- Home
-
Election
-
Elections
LIVE BLOG : इंदापूरमध्ये भीमा नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू
LIVE BLOG : इंदापूरमध्ये भीमा नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा
ABP News Bureau
Last Updated:
24 Feb 2019 11:46 PM
विशाखापट्टणम : भारत वि. ऑस्ट्रेलिया टी-20 सामना, अटीतटीच्या सामन्यात भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाने तीन विकेट्सने सामना जिंकला
INDvsAUS : ऑस्ट्रेलियासमोर 127 धावांचं आव्हान
#BREAKING इंदापूर : भीमा नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू, इंदापूर तालुक्यातील शहा गावातील घटना, सारिका अशोक (12 वर्षे) आणि पूजा काळे (10 वर्ष) मुलींची नावे
डोंबिवलीच्या टिळकनगर परिसरात दुकानाला भीषण आग, लाकूड आणि थर्माकॉलचं साहित्य असल्यानं आग भडकली, अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
मुंबई : उद्या सेना-भाजपच्या स्नेहभोजनाला घटक पक्षांचं चहापानाने उत्तर, घटक पक्षांच्या नेत्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण नसल्याने डावलल्याची भावना, महादेव जानकर यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर संध्याकाळी 5 वाजता घटक पक्षांची बैठक, महादेव जानकर, रामदास आठवले, सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांची वेगळी बैठक होणार
छत्तीसगड : मिस इंडिया ट्रांसजेंडर वीणा सेंद्रेचा काँग्रेसमध्ये प्रवेश
वंचित आघाडीला आम्ही सोबत घेण्यासाठी प्रयत्न करतो होतो पण यश आले नाही, मतविभाजन होऊन भाजप सेनेला फायदा होईल असं न करता महाआघाडीत यावं ही आमची विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे.
चंद्रकांत खैरे यांनी जप करुन आजार बरे होतात असे म्हंटल, मग बाळासाहेबांवर त्यांनी उपचार केले होते का?, जितेंद्र आव्हाड यांचं मुंबईत वक्तव्य
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळील हॉटेल दौलत समोर दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. यात 6 जण दगावले आहे तर 10 जण जखमी झाले आहे. जखमींना पिंपळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आयशर गाडीला हा अपघात झाला असून या गाडीतील सर्व जण हे चांवडच्या वडाळी-भोई येथील केंद्राई येथे कार्यक्रमासाठी येत होते.
ठाकरे घराण्याशी गद्दारी करणार नाही. काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्यांना काही अर्थ नसून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार, अर्जुन खोतकराचं स्पष्टीकरण.
ठाकरे घराण्याशी गद्दारी करणार नाही. काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्यांना काही अर्थ नसून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार, अर्जुन खोतकराचं स्पष्टीकरण.
राज्यातील साडे चार हजार खासगी विनाअनुदानित इंग्रजी शाळा उद्या बंद :
राज्यभरातील खासगी विनाअनुदानित इंग्रजी शाळा उद्या (25 फेब्रुवारी) बंद राहणार आहेत. आरटीईअंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती तातडीने द्यावी आणि इतर मागणीसाठी इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने (ईसा) हा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये 29 जिल्ह्यातील साडे चार हजार इंग्रजी शाळा सहभागी होणार आहेत. तसंच या बंदला मुंबई स्कूल बस असोशिएशननेही पाठिंबा दिला आहे. मुंबईतील 140 शाळांच्या स्कूल बस सेवा बंद राहणार आहेत. मात्र ज्या इंग्रजी शाळांमध्ये प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा आहेत, त्या शाळा बंदमधून वगळल्याचं ईसाने सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत तातडीची बैठक, स्वाभिमानी माढ्यात उमेदवार देण्याच्या तयारीत, शरद पवारांना फटका बसू नये यासाठी मनधरणीचे प्रयत्न, दुपारी तीन वाजता जयंत पाटील, धनंजय मुंडे, रवीकांत तुपकर, अनिल पवार यांच्यात चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत तातडीची बैठक, स्वाभिमानी माढ्यात उमेदवार देण्याच्या तयारीत, शरद पवारांना फटका बसू नये यासाठी मनधरणीचे प्रयत्न, दुपारी तीन वाजता जयंत पाटील, धनंजय मुंडे, रवीकांत तुपकर, अनिल पवार यांच्यात चर्चा
खासदार चंद्रकांत खैरेंना अटक करा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी
सैन्य असो किंवा सीबीआय देशातल्या सर्वच संस्थांमध्ये गटबाजी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी करा, सत्य समोर येईल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गंभीर आरोप
काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती नाही, निवडणुकांसाठी सैन्याचा बंदोबस्त वाढवला, राज्यपाल सत्यपाल मलिक यांची माहिती, नागरिकांना न घाबरण्याचं सरकारचं आवाहन
अहमदनगर लोकसभेची जागा सोडा, राष्ट्रवादीकडे काँग्रेसची मागणी, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे नगरमधून निवडणूक लढण्याची चर्चा, नगर लोकसभेबाबत अद्याप निर्णय न झाल्याने विखे पाटील नाराज
अहमदनगर लोकसभेची जागा सोडा, राष्ट्रवादीकडे काँग्रेसची मागणी, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे नगरमधून निवडणूक लढण्याची चर्चा, नगर लोकसभेबाबत अद्याप निर्णय न झाल्याने विखे पाटील नाराज
कोल्हापूर :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर, राज ठाकरेंनी अंबाबाईचं दर्शन घेतलं
कोल्हापूर :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर, राज ठाकरेंनी अंबाबाईचं दर्शन घेतलं
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर दोन ठिकाणी अपघात, बोरघाटात मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर अमृतांजन पुलाजवळ दोन कार आणि ट्रेलरचा अपघात तर खालापूर टोल नाक्याजवळ पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर कारचा अपघात, एकाचा मृत्यू
Background
1. नरेंद्र मोदींच्या हस्ते 'पंतप्रधान किसान सन्मान निधी'चं आज उद्घाटन, एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा होणार
2. एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्याच्या धमकीनंतर मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवली, पोलिसांकडून कसून चौकशी, एक संशयित ताब्यात
3. पुलवामा हल्ल्यावरुन असदुद्दीन ओवेसींचा पाकिस्तानवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार प्रहार, मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या सभेला तुफान गर्दी
4. राष्ट्रवादी काँग्रेसला संपवणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, परळीत धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंवर टीकास्त्र, तर छगन भुजबळांचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर
5. औरंगाबादच्या आरोग्य मेळाव्यात चंद्रकांत खैरेंची अंधश्रद्धा, जप करुन मी रुग्णांना बरं करतो, मात्र प्रमोद महाजनांच्याबाबतीत मी फेल झालो, खैरेंचा अजब दावा
6. पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्याविषयी केंद्र सरकारच्या निर्णयाशी बांधील राहू, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रिया