LIVE BLOG : चेन्नईचा राजस्थानवर 8 धावांनी विजय
आयपीएल 2019 मध्ये चेन्नई सुपरकिंग आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान झालेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थानचा 8 धावांनी पराभव केला.
ABP News Bureau
Last Updated:
01 Apr 2019 12:13 AM
आयपीएल 2019 मध्ये चेन्नई सुपरकिंग आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान झालेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थानचा 8 धावांनी पराभव केला.
महाराष्ट्राच्या तरुणांच्या आशा आणि आकांक्षा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आदित्य ठाकरे महाराष्ट्र राज्याभोवती प्रवास करणार आहेत आणि 'आदित्य संवाद ' ह्या मोहिमेखाली प्रमुख शहरांमध्ये तरुणांशी संवाद साधतील.
मुंबई महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीसाठी उदया अर्ज दाखल होणार
पालघर : डहाणू तलासरी परिसरात पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का, 10 मार्चला भूकंपाचा धक्का बसल्यानंतर गेल्या 10 ते 15 दिवस भूकंपाने विश्रांती घेतली होती ,मात्र आज पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती
पाकिस्तान बालाकोट एअर स्ट्राईकचे आणि तिथल्या दहशतवाद्यांचे पुरावे लपवण्याचे प्रयत्न करत आहे : नरेंद्र मोदी
देशाला राजे आणि हुकूमशाहांची नव्हे तर चौकीदाराची गरज आहे : नरेंद्र मोदी
बालाकोटमधील एअर स्टाईक करण्यापूर्वी मी राजकीय भविष्याचा विचार केला नाही : नरेंद्र मोदी
बालाकोट एअर स्ट्राईक मी नाही देशाच्या सैनिकांनी केला : नरेंद्र मोदी
में भी चौकीदार' कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदींचा कार्यकर्त्यांशी संवाद,
निवडणुकीच्या तोंडावर मोदी काय बोलणार, याकडे देशाचे लक्ष
राजस्थानच्या जोधपूरमध्ये वायूसेनेचं मिग 27 फायटर जेट कोसळलं
मुंबई : खासदार पुनम महाजन उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल, आदित्य ठाकरेंचा फोटो बॅनरवर नसल्यानं युवासैनिकांनी व्यक्त केली होती नाराजी
परभणी : किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे यांची हत्या, सहकाऱ्यांनीच खून करुन गाठले पोलीस ठाणे, शहरातील जायकवाडी वसाहत परिसरातील घटना
सूरत-छपरा एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले, गौतमस्थान स्थानकावरील दुर्घटना, 4 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
मुंबई : महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या 5 एप्रिलला दोन सभा होणार, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या धामणगाव मतदार संघात आणि चंद्रपुरातील काँग्रेस लोकसभा उमेदवार बाळू धाणोरकर यांच्या प्रचारासाठी घेणार सभा
सूरत-छपरा एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले, गौतमस्थान स्थानकावरील दुर्घटना, 4 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
नाशिक : महिलेला अंगावर पेट्रोल टाकून जाळले, महिला गंभीर जखमी, पंचवटीच्या टकलेनगर परिसरातील हरीसिद्धी अपार्टमेंट मधील घटना
अहमदनगर : नाशिक-पुणे महामार्गावर तवेरा गाडीचा संगमनेर तालुक्यातील माहोली घाटात अपघात, टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, देवदर्शनासाठी जात असताना घडली घटना
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, पॅन-आधार लिंक आणि टीव्ही चॅनल पॅक निवडण्याची आज अखेरची मुदत, रविवार असला तरी बँका, जीएसटी, आयकर कार्यालय सुरू राहणार
सोलापूर : नाकाबंदीदरम्यान 23.5 लाख रुपयांची रोकड जप्त, कामती पोलिसांची कारवाई, चौकशी सुरु आहे
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. विदर्भातील जिल्ह्यांना कडक उन्हाच्या झळा, अकोल्यात पाऱ्याची 43 तर परभणीत 41 अंशापर्यंत उसळी, पारा आणखी वाढण्याची शक्यता
2. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, एक जखमी, तर शनिवारी सकाळी जवानांच्या गाडीजवळ कारचा स्फोट
3. निवडणुकीच्या तोंडावर पैशांच्या गैरव्यवहारावर कारवाईचा धडाका, बनावट नोटांप्रकरणी मुंब्र्यातून तिघांना अटक
4. मुलगा सुजयच्या प्रचारात व्यस्त असलेल्या राधाकृष्ण विखेंची अखेर काँग्रेसच्या बैठकीला हजेरी, भाजपचा उघड प्रचार करूनही काँग्रेसकडून कारवाई नाही
5. किरीट सोमय्या केंद्रीय मंत्री पियुष गोयलांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, तर जागेबाबत निर्णय योग्य वेळी जाहीर करणार, विनोद तावडेंचा दावा
6. दिल्ली कॅपिटल्सनं केला कोलकाता नाईट रायडर्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, पृथ्वी शॉचं शतक एका धावेनं हुकलं