LIVE BLOG | आज दिवसभरात... 3 मार्च 2019

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 03 Mar 2019 08:37 PM
मुंबई : धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देण्यास आदिवासी संघटनांचा विरोध, राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध न करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर येत्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा संघटनांचा इशारा
सोलापूर : भाजपच्या बाईक रॅलीच्या आयोजकांवर जेलरोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, अनिल कंदलगी आणि आनंद बिरु यांच्यासह 100 ते 120 चालकांवर गुन्हा
नाशिक : ड्रेनेज साफ करताना 3 मजूर चेंबरमध्ये अडकले, एकाचा मृत्यू, शिवाजी स्टेडियममध्ये ड्रेनेज साफ करताना घडली घटना,
कोल्हापूर : यशवंत बँकेतील दरोड्याचा छडा लावण्यात कोल्हापूर पोलिसांना यश, आंतरराज्य बँक चोरी टोळीतील दोन आरोपींना अटक,

कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मुंबईतील ठाणे ,भिवंडी, नवी मुंबई, अंधेरी ,मरोळ या ठिकाणी केला होता तपास
कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत,
माणगावनजीक मांडवी एक्सप्रेस बंद पडली
,
गेल्या एक तासापासून गाडी माणगावनजीक बंद

अहमदनगर : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे दत्त देवस्थानच्या पुजाऱ्याची हत्या, कुशाबा तुळशीराम शिकारे या 55 वर्षाच्या इसमाची हत्या, अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून केली हत्या
पंढरपूर: एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना आता 750 रुपयाचा पॉकेट मनी देण्याची योजना सुरु केली असून या मुलांच्या परदेशी उच्च शिक्षणाचा खर्च देखील महामंडळ उचलणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पंढरपूर येथे सांगितले. महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी 1 लाखाची ठेव योजनेतून आतापर्यंत 1 हजार कर्मचाऱ्यांना लाभ झाल्याचेही रावते यांनी सांगितले.
डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाला उर्जित अवस्था आणण्यासाठी राज्यातील लालपरी आता LNG वर चालवण्याचा निर्णय झाला असून यामुळे महामंडळाला 1 हजार कोटी रुपयाचा फायदा होणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. LNG हा नैसर्गिक गॅस असून यामुळे प्रदूषण देखील कमी होणार आहे.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजप तर्फे आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजय बाईक रॅली काढण्यात येत आहे. नाशिक मध्य विधानसभेच्या वतीने आज सकाळी 10 वाजता भाजप कार्यालयापासून शहरात बाईक रॅली काढण्यात आली मात्र यात एकाही कार्यकर्त्याने हेल्मेट परिधान केलेले नव्हते.
दिल्ली- संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची भेट घेतली.
भामरेंनी अभिनंदन यांच्या तब्येतीची विचार केली
दिल्ली- संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची भेट घेतली.
भामरेंनी अभिनंदन यांच्या तब्येतीची विचार केली
पालघर : डहाणू तालुक्यातील पेठ गावातील जयेंद्र ठाकूर यांच्या गवत पावळींच्या गोडाऊनला आज मध्यरात्री लागली अचानक भीषण आग, आगीचे कारण अस्पष्ट , आगीत गोडाऊनसह संपूर्ण गवत पावळी जळून राख, लाखोंच नुकसान, बोईसर एमआयडीसी अग्निशमन दलाची एक गाडी घनटनास्थळी
ठाणे-भिवंडी मार्गावर कारने घेतला पेट, बॅटरीत बिघाड झाल्याने शॉर्टसर्किट होऊन भर रस्त्यात कारने पेट घेतला. एका वाहनचालकाने प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने यातील कार चालकाचे प्राण बचावले. भिवंडी येथील काल्हेर गावाच्या हद्दीत ठाणे-भिवंडी मार्गावर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे एक गाडी दाखल झाले असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.मात्र या दरम्यान या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती

Background

पाकिस्तानच्या सैन्यानं अभिनंदन यांचा मानसिक छळ केला, एएनआयच्या हवाल्यातून वृत्त, व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठीही दबाव टाकल्याची सुत्रांची माहिती

भारतीय जवानांवर विषप्रयोग करण्याचा पाकिस्तानच्या आयएसआयचा कट, गुप्तचर यंत्रणांची धक्कादायक माहिती, तर पश्चिम रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरही हाय अलर्ट

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ग्रामविकास खात्यात 13 हजार 514 जागांसाठी लवकरच मेगाभरती, पंकजा मुंडेंचा निर्णय

नाणार प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, अधिग्रहीत जमिनी परत करणार, नाणारवासियांकडून जल्लोष

एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू, सरकारचा महत्त्वाचा निर्णय, निवडणुकांच्या तोंडावर हालचालींना वेग

केदार जाधव आणि धोनीची 141 धावांची अभेद्य भागीदारी निर्णायक; हैदराबाद वन डेत भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी उडवला धुव्वा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.