National Election Results Live Blog : लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Election Results 2019 Live : नरेंद्र मोदी 26 मे रोजी सत्ता स्थापनेचा दावा करणार

ABP News Bureau Last Updated: 23 May 2019 08:15 PM
लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर हॅण्डलवरुन 'चौकीदार' शब्द हटवला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर हॅण्डलवरुन 'चौकीदार' शब्द हटवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर हॅण्डलवरुन 'चौकीदार' शब्द हटवला

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून राजीनाम्याचा प्रस्ताव, अमेठीमधील पराभवानंतर मोठा निर्णय, येत्या आठवड्यात काँग्रेस समिती चर्चा करणार, सूत्रांची माहिती
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून राजीनाम्याचा प्रस्ताव, अमेठीमधील पराभवानंतर मोठा निर्णय, येत्या आठवड्यात काँग्रेस समिती चर्चा करणार, सूत्रांची माहिती
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधई यांनी अमेठीतील पराभव स्वीकारला. मात्र मतमोजणी अद्यापही सुरु

मी जनतेच्या मताचा आदर करतो, स्मृती इराणी यांचं अभिनंदन, अमेठीला प्रेमाने सांभाळा : राहुल गांधी
'अनाकलनीय', लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

'अनाकलनीय', लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विक्रमी विजय, 3 लाख 85 हजारांनी मोदी विजयी
सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे भाजपच्या यशाचं गमक, विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं पहिलं ट्वीट

पश्चिम बंगालमध्ये कमळाचा शिरकाव, तृणमूल काँग्रेसला 22 जागांवर तर भाजपला 18 जागांवर आघाडी
नरेंद्र मोदी 26 मे रोजी सत्ता स्थापनेचा दावा करणार, संध्याकाळी 6 वाजता संवाद साधणार, नरेंद्र मोदींनी 2014 ला 26 मे रोजी शपथ घेतली होती
भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु, भाजपने संध्याकाळी संसदीय बोर्डाची बैठक बोलावली, पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5.30 वाजता भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
माझा विजय निश्चित आहे, माझा विजय धर्माचा विजय असून अधर्माचा नाश होईल, भोपाळच्या जनतेचं मी आभार मानते, भोपाळच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची प्रतिक्रिया

भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु, भाजपने संध्याकाळी संसदीय बोर्डाची बैठक बोलावली, पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5.30 वाजता भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक | तेलुगू देशमचा धुव्वा उडण्याची शक्यता, वायएसआर काँग्रेसची मोठी आघाडी, वायएसआर काँग्रेस - 142, तेलुगू देशम 28, इतर - 1
ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संबित पात्रा 700 मतांनी आघाडीवर

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करत देशातील नागरिकांचे आभार मानले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपने एवढा मोठा विजय दिल्याबद्दल अभिनंदन"

अमेठीमध्ये भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी 7600 मतांनी आघाडीवर, राहुल गांधी पिछाडीवर

अमेठीमध्ये भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी 7600 मतांनी आघाडीवर, राहुल गांधी पिछाडीवर

