LIVE BLOG | विश्वचषक : पाकिस्तानचा इंग्लंडवर 14 धावांनी विजय

विश्वचषकात पाकिस्तानने इंग्लंडवर 14 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या ज्यो रुट, जॉस बटलरच्या शतकी खेळी व्यर्थ गेली

ABP News Bureau Last Updated: 03 Jun 2019 11:21 PM
पाकिस्तानचा इंग्लंडवर 14 धावांनी विजय, ज्यो रुट, जॉस बटलरच्या शतकी खेळी व्यर्थ
पाकिस्तानचा इंग्लंडवर 14 धावांनी विजय, ज्यो रुट, जॉस बटलरच्या शतकी खेळी व्यर्थ
एमएचटी सीईटीचा निकाल आज मध्यरात्री, अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी मध्यरात्री संकेतस्थळावर मिळणार, मंगळवारी विद्यार्थ्यांना दिवसभर निकाल पाहता येईल
एमएचटी सीईटीचा निकाल आज मध्यरात्री, अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी मध्यरात्री संकेतस्थळावर मिळणार, मंगळवारी विद्यार्थ्यांना दिवसभर निकाल पाहता येईल
पंढरपूर : टेंभुर्णी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पुणे-सोलापूर हायवेवरील वाहतूक ठप्प, वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान
यवतमाळ : जिल्ह्यात काही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, घाटंजी तालुक्यात वादळी वारा आणि पावसामुळे नुकसान
यवतमाळ : जिल्ह्यात काही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, घाटंजी तालुक्यात वादळी वारा आणि पावसामुळे नुकसान
सोलापूर : रेश्मा पडेकनुर यांची हत्या केल्याची एमआयएम नगरसेवक तौफिक शेख याची पोलिसांसमोर कबुली, पोलिस अधीक्षक अमृत निकम यांची पत्रकार परिषदेत माहिती, आर्थिक वाद आणि जागेच्या व्यवहारावरुन हत्या केल्याची माहिती
मुंबई : आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना गांधीजींविषयीचं ट्वीट भोवलं, राज्य सरकारकडून कारणे दाखवा नोटीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल, चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात बदली, गिरीश महाजन यांची माहिती
आसाम : वायूसेनेचं एएन 32 विमान बेपत्ता, दुपारी 1 वाजेपासून विमानाचा संपर्क तुटला, विमानात 5 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स



मुंबई महापालिका उपायुक्त निधी चौधरी यांना कारणे दाखवा नोटीस, मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी बजावली नोटीस, गांधींवर केलेल्या ट्वीट प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची सूचना, विरोधकांच्या तक्रारीनंतर विशेषतः शरद पवार यांच्या कारवाईच्या मागणीनंतर सरकारचे पाऊल
मुंबई महापालिकेच्या मुख्यप्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, महापालिका उपायुक्त निधी चौधरींना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, निधी चौधरी यांनी 17 मे रोजी महात्मा गांधींविषयी वादग्रस्त ट्वीट केलं होतं
भायखळा येथील महापौर बंगल्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेची मान्सूनपूर्व आढावा बैठक,
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींसह अनेक अधिकारी उपस्थित,
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह पालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही बैठकीत सहभाग
धुळे : निवडणूक कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील 15 मद्यविक्रीची दुकाने/हॉटेल्स कायमस्वरूपी बंद, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
नवी दिल्ली : अजित डोवाल यांना कॅबिनेट दर्जा, अजित डोवाल यांची पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती
राज्य सरकारची गाव तिथ चारा छावणी, चारा छावणीच्या पूर्वीच्या अटीत बदल, आता किमान 150 जनावरांसाठीसुध्दा चारा छावणी सुरु होणार, जिल्हाधिकार्यांनी स्वत:च्या अख्यत्यारीत निर्णय घेण्याचे सरकारचे आदेश, शरद पवार चारा छावणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या आधीच गाव तिथ छावणीचा निर्णय
नवी दिल्ली: ‘दिल्ली मेट्रो आणि बसमध्ये महिलांना मोफत प्रवास’, दिल्ली विधानसभेच्या तोंडावर अरविंद केजरीवालांचा मोठा निर्णय
नवी दिल्ली: दिल्ली शहरात 70 हजार सीसीटीव्ही लावले जाणार,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा. एका आठवड्यात अंमलबजावणी, योजनेचा सर्व खर्च दिल्ली सरकारकडून केला जाणार

श्रीरामपूर : शरद पवार यांचे मेहुणे माणिकराव जगधने यांचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन, अंत्यविधीला शरद पवारांसह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित, श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे पार पडले अंत्यसंस्कार
मुंबई : शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी सुनावलेली फाशीची शिक्षा कायदेशीररीत्या योग्य,
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मोठा दिलासा, 376 कलमातील सुधारणेला आरोपींनी दिलेलं आव्हान हायकोर्टानं फेटाळलं
बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिन, आज परळीतल्या गोपीनाथ गडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार मराठवाड्यातील भाजप-सेनेच्या नवनिर्वाचित खासदारांचा जाहीर सत्कार होणार
काश्मीरमध्ये जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, पाच महिन्यात 103 ठार
नाशिक : तिसरीही मुलगी झाल्याने आईने केली 10 दिवसाच्या मुलीची गळा दाबून केली हत्या, पतीने केलेल्या तक्ररीनुसार आई अनुजा काळे पोलिसंच्या ताब्यात
सांगली-हरिपूर रस्त्यावर अपघात, ट्रकने सहा वर्षाच्या चिमुरडीला उडवलं, अपघातात चिमुरडीचा बळी, ट्रकचा चालक फरार

Background

महत्त्वाच्या हेडलाईन्स

1. विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 135 जागांवर लढणार, तर घटकपक्षांना 18 जागा सोडणार, चंद्रकांत पाटलांची माहिती

3. गांधीजींचा अपमान करणाऱ्या पालिका उपायुक्तांवर कारवाई करा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, निधी चौधरीच्या ट्वीटवरुन वादंग

3. राम मंदिरासाठी आज अयोध्येत संतांची बैठक, तर तातडीनं राम मंदिर बांधा, सुब्रमण्यम स्वामींचं मोदींना पत्र

4. महाराष्ट्रासह देशभरात 2 दिवस उष्णतेची लाट कायम, अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

5. उत्तराखंडमध्ये ढगफुटी, चमोली आणि अल्मोडा परिसरात जोरदार पाऊस, दोन जण बेपत्ता

6. दक्षिण आफ्रिकेला नमवून बांगलादेशची विश्वचषकात सनसनाटी विजयी सलामी; दक्षिण आफ्रिकेच्या पदरी लागोपाठ दुसऱ्या सामन्यात पराभव

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.