Lok Sabha Elections 2019 : देशभरातील 117 जागांवर मतदान

Lok Sabha Elections 2019 : मतदानाच्या सात टप्प्यांमधील सर्वात मोठ्या या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

ABP News Bureau Last Updated: 23 Apr 2019 06:37 PM
बेळगावमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 58 टक्के मतदान
पाच वाजेपर्यंत देशभरात 61.31 मतदान,
आसाम - 74.05,
बिहार - 54.95,
छत्तीसगड - 64.03,
दादरा आणि नगर हवेली - 71.43,
दीव दमन - 65.34,
गोवा - 70.96,
गुजरात - 58.81,
जम्मू -काश्मीर - 12.46,
कर्नाटक - 60.87,
केरळ - 68.62,
महाराष्ट्र - 55.05,
ओदिशा - 57.84,
त्रिपुरा - 71.13,
उत्तर प्रदेश - 56.36,
पश्चिम बंगाल - 78.94

अभिनेता सनी देओलचा भाजपमध्ये प्रवेश,
देशाला नरेंद्र मोदींसारख्या नेतृत्वाची गरज आहे : सनी देओल
गोवा विधानसभा पोटनिवडणूक : शिरोडा मतदारसंघात 61.39 टक्के, म्हापशात 56.28 टक्के तर मांद्रे मतदारसंघात 64.91 टक्के मतदान
संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत अभिनेता सनी देओलचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
गोवा : दुपारी 3 वाजेपर्यंत उत्तर गोव्यात 58.31 टक्के, दक्षिण गोव्यात 56.93 टक्के मतदान, एकूण मतदान 57.63 टक्के
गोवा : दुपारी 3 वाजेपर्यंत उत्तर गोव्यात 58.31 टक्के, दक्षिण गोव्यात 56.93 टक्के मतदान, एकूण मतदान 57.63 टक्के
बेळगावात तीन वाजेपर्यंत 46.11 टक्के मतदान
संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत अभिनेता सनी देओलचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत अभिनेता सनी देओलचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत अभिनेता सनी देओलचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. मतदानाला प्रारंभ व्हायच्या वेळीच काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदारांना एक तासाहून अधिक काळ रांगेत तिष्ठत उभारावे लागले. काही केंद्रावर मतदान सुरु झाल्यावर तासाभरात मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी सहकुटुंब मतदान केले.चिकोडीचे भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांनी एकसंबा येथे सहकुटुंब मतदान केंद्रावर मतदान केले.बेळगाव लोकसभा मतदार संघात पस्तीसहून अधिक सखी मतदान केंद्रे असून या केंद्रावर सगळ्या कर्मचारी आणि पोलिसही महिलाच आहेत.केंद्राच्या बाहेर स्वागत कमान उभारण्यात आली असून फुगे लावण्यात आले आहेत.
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदानाचा हक्क बजावला, गांधीनगरमध्ये सहकुटुंब मतदान
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदानाचा हक्क बजावला, गांधीनगरमध्ये सहकुटुंब मतदान
बॉलिवूड अभिनेता सनी देओल थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार,
पंजाबच्या गुरुदासपूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता

आयईडी हे दहशतवादाचं शस्त्र आहे तर वोटर आयडी ही लोकशाहीची ताकद आहे, मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
आयईडी हे दहशतवादाचं शस्त्र आहे तर वोटर आयडी ही लोकशाहीची ताकद आहे, मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं मतदान

Background

Lok Sabha Elections 2019 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 13 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील एकूण 117 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या सात टप्प्यांमधील सर्वात मोठ्या या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. या टप्प्यात केरळ आणि गुजरातमधील सर्व जागांवर मतदान होणार आहे.

117 जागा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी 66 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 27 जागा जिंकल्या होत्या. उर्वरित जागा इतर विरोधी पक्ष आणि अपक्षांच्या खात्यात गेल्या होत्या.

या टप्प्यात गुजरातच्या सर्व 26 आणि केरळच्या सर्व 20 जागांसह आसामच्या चार, बिहारच्या पाच, छत्तीसगडच्या सात, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या 14-14, ओदिशाच्या सहा, उत्तर प्रदेशच्या दहा, पश्चिम बंगालच्या पाच, गोव्याच्या दोन,  दादरा नगर हवेली, दमन दीव आणि त्रिपुराच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यातील मतदानात सुमारे 18.56 कोटी मतदार आहेत. निवडणूक आयोगाने यासाठी 2.10 लाख मतदान केंद्र बनवले आहेत आणि कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. गुजरातच्या गांधीनगरमधून भाजपचे अध्यक्ष अमित शाह मैदानात आहेत. या जागेवर आधी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी निवडणूक लढवून लोकसभेच पोहोचले होते.

दुसरीकडे केरळच्या वायनाडमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवत असून इथे सगळ्यांच्या नजरा आहेत. काँग्रेस खासदार शशी थरुर केरळच्या थिरुवनंतपुरममधून पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. त्यांचा सामना भाजपने माजी राज्यपाल के राजशेखरन यांना तिकीट दिलं आहे.

कर्नाटकमध्ये ही काँग्रेस-जेडीएस युती सरकारसाठी परीक्षा आहे. उत्तर प्रदेशचे सपा नेते मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातील चार जणांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. मुलायम, त्यांचे दोन पुतणे धर्मेंद्र यादव आणि अक्षय यादव पुन्हा लोकसभेत जाण्यासाठी प्रयत्न करतील. यांच्याशिवाय सपाचे आझम खान आणि भाजप उमेदवार जया प्रदा यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

उत्तर गोव्यातून केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीपाद येसो नाईक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बिहारमध्ये पाच लोकसभा जागांसाठी मतदान होत असून त्यातील चार जागांवर विद्यमान खासदार पप्पू यादव (मधेपुरा), त्यांची पत्नी रंजित रंजन (सुपौल), सरफराज आलम (अररिया) आणि महबूब अली कैसर (खगड़िया) आहेत.

ओदिशाच्या सहा जागांसाठी मुख्य मुकाबला राज्यातील सत्ताधीश बीजद आणि भाजपा यांच्यात आहे. 2014 च्या निवडणुकीत या सगळ्या जागा बीजदच्या खात्यात गेल्या होत्या. पश्चिम बंगालच्या बालूरघाट, मालदा उत्तर, मालदा दक्षिण, जंगीपूर आणि मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसच्या तुलनेत भाजप आणि काँग्रेसचे उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.