LIVE BLOG : नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेत शिक्षकाकडून चार मुलींचा विनयभंग

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुणे-आळंदी मार्गावरुन काही शिवप्रेमींना शिवज्योत घेऊन रॅली काढताना पाहून शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे सहभागी झाले, आणि हातात शिवज्योत घेऊन अनवाणी धावले

ABP News Bureau Last Updated: 23 Mar 2019 11:50 PM
#IPL2019 महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएलच्या बाराव्या मोसमात विजयी सलामी. चेन्नईनं विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिल्याच सामन्यात सात विकेट्सनी धुव्वा उडवला
नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकाने केला चार मुलींचा विनयभंग, मुलींच्या पालकांची पोलिसांकड़े तक्रार, आरोपी सहाय्यक प्रशिक्षण अधिकारी मच्छिंद्र करपेवर गंगापूर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी करपे पोलिसांच्या ताब्यात
BREAKING : जालना : वाळूचा ढिगारा अंगावर पडल्याने योगेश तराळ आणि अनिकेत तराळ या दोन तरुणांचा मृत्यू, भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावातील घटना, केळना नदी पात्रात वाळू उपसा करताना वाळू खोदताना ढिगारा अंगावर पडला


#IPL2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग : बंगळुरुचा 70 धावात खुर्दा
नवी दिल्ली : खासदार शत्रुघ्न सिन्हांचं भाजपनं तिकीट कापलं, त्यांच्या जागी पाटणा साहिब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना उमेदवारी, शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा, शाहनवाज हुसैन यांनाही उमेदवारी नाकारली
#IPL2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग : बंगळुरुचा 70 धावात खुर्दा
महादेव जानकर, रामदास आठवले, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांसोबत 'वर्षा'वरील बैठक संपली, सध्या नाही मात्र, विधानसभेत मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची रासप नेते महादेव जानकरांची माहिती
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर लोकसभेच्या मैदानात, अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवणार
हिंगोलीचे खासदार राजीव सातव निवडणूक लढवणार नाही, महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत घोषणा
शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना तिकीट नाकारल्याने समर्थकांमध्ये असंतोष, उमेदवारीच्या मागणीसाठी उद्या उद्धव ठाकरेंच्या भेटीला मुंबईला जाणार, पक्षाने पुर्नविचार करुन गायकवाडांना उमेदवारी न दिल्यास लोहारा आणि उमरग्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा
भाजप साम दाम दंड भेदाचं राजकारण करत आहे, त्याला काही पक्ष बळी पडत आहेत : अशोक चव्हाण




काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला? काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपच्या संपर्कात, येत्या काही दिवसात भाजपात प्रवेश होण्याची शक्यता, फलटणच्या निंबाळकरांना भाजपकडून माढ्यातून उमेदवारी देण्याच्या हालचाली
काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला? काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपच्या संपर्कात, येत्या काही दिवसात भाजपात प्रवेश होण्याची शक्यता, फलटणच्या निंबाळकरांना भाजपकडून माढ्यातून उमेदवारी देण्याच्या हालचाली
भाजपच्या दुसऱ्या यादीतही घटक पक्षांना स्थान नाही,

बारामतीच्या जागेवरून कांचन कुल कमळावर लढणार
,
कांचन कुल या रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी, मात्र भाजपच्या उमेदवार

रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी बोलावली तातडीची बैठक,

घटक पक्षांना डावलल्याने आता रासपची पुढची भूमिका ठरवण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची बोलावली बैठक
बेळगाव : भरत कुरणे, शरद कळसकर आणि सुधन्वा जोंधळेकरला पेट्रोल बॉम्ब प्रकरणी चौकशीसाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी
रत्नागिरी : गोवा बनावटीचा दारूचा मोठा साठा पोलिसांकडून जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेत मोठी कारवाई, गोव्याहून गुजरातला नेली जात होती दारू
नागपूर : शहराच्या धरमपेठ भागात झोपडपट्टीत राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेवर तिघांनी बलात्कार

Background

1. भाजप आणि काँग्रेसकडून याद्या जाहीर, पुण्यात भाजपकडून शिरोळेंच्याजागी गिरीश बापटांना उमेदवारी, तर बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल सामना रंगणार

2. लोकसभेसाठी शिवसेनेकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर, 17 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी, उस्मानाबादेत ओमराजेंना तिकीट, पालघर, साताऱ्यात प्रतीक्षा


3. राष्ट्रवादीचा माढ्यातला तिढा अखेर सुटला, माढ्यामधून संजय शिंदेंना उमेदवारी, उस्मानाबादेतून पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा पाटलांना संधी


4. क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपमध्ये,  दिल्लीतून निवडणूक लढणार, मथुरेत भाजपच्या हेमामालिनीविरोधात डान्सर सपना चौधरीला काँग्रेसच्या उमेदवारीची शक्यता


5. फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटवर बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचं पाऊल


6. आजपासून आयपीएलच्या बाराव्या मोसमाचा थरार रंगणार, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये पहिला सामना

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.