LIVE BLOG : दीपाली सय्यद यांचा सुजय विखेंना पाठिंबा

अहमदनगर : शिवसंग्रामच्या महिला अध्यक्षा आणि सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा भाजप उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा, लोकसभेत पाठिंबा मात्र विधानसभा निवडणुकीत उतरणार, दीपाली सय्यद यांची घोषणा

ABP News Bureau Last Updated: 01 Apr 2019 11:24 PM
सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी सहाय्यक अभियंत्याला आटक
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी न्या. प्रदीप नंद्राजोग यांची नियुक्ती, रविवारी राज्यपालांच्या उपस्थितीत शपथविधी होण्याची शक्यता, सोमवारी स्वीकारणार पदभार, न्यायमूर्ती नंद्राजोग हे सध्या राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
राष्ट्रवादीकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप, 25 मार्चला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील बी-4 या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीचा जाहीरनामा माध्यमांसमोर प्रसिद्ध, नियमांनुसार आचारसंहितेच्या काळात कोणत्याही जाहीरनाम्याच्या घोषणेसाठी शासकीय कार्यालय किंवा निवासस्थानाचा वापर करणे गैरलागू, सदर प्रकरणाची चौकशी करुन याबाबत गुन्हा नोंदवण्याचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांनी 'ए' वॉर्डला दिले आहेत
नाशिक : समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्राची वाजे यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा प्रस्ताव, वाजे यांच्यावर निवडणुकींची कामे टाळल्याचा आरोप
नाशिक : समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्राची वाजे यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा प्रस्ताव, वाजे यांच्यावर निवडणुकींची कामे टाळल्याचा आरोप
सुजय विखे यांचा भाजपप्रवेशाचा निर्णय योग्यच, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं मत, राष्ट्रवादीने अहमदनगरच्या जागेचा प्रश्न व्यक्तिगत केल्याचाही दावा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा, आजच्या सभेनंतर मोदी पुन्हा महाराष्ट्रात येणार, मोदींची तीन एप्रिलला गोंदियात, तर सहा एप्रिलला नांदेडमध्ये सभा
शिवसेना नेते संजय राऊत यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस,
31 मार्चच्या 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातील रोखठोक या लेखात ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता,
आचारसंहिता असताना वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न केल्याचा नोटीसमध्ये उल्लेख
मुंबई : निवडणूक काळात झवेरी बाजार संवेदनशील परिसर म्हणून घोषित, मुंबई शहर निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती, निवडणूक काळात झवेरी बाजारमधील व्यवहारावर निवडणूक आयोगाचं लक्ष असणार
पंढरपूर : कल्याणराव काळे यांचा भाजपप्रवेश निश्चित, कार्यकर्ता मेळाव्यात निर्णय, काळेंच्या निर्णयामुळे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं
हार्बर रेल्वे विस्कळीत : खांदेश्वर रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, अर्ध्या तासापासून लोकल एकाच ठिकाणी उभी
हार्बर रेल्वे विस्कळीत : खांदेश्वर रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, अर्ध्या तासापासून लोकल एकाच ठिकाणी उभी
रत्नागिरी-सिंधुदुर्गातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचा अर्ज दाखल
मुंबई : नीरव मोदीच्या महागड्या पेंटिंग्जचा लिलाव कायदेशीर, कॅमलोट एंटरप्रायझेसची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली, नीरव मोदीच्या कंपनीला कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, हायकोर्टाचा निर्णय, तूर्तास केवळ सिनेमाच्या ट्रेलरलाच परवानगी, सिनेमाच्या प्रदर्शनासाठी आवश्यक सर्टिफिकेटवर उद्यापर्यंत निर्णय घेणार, सीबीएफसीची माहिती, याचिका निकाली
'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, हायकोर्टाचा निर्णय, तूर्तास केवळ सिनेमाच्या ट्रेलरलाच परवानगी, सिनेमाच्या प्रदर्शनासाठी आवश्यक सर्टिफिकेटवर उद्यापर्यंत निर्णय घेणार, सीबीएफसीची माहिती, याचिका निकाली
अहमदनगर : शिवसंग्रामच्या महिला अध्यक्षा आणि सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा भाजप उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा, लोकसभेत पाठिंबा मात्र विधानसभा निवडणुकीत उतरणार, दीपाली सय्यद यांची घोषणा
#BREAKING हिंगोली : दुहेरी अपघातात एकाचा जागीच मृत्यू, हिंगोली येथील खटकाळी बायपास हायवे रोडवर ट्रक व ट्रॅक्टरमध्ये अपघात, एकाचा मृत्यू
मुंबई : वुडलॅण्ड सोसायटीत शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागाला अखेर यश, साडेचार तासांनंतर बिबट्या जाळ्यात
मुंबई : वुडलॅण्ड सोसायटीत शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागाला अखेर यश, साडेचार तासांनंतर बिबट्या जाळ्यात
मुंबई : दाऊदची बहीण हसीना पारकरच्या घराचा 1 कोटी 80 लाखांना लिलाव