सर्व 542 जागांचे कल हाती, भाजप+ 338, काँग्रेस+ 102, इतर 102 जागांवर आघाडीवर, एकटा भाजप 340 जागांवर पुढे
सर्व 542 जागांचे कल हाती, भाजप+ 338, काँग्रेस+ 102, इतर 102 जागांवर आघाडीवर, एकटा भाजप 340 जागांवर पुढे
विजयाआधीच भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञाचा जल्लोष
विजयाआधीच भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञाचा जल्लोष
पुरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संबित पात्रा पिछाडीवर
पुरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संबित पात्रा पिछाडीवर
कलांमध्ये भाजपला स्वबळावर बहुमत, देशात 277 ठिकाणी भाजप उमेदवार आघाडीवर
कलांमध्ये भाजपला स्वबळावर बहुमत, देशात 277 ठिकाणी भाजप उमेदवार आघाडीवर
भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह 20 हजार मतांनी आघाडीवर
भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह 20 हजार मतांनी आघाडीवर
वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी 20,000 मतांनी आघाडीवर, तर गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शाह 50,000 हजार मतांनी पुढे
वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी 20,000 मतांनी आघाडीवर, तर गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शाह 50,000 हजार मतांनी पुढे
आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीएने 300 जागांचा टप्पा पार केला, एनडीए+301, यूपीए+ 118, इतर 112 जागांवर आघाडी
आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीएने 300 जागांचा टप्पा पार केला, एनडीए+301, यूपीए+ 118, इतर 112 जागांवर आघाडी
पश्चिम बंगालमध्ये 20 जागांवर तृणमूल काँग्रेस, 6 जागांवर भाजप आणि 2 जागांवर आघाडीवर
पश्चिम बंगालमध्ये 20 जागांवर तृणमूल काँग्रेस, 6 जागांवर भाजप आणि 2 जागांवर आघाडीवर
रायबरेलीतून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी तर अमेठीतून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर
रायबरेलीतून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी तर अमेठीतून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर
पूर्व दिल्लीतून भाजप उमेदवार गौतम गंभीर आघाडीवर
पूर्व दिल्लीतून भाजप उमेदवार गौतम गंभीर आघाडीवर
सुरुवातीच्या कलानुसार, एनडीए 198, काँग्रेस 101, इतर 60 जागा
सुरुवातीच्या कलानुसार, एनडीए 198, काँग्रेस 101, इतर 60 जागा
अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी आघाडीवर तर राहुल गांधी पिछाडीवर
अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी आघाडीवर तर राहुल गांधी पिछाडीवर
गांधीनगर मतदारसंघातून भाजपचे अध्यक्ष अमित शाह 25 हजार मतांनी आघाडीवर
गांधीनगर मतदारसंघातून भाजपचे अध्यक्ष अमित शाह 25 हजार मतांनी आघाडीवर
कर्नाटकातून काँग्रेस उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे पिछाडीवर
कर्नाटकातून काँग्रेस उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे पिछाडीवर
सुरुवातीच्या कलानुसार, केरळच्या वायनाड मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आघाडीवर
सुरुवातीच्या कलानुसार, केरळच्या वायनाड मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आघाडीवर
थिरुवनंतपुरम मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार शशी थरुर पिछाडीवर
थिरुवनंतपुरम मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार शशी थरुर पिछाडीवर
एकीकडे मतमोजणीची धामधूम, दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सिंथेसायझर वाजवण्यात मग्न
भोपाळमध्ये भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आघाडीवर
लोकसभा निवडणूक 2019 : मतमोजणीला सुरुवात, पहिले कल हाती, एनडीए 6, यूपीए 2 जागांवर आघाडीवर
सर्व काँग्रेस उमेदवारांना शुभेच्छा, विजय आमचाच होता, नर्मदे हर : दिग्विजय सिंह

सर्व काँग्रेस उमेदवारांना शुभेच्छा, विजय आमचाच होता, नर्मदे हर : दिग्विजय सिंह

मी निकालाबाबत निश्चिंत आहे. भारताच्या निवडणुकीतील पारदर्शकतेची संपूर्ण जगात कौतुक होत आहे : पाटणा साहिब मतदारसंघाचे भाजप उमेदवार रविशंकर प्रसाद
दिल्ली : काँग्रेसच्याच बाजूने निकाल लागेल आणि सत्ता स्थापन करेल. राहुल गांधी पंतप्रधान होतील. दिल्लीतील प्रमुख लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे : काँग्रेस उमेदवार अजय माकन

दिल्ली : काँग्रेसच्याच बाजूने निकाल लागेल आणि सत्ता स्थापन करेल. राहुल गांधी पंतप्रधान होतील. दिल्लीतील प्रमुख लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे : काँग्रेस उमेदवार अजय माकन

मतमोजणीआधीच दिल्लीत भाजप कार्यालयाबाहेर ढोल-ताशांचा गजर
निवडणूक हा सामना आहे जो सर्वसामान्य भारतीयांनी जिंकला आहे : अजिंक्य रहाणे

एबीपी-नेल्सन एक्झिट पोलचा अंदाज

एबीपी-नेल्सन एक्झिट पोलचा अंदाज

वाराणसी : मतमोजणी सुरु होण्याआधी दशाश्वमेध घाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी यज्ञ, तर कानपूरमध्ये हनुमान आरती. दिल्लीतील भाजप मुख्यालयाबाहेर समर्थकांकडून हवन

Background

मुंबई : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सांगता आज 23 मे रोजी होणार आहे. देशभरातील 543 पैकी 542 मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी वाजता सुरुवात होणार आहे. अर्ध्या तासानंतरच कल हाती येण्यात सुरुवात होईल. सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस 2014 मधील आपल्या कामगिरीत सुधारणा करणारहे आज मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

11 एप्रिल ते 19 मे दरम्यान लोकसभेच्या 542 जागांच्या मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले होते. ही निवडणूक सात टप्प्यात पार पडली. या सात टप्प्यात 90.99 कोटी मतदारांपैकी जवळपास 67.11 टक्के मतदारांनी आपल्या मताचा वापर केला. देशात लोकसभा निवडणुकीसाठी झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 8040 उमेदवार मैदानात उतरले होते. त्यापैकी टॉप 10 श्रीमंत उमेदवारांची एकूण संपत्ती जवळपास 2,218 कोटी आहे.

