LIVE BLOG : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन
ABP News Bureau
Last Updated:
17 Mar 2019 09:42 PM
मनोहर पर्रीकर प्रज्ञावंत,सुसंस्कृत, द्रष्टे राजकारणी:
राज्यपाल विद्यासागर राव :
महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
श्री मनोहर पर्रीकर हे समकालीन राजकारणातील अतिशय प्रज्ञावंत, सुसंस्कृत आणि द्रष्टे राजकरणी होते. गोव्याचे विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी प्रामाणिकपणा व सचोटीने कर्तव्य बजावले. त्यांना विकासाची दृष्टी होती आणि सामान्य जनतेच्या हिताची तीव्र कळकळ होती. मितभाषी असलेल्या पर्रीकर यांचे सर्व पक्षातील लोकांशी सलोख्याचे संबंध होते. अखेरपर्यंत कार्यशील राहणार्या पर्रीकर यांचे जीवन हा लोकसेवेला समर्पित कर्मयज्ञ होता. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक दैदीप्यमान तारा निखळला आहे,या शब्दात राज्यपाल विद्यासागर राव यांनी पर्रीकर यांच्याप्रती आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
देशाने एक महान सुपुत्र गमावला, प्रमाणिकपणा काय असतो हे पर्रिकरांनी दाखवून दिलंय, पर्रिकरांच्या प्रामाणिकपणामुळेच ते देशाचे संरक्षणमंत्री झाले
उरी हल्यानंतर पाकिस्तानवरच्या सर्जिकल स्ट्राईकच नेतृत्व केलय, पर्रिकर देशाचे आशास्थान होते, उद्धव ठाकरे यांची पर्रिकरांना श्रध्दांजली
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शिवसेना भाजपचा मोठा निर्णय, उद्या कोणताही युतीचा मेळावा होणार नाही , मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी घेतला निर्णय
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढणार नाही,
मनसेची भूमिका स्पष्ट,
मनसे कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष
माजी आमदार शंकर गडाख पोलिसात हजर
: पोलिसांकडून घराची झाडाझडती घेतल्यानंतर आज नेवासाचे माजी आमदार शंकरराव गडाख स्वतःहून पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेत हजर झाले. मात्र आज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं नाही. 2017 मध्ये नगर औरंगाबाद रोड वर शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनामुळे शंकरराव गडाख यांच्यावर नेवासा न्यायालयामध्ये खटला सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज असलेल्या अमरसिंह पंडित यांनी अखेर प्रचारसभेत स्वतः सहभागी होऊन बजरंग सोनवणे यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी केले. यावेळी अमरसिंह पंडित म्हणाले की इतरांनी आमची काळजी करण्याची गरज नाही माझा भाऊ भावनेच्या भरात निश्चित बोलला असेल जे झालं ते परवाच्या दिवशीच पुरतीच होतं.
लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माघार
निवडणुकीतून माघार घेत असल्याचे मनसेकडून पत्रक जारी
लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माघार
निवडणुकीतून माघार घेत असल्याचे मनसेकडून पत्रक जारी
एकनाथ खडसे यांच्या भाषणातील मुद्दे
- युती नसल्यानं भाजप-सेनेला नाईलाजानं एकमेकांसोबत जमवून घ्यावं लागलं होतं,
- आता युती झाल्याने नक्कीच यश मिळेल,
- उत्तर महाराष्ट्र हा युतीचा बालेकिल्ला,
- केलेल्या विकासकामांच्या जोरावर उत्तर महाराष्ट्रातल्या आठही जागा जिंकणार,
- कार्यकर्त्यांत असलेली कटुता आम्ही दूर करणार,
- दोन्ही पक्षांना युतीची आवश्यकता होती,
- मागील विधानसभा निवडणुकीत युती नसावी हा सामूहिक निर्णय होता,
- संघटनांची पाळंमुळं मजबूत आहेत,
नाशिकमध्ये युतीचा महामेळावा सुरु,
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित,
एकनाथ खडसेदेखील मेळाव्याला हजर
रायगड : शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांची घरवापसी, अनंत गिते यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश, गेल्या काही महिन्यांपूर्वी केला होता राष्ट्रवादीत प्रवेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकच्या हॉटेलमध्य दाखल, थोड्याच वेळात कार्यक्रमस्थळी होणार रवाना
BREAKING : गोव्यात काँग्रेसला भगदाड पडण्याची शक्यता, काँग्रेसचे 4 आमदार भाजपच्या वाटेवर, प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांचा दावा
अमोल कोल्हे यांनी आधी शिवाजी महाराज आणि आता संभाजी महाराजांची भूमिका साकारली. काही तथाकथित इतिहासकारांनी लिहिलंय ते वाचा. खऱ्या अर्थाने अमोल कोल्हेंनी हा इतिहास पुढं आणला : शरद पवार
मराठवाड्यातील आठही जागा युतीच्या निवडून येतील, मुख्यमंत्र्यांचा दावा
आम्ही हिंदूत्वसाठी एकत्र आलेले पक्ष आहोत : मुख्यमंत्री
खोतकर-दानवे फेविकॉलचा जोड होणार : मुख्यमंत्री
माझा आणि अर्जुन खोतकर यांच्यातला संघर्ष वैयक्तिक नव्हता : रावसाहेब दानवे
माझ्यावर जी जबाबदारी सोपवली, ती पार पाडेल : अर्जुन खोतकर
मी कडवट शिवसैनिक आहे दगा फटका करणार नाही : अर्जुन खोतकर
आमच्या जिल्ह्यात आणिबानी लागली होती, ती आज उठली : अर्जुन खोतकर
#BREAKING औरंगाबाद : शिवसेना-भाजपमधील बैठक संपली, जालन्यातून अर्जुन खोतकर माघार घेणार असल्याची सूत्रांची माहिती, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
#BREAKING औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे यांच्यात रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये बैठक सुरु, जालना लोकसभा निवडणूक उमेदवारीचा तिढा सुटण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे 'चौकीदार नरेंद्र मोदी' असे नवीन नाव, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देखील 'चौकीदार अमित शाह' असे नाव ठेवले आहे.