पुणे : कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेच्या लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवस, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तर विदर्भात पुढच्या पाच दिवसांत हिट व्हेव येईल, असं पुणे वेधशाळेने म्हटलं आहे.
चंद्रपूर : चिचपल्ली येथील वनविभागाच्या अखत्यारीतील बांबू डेपोला भीषण आग, लाखोंचे बांबू आगीत जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

मुंबई-पुणे प्रवास करतो म्हणतो म्हणून मावळ मतदारसंघ निवडला, असं पार्थ पवार म्हणातात. असं असेल तर प्रत्येक मतदारसंघात ओला-उबरवाल्यांनी निवडणूक लढवावी, कारण ते पण असाच प्रवास करतात : युवासेनेची टीका
#BREAKING सेन्सेक्स पहिल्यांदा 39 हजार पार, तर निफ्टी 11,700 वर
अजित पवारांचा निर्णय कुठल्याही क्षणी येऊ शकतो, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान, निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सिंचन घोटाळ्याची चर्चा
उत्तर प्रदेश : मैमपरी भागात ग्रेनेड आढळल्याने खळबळ, मुलायम सिंह अर्ज भरायला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 2 वर हँड ग्रेनेड आढळला
सांगली लोकसभेसाठी गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता, अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची पडळकर यांनी केलेली घोषणा, धनगर समाजाचे मत विभाजन टाळण्यासाठी गोपीचंद पडळकर यांच्या नावाला पसंती
जम्मू काश्मीर : पुलवामातील लस्सीपुरा भागात सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, लश्कर ए तोयबाच्या 4 दहशदवाद्यांचा खात्मा

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, वर्ध्यात पहिली जाहीर सभा, भाजपसह मित्रपक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसाठी यशवंत जाधव पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

तर बेस्ट समितीसाठी अनिल पाटणकर हे समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी अकरा वाजता महापालिका मुख्यालयात अर्ज भरले जातील.
मुंबई : मुलुंडमधील शीतल छाया बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आग, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल, कुठलीही जीवितहानी नाही, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

Background

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. नवीन आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवर, गॅस महागला, तर टाटा आणि महिंद्रा गाड्यांच्या किंमतीतही वाढ
2. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, वर्ध्यात पहिली जाहीर सभा, भाजपसह मित्रपक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार
3. तिसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावाधाव, सोमय्यांच्या उमेदवारीवर आज निर्णय होण्याची शक्यता, तर पुण्यात उमेदवार निश्चितीच्या आधीच काँग्रेसचा प्रचार सुरु
4. जेट एअरवेजचे कर्मचारी आजपासून सामूहिक सुट्टीवर, थकीत पगार न दिल्यानं कर्मचाऱ्यांचा पवित्रा, अनेक उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता
5. इस्रो 28 देशांचे उपग्रह अंतराळात सोडणार , श्रीरहरिकोटाच्या सतिश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा
6. चेन्नई सुपर किंग्जची आयपीएलमध्ये विजयाची हॅटट्रिक, तिसऱ्या साखळी सामन्यात राजस्थानचा आठ धावांनी पराभव, गोलंदाजांचा टिच्चून मारा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.