LIVE : अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल

2014 मध्ये शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफजल खानाच्या फौजेसोबत केली होती.

ABP News Bureau Last Updated: 30 Mar 2019 02:52 PM
भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल, उद्धव ठाकरे, राजनाथ सिंह, अरुण जेटली उपस्थित
भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल, उद्धव ठाकरे, राजनाथ सिंह, अरुण जेटली उपस्थित
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमित शाहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये दाखल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमित शाहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये दाखल
अमित शाह यांचा रोड शोला सुरुवात
देशासमोर एकच प्रश्न आहे की देशाला सुरक्षा कोण देऊ शकतं? देशाला सुरक्षा एकच व्यक्ती नरेंद्र मोदी, एकच पक्ष भाजप आणि एकच सरकार एनडीए देऊ शकतं : अमित शाह
मी जेव्हा जेव्हा विचारतो की, देशाचं नेतृत्त्व कोणाच्या हातात असावं तर अरुणाचलपासून कन्याकुमारीपर्यंत एकच आवाज येतो, मोदी-मोदी : अमित शाह
बूथवर काम करता करता, आज जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्षपदापर्यंत पोहोचलो आहे. हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालं आहे : अमित शाह
बूथवर काम करता करता, आज जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्षपदापर्यंत पोहोचलो आहे. हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालं आहे : अमित शाह
अमित शाह लाईव्ह
आमच्यात काही मतभेद होते, पण आम्ही ते मिळून दूर केले. पाठीत खंजीर खुपसणं हे आमचे संस्कार नाही. मी इथे अमित शाहांना पाठिंबा देण्यासाठी आलोय आणि निर्मळ मनाने आलोय : उद्धव ठाकरे
शिवसेना आणि भाजप मनाने एक झाले आहे. विचारधारा एकच असल्याने आम्ही पुन्हा एकत्र : उद्धव ठाकरे
बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन मी अमित शाहांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय : उद्धव ठाकरे
अनेकांना प्रश्न पडलाय की मी इथे कसा आहे, गांधीनगरमध्ये आल्याने काहींच्या पोटात दुखतंय : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे लाईव्ह

Background

गांधीनगर : भाजपचे अध्यक्ष अमित शाह आज गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमित शाह उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप आणि एनडीएचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. यामध्ये राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रकाश सिंह बादल, रामविलास पासवान यांचा समावेश आहे.

अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित शाहांनी आपल्या कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर नारणपुरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. इथे अमित शाह सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर त्यांच्या रोड शोला सुरुवात होईल.

गांधीनगर हा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ आहे. 1998 पासून ते इथून निवडून आले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या जागेवर अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वयोमानामुळे लालकृष्ण अडवाणी अमित शाहांच्या रोड शोमध्ये सहभागी होणार नाही, असं भाजपच्या एका मंत्र्याने सांगितलं.

2014 मध्ये शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफजल खानाच्या फौजेसोबत केली होती. यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने वारंवार भाजप, अमित शाह आणि नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक प्रहार केले होते. मात्र आता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते उपस्थित राहणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.