- Home
-
Election
-
Elections
LIVE BLOG | श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती
LIVE BLOG | श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार थांबला, 23 एप्रिलला मतदान, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, रावसाहेब दानवे आणि राणे-विखेंची प्रतिष्ठा पणाला
ABP News Bureau
Last Updated:
22 Apr 2019 12:07 AM
काँग्रेसनं सध्या सोबतीला बिघडलेलं इंजिन घेतलंय, ज्या इंजिनाला डबेच नाही ते इंजिन काय कामाचं? बाळासाहेबांचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरे आहेत, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला
काँग्रेसनं सध्या सोबतीला बिघडलेलं इंजिन घेतलंय, ज्या इंजिनाला डबेच नाही ते इंजिन काय कामाचं? बाळासाहेबांचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरे आहेत, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला
श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू, परराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराज यांची माहिती
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खोट्या जाहीरातींविरोधात आमदार प्रवीण दरेकर आज संध्याकाळी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार
श्रीलंकेतील बॉम्बस्फोटप्रकरणी 7 जणांना अटक,
देशभरात संचारबंदी लागू,
हल्ल्यातील मृतांचा आकडा 207 वर
उस्मानाबाद : कार अपघातात 3 जणांचा होरपळून मृत्यू, एक गंभीर जखमी, उमरगा तालुक्यातील तलमोड येथील घटना
श्रीलंकेत आठवा बॉम्बस्फोट, जोरदार धमाक्याने पुन्हा दहशत
, भारतात हायअलर्ट
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतील पहिल्या सभेला परवानगी, 24 ऐवजी 23 एप्रिलला सभा होणार, काळाचौकीच्या शहीद भगतसिंग मैदानात होणार सभा
पुणे-नगर महामार्गावर शिरूर येथे कंटेनर आणि कार यांच्यात भिषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, अपघातातील सर्व मृत नांदेड जिल्ह्यातील रहिवासी
पुणे-नगर महामार्गावर शिरूर येथे कंटेनर आणि कार यांच्यात भिषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, अपघातातील सर्व मृत नांदेड जिल्ह्यातील रहिवासी
श्रीलंकेतीत बॉम्बस्फोटात 99 जाणांचा मृत्यू, भारतीयांसाठी हेल्पलाईन क्रमांक +94777903082
#BREAKING
- श्रीलंकेत पुन्हा दोन स्फोट, मृतांचा आकडा 187 वर, 500 हून अधिक जखमी
- श्रीलंकेत जमावबंदीचे आदेश जारी, भारतात हायअलर्ट
कालिदास कोलंबकर हे काँग्रेस आमदार आहेत. आधी त्यांनी आमदारकीचा, पक्षाचा राजीनामा द्यावा मग शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा, एकनाथ गायकवाड यांची मागणी
कालिदास कोलंबकर हे काँग्रेस आमदार आहेत. आधी त्यांनी आमदारकीचा, पक्षाचा राजीनामा द्यावा मग शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा, एकनाथ गायकवाड यांची मागणी
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची परळच्या कामगार मैदानात बॅटींग, तरुणांसोबत आदित्य ठाकरे क्रिकेट खेळले
#BREAKING
- श्रीलंकेतील कोलंबोमध्ये 8 साखळी बॉम्बस्फोट
- 5 चर्च आणि 3 हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट, 10 जण ठार, 80 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोटात मृतांचा आकडा 185 वर, मृतांमध्ये 35 परदेशी नागरिकांचा समावेश, भारतातही हाय अलर्ट
श्रीलंकेत तब्बल आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती, चर्च आणि हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची माहिती
औरंगाबाद : चंद्रकांत खैरे यांची बाईक रॅली आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांची ट्रॅक्टर रॅली शहरातील चिश्तिया चौकात समोरासमोर आली. दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते मोठमोठ्याने घोषणा देत होते. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव पाहायला मिळाला. दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे चिश्तिया चौक दणाणून निघाला
अरविंद सावंतांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंचा पायी फिरुन प्रचार, लालबाग-परळ, काळाचौकी भागांत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात बाईक रॅली , यावेळी चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये ट्रॅफीक जाम झाल्यानं आदित्य ठाकरेंनी पायी चालणं पसंत केलं
पुणे लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे.. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शन घेतले आणि आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळी प्रचाराला सुरुवात केली.
श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट : आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 300 पेक्षा अधिक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Background
1. राज ठाकरेंच्या मुंबईतल्या सभेला सरकारचा आठकाठीचा प्रयत्न, महापालिका आणि निवडणूक आयोगाची सभेला अद्याप परवानगी नाही,
2. तिसऱ्या टप्प्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस, एकूण 14 जागांसाठी मतदान,
3. प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह लिहिल्यानं अमरावतीत वृद्धाला मारहाण, आंबेडकरांकडून घटनेचा निषेध, मात्र बदनामी करणाऱ्यांना सबुरीचा सल्ला
4. निवडणूक आयोगाच्या नोटीसीवर साध्वीला आज उत्तर द्यावं लागणार, शहीद हेमंत करकरेंबद्ददलचं वादग्रस्त विधान, साध्वीला पश्चाताप नाहीच
5. विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादी मनसेला सोबत घेणार, मुख्यमंत्र्यांचा एबीपी माझावर दावा, लोकसभेत राज ठाकरेंमुळं फरक पडणार नसल्याचा विश्वास
6. पंतप्रधान मोदींवरील सिनेमापाठोपाठ वेब सीरीजलाही बंदी, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा निर्णय, ईरॉस नॉऊवरील स्ट्रिमिंग थांबवलं