निवडणूक लढणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव, अनेक केंद्रीय मंत्री यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

2019 लोकसभा निवडणुकीची वैशिष्ट्ये

- 29 राज्य 7 केंद्रशासित प्रदेश
- 39 दिवस चाललेली सात टप्प्यात पार पडलेली निवडणूक
- 8040 नशीब आजमावणारे उमेदवार
- तब्बल 91 कोटी 1 लाख मतदार, 47 कोटी 16 लाख पुरुष आणि 43 कोटी 84 लाख स्त्री मतदार तर 39 हजार तृतीयपंथी
- 10 लाख 38 हजार 96 मतदान केंद्र
- विक्रमी 67.10 टक्के मतदान

Abp Result 2019 | एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकालांचे अपडेट्स कसे पाहाल?| ABP Majha

देशात पहिल्यांदाच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी होणार असल्याने निकाल उशिरा येण्याची शक्यता आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटीही लावली असून सगळ्यांना याबाबत प्रशिक्षणही दिलं आहे. मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यावेळी इथे निवडणूक निर्णय अधिकारीउमेदवारनिवडणूक एजंटमोजणी एजंट उपस्थित असतील. शिवाय मतमोजणीची व्हिडीओग्राफीही होईल.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची मोजणी कशी होणार?

लोकसभा मतदारसंघनिहाय 22 पासून 40 पर्यंत मतमोजणीचा ईव्हीएम फेऱ्या होणार आहेत.

ईव्हीएमची एक फेरी पूर्ण होण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी लागेल.

यानंतर व्हीव्हीपॅटचा मोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 650 आणि जास्तीत जास्त 1250 मतदार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी. म्हणजे एकूण लोकसभा मतदारसंघातल्या 30 व्हीव्हीपॅटची मोजणी होईल.

चिठ्ठ्या टाकून व्हीव्हीपॅटची निवड होईल. व्हीव्हीपॅटचा एका मशिनच्या मोजणीला 45 मिनिटांचा कालावधी लागेल. उमेदवाराने आक्षेप घेतले तर हा कालावधी वाढेल. असा एकूण प्रत्यक्षात निकाल यायला 12 तासापासून 14 तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.

प्रादेशिक पक्षांमध्ये लढत

ही सार्वत्रिक निवडणूक असली तर काही राज्यांमध्ये मुख्य लढत प्रादेशिक पक्षांमध्ये आहे. काही राज्यात काँग्रेस आणि भाजप सामन्यातून बाहेर आहेत. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये मुख्य सामना द्रमुक आणि अन्नाद्रमुक यांच्यात आहे. आंध्र प्रदेशात टीडीपी आणि वायएसआर यांच्यात मुख्य सामना आहे. तर तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्ष टीआरएस सत्तेत आहे.

उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा यांचं महागठबंधन सत्ताधारी भाजपला आव्हान देत आहे.

देशात सात टप्प्यात असं झालं मतदान

11 एप्रिलपहिला टप्पा : 20 राज्यात 91 मतदारसंघात 69.61 टक्के मतदान झालं

18 एप्रिलदुसरा टप्पा : 13 राज्यात 95 मतदारसंघात 69.44 टक्के मतदान झालं

23 एप्रिलतिसरा टप्पा : 15 राज्यात 117 जागांसाठी 68.40 टक्के मतदान झालं

29 एप्रिलचौथा टप्पा : राज्यात 71 जागांसाठी 65.51 टक्के मतदान झालं

मेपाचवा टप्पा : राज्यात 51 मतदारसंघासाठी 64.16 टक्के मतदान झालं

12 मे सहावा टप्पा : राज्यात 59 जागांसाठी 64.58 टक्के मतदान झालं

19 मे सातवा टप्पा : राज्यात 59 जागांसाठी 65.16 टक्के मतदान झालं

संबंधित बातम्या

Loksabha Elections 2019 Results : मतदारसंघांचे राज्यनिहाय अचूक निकाल, कुठे आणि कसे मिळवाल?

निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज, व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांच्या मोजणीमुळे निकाल उशीरा

त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास बिगर भाजप सरकार स्थापण्याची विरोध पक्षांची तयारी

लोकसभा निवडणूक निकाल : 'माझा'च्या खास डायरीतून निकालाबाबत दिग्गजांचे एक्सक्लुझिव्ह अंदाज

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.