#BREAKING औरंगाबादमधील युतीच्या मेळाव्याला मित्र पक्षांना निमंत्रण नाही, आरपीआय, रासपसह इतर मित्र पक्षांना बोलावणे नाही, आजच्या मेळाव्याला फक्त भाजप आणि सेनेचे कार्यकर्ते सहभागी होणार
गडचिरोली : नाकाबंदीदरम्यान वाहनाने उडविल्याने पोलीस कॉन्स्टेबल केवलराम येलुरे यांचा मृत्यू, आरमोरी शहराजवळील घटना, दोघांना अटक.
गडचिरोली : नाकाबंदीदरम्यान वाहनाने उडविल्याने पोलीस कॉन्स्टेबल केवलराम येलुरे यांचा मृत्यू, आरमोरी शहराजवळील घटना, दोघांना अटक.
#BREAKING अहमदनगर : अहमदनगर-जामखेड रोडवर पोखरी फाटा येथे भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर चौघे जखमी, ट्रक आणि इर्टिगा गाडीची समोरासमोर धडक, मृतांमध्ये 2 पुरुष 1 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
नाशिक : महाराष्ट्र-गुजरात सीमेवर जिलेटिन कांड्या आणि डिटोनेटर स्फोटकांचा साठा जप्त, सटाणा-सूरत रस्त्यावर नाकाबंदीदरम्यान बाभूळणे गावाजवळ पाठलाग करुन पोलिसांची कारवाई, 2150 जिलेटिन कांड्या आणि 1750 डिटोनेटर जप्त, एकाला अटक तर एक आरोपी फरार
यवतमाळ : नाकेबंदीदरम्यान गाडीमध्ये आढळली 10 लाख 80 हजाराची रोकड, दोन जण ताब्यात, शिरपूर पोलिसांची कारवाई
#BREAKING भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आठ तास चालली, पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता
मुंबई : ग्रँटरोडमध्ये पाण्याच्या टाकीत पाच कामगार पडले, एकाचा बुडून मृत्यू तर चौघांवर नायर रुग्णालयात उपचार सुरु, पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व दुरुस्त करताना घडली घटना
न्यूझीलंडमधल्या मशिदीवरच्या हल्ल्यात 7 भारतीयांचा मृत्यू, अजूनही 2 जण गायब
With a very heavy heart we share the news of loss of precious lives of our 5 nationals in ghastly terror attack in #Christchurch Mr. Maheboob Khokhar Mr. Ramiz VoraMr. Asif VoraMs Ansi AlibavaMr. Ozair Kadir@kohli_sanjiv @MEAIndia @SushmaSwaraj 1/3— India in New Zealand (@IndiainNZ) March 16, 2019
Background
राज्यासह देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता, काल दिवसभर बैठकांचं सत्र, तरीही नावं गुलदस्त्यात
2. आमदार अर्जुन खोतकर मातोश्रीवरील बैठकीनंतरही लोकसभा लढण्यावर ठाम, आज औरंगाबादेत दोन्ही पक्षनेत्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता
3. मतदानाच्या 48 तास आधी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास मज्जाव, केंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना, आता सर्व पक्षांना दोन दिवसआधीपर्यंत जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागणार
4. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसे 19 मार्चला भूमिका स्पष्ट करणार, मोदींविरोधात शड्डू ठोकण्यासाठी राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता
5. हिंगोलीत पब्जी गेमचा नाद दोन तरुणांच्या जीवावर, रेल्वेरुळावर पब्जी खेळणाऱ्या दोघांना रेल्वेनं चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू
6. न्यूझीलंडमधल्या मशिदीवरच्या हल्ल्यात 7 भारतीयांचा मृत्यू, अजूनही 2 जण बेपत्ता, ऑस्ट्रेलियाच्या टेरेंटवर हत्येच्या आरोपांची निश्चित