातील संसारोपयोगी वस्तू,धान्य जळून सुमारे 15 लाखांचे नुकसान
वाशीम : मंगरूळपीर तालुक्यातील कारंजा रोडवरील शिवनी येथील एटीएमवर दरोडा, दोन दिवसाआधीच 15 लाख रुपये ATM मध्ये टाकण्यात आले असल्याची माहिती , पोलीस घटनास्थळी, डॉग स्कॉड युनिट रवाना
यवतमाळ: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रात्रीला भीषण आग लागली. शहरातील या मुख्य शाखेला रात्री 3 च्या सुमारास आग लागली. यात बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य जळून राख झालं आहे. सध्या आग विझविण्यात आली असली तरी शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या बँकेत नेमके किती नुकसान झाले याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही

पुणे | देवाची ऊरळी येथे साडीच्या दुकानाला भीषण आग, 5 कामगारांपैकी चार जणांचा मृत्यू
कोयनेचं पाणी आता कर्नाटकला देऊ नका, शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी राजीव गांधींकडून आयएनएस विराटचा वापर, मोदींचा गांधी घराण्यावर गंभीर आरोप, तर रॉबर्ट वाड्रांना तुरूंगात टाकण्याचा इशारा
2. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर जैशच्या 130 ते 170 दहशतवाद्यांचा खात्मा, इटालियन पत्रकार मॅरिनोच्या रिपोर्टमुळं पाक तोंडघशी,
3. चंद्रकांत पाटलांमुळं भाजपप्रवेश टळला, उद्धव ठाकरेंवरच्या गौप्यस्फोटानंतर राणेंच्या आत्मचरित्रातले नवे दावे उजेडात, राणेंची माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया
4. विदर्भात भारतीय हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी, उन्हाचा पारा 47 अंशावर जाण्याचा अंदाज
5. फायर एनओसी नसल्यानं ठाण्यातील 15 हॉस्पिटल सील, हायकोर्टाच्या आदेशानंतर अग्निशमन दलाची कारवाई, सततच्या अग्नितांडवानंतर कारवाईचा बडगा
6. अटीतटीच्या एलिमिनेटर सामन्यात दिल्लीचा हैदराबादवर 2 विकेट्सनी विजय, फायनलच्या तिकीटासाठी उद्या दिल्ली-चेन्नईचा मुकाबला