LIVE BLOG | पालघर नगरपरिषद निवडणूक निकाल लाईव्ह

पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं युती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्षांमध्ये सामना रंगला. 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यापैकी 30 जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 22 जण बंडखोर उमेदवार आहेत.

ABP News Bureau Last Updated: 25 Mar 2019 11:04 PM
गोवा ब्रेकिंग:लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवारी जाहीर, उत्तरेतून गिरीश चोडणकर तर दक्षिणेतून फ्रान्सिस सार्दिन निवडणूक लढवणार

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील सावनेर मध्ये मध्यप्रदेशातून आलेल्या एका कार मध्ये जिल्हा निवडणूक यंत्रणेचे पथक आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 25 लाख रुपये जप्त केले आहे. 500 रुपयांचे बंडल एका पिशवीत लपवून कार मध्ये ठेवले होते.
सोलापूर : सोलापुरातील आकाशवाणी केंद्राजवळ MIDC परिसरातील झंवर टेक्सटाईल्सला आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल.
नाशिकमध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी होत असतांना संध्याकाळी ईगतपुरीच्या रेल्वे तलावात दोन मुलांचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ, अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही, पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल, ईगतपुरी पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा उमेदवार पार्थ पवार यांनी रिक्षातून प्रचार केला. आज ते पिंपरी विधानसभेत प्रचार करत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा उमेदवार पार्थ पवार यांनी रिक्षातून प्रचार केला. आज ते पिंपरी विधानसभेत प्रचार करत होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हटलं की एसी गाडीतून प्रवास करणाऱ्या पार्थ यांनी आज यानिमित्ताने तीन चाकीतून प्रवास केला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पार्थ वेगवेगळे प्रयोग करू लागलेत, ते मतदारांच्या पचनी पडतील का हे निकालातून स्पष्ट होईल.
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ केलेले 18 नगरसेवक पुन्हा पक्षात. अहमदनगर महानगर पालिकेत भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांना पक्षातून केले होते बडतर्फ. मात्र बडतर्फची कारवाई मागे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली घोषणा.
संजय निरुपम यांच्या विरोधातील नाराजी पाहता उमेदवारी दिली पण मुंबई काँग्रेसची जबाबदारी मिलिंद देवरांना देण्याची शक्यता.
संजय निरुपम यांच्या विरोधातील नाराजी पाहता उमेदवारी दिली पण मुंबई काँग्रेसची जबाबदारी मिलिंद देवरांना देण्याची शक्यता.
पालघर नगरपरिषद निवडणूक :
महायुती 21
(शिवसेना 14, भाजप 7),
महाआघाडी 02 (राष्ट्रवादी काँग्रेस 2), अपक्ष 05.

महाआघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार - उज्वला केदार काळे (राष्ट्रवादी) 1069 मतांनी विजयी,

महायुतीच्या उमेदवार स्वेता मकरंद पाटील यांचा पराभव

पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

Background

पालघर : पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज हाती येणार आहे. 14 प्रभागांमधील 28 जागांसह एका नगराध्यक्षपदासाठी काल मतदान झालं. दिवसभरात अंदाजे 67 टक्के मतदान झाल्याचं जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर नगरपरिषदेची निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले आहेत. शिवसेना-भाजप-रिपाइं युती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा सामना रंगला. 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यापैकी 30 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 22 जण बंडखोर उमेदवार आहेत.

आतापर्यंत पालघर नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता होती, मात्र आताच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आयात उमेदवाराला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी दिल्याने शिवसैनिक नाराज झाले आणि त्यांनी बंडखोर म्हणून अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला.

काल सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत झालं. या मतदान प्रक्रियेसाठी 9 झोनल अधिकाऱ्यांसह 372 कर्मचारी 62 मतदान केंद्रांवर कैनात होते. कोणताही अपप्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडली.

मतमोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी 14 स्वतंत्र प्रभागांसाठी स्वतंत्र 14 टेबल असतील, तर प्रत्यक्ष मतमोजणीसाठी 42 कर्मचाऱ्यांसह एकूण 100 कर्मचारी यावेळी कार्यरत असतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

शिवसेना-भाजप-रिपाइंसाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची झाली आहे. कारण निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली.
पालघरमधील मतदारराजाने आपला कौल कोणाच्या बाजूने दिला, हे काही तासात स्पष्ट होईल.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

1) उज्ज्वला केदार काळे (महाआघाडी-राष्ट्रवादी)
2) अंजली परेश पाटील (शिवसेना बंडखोर)
3) स्वेता मकरंद पाटील (महायुती-शिवसेना)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.