LIVE BLOG : उत्तर पश्चिम मुंबईमधून काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमेदवारी
पक्षातून निरुपम यांच्या उमेदवारीला विरोध होता
ABP News Bureau
Last Updated:
25 Mar 2019 10:01 PM
#BREAKING नाशिक : दारणा नदीपात्रात पोहायला गेलेल्या घोटी खुर्दमधील तरुणाचा मृत्यू, प्रवीण बोराडे असं मृत तरुणाचं नाव
अकोला : वाशिम बायपास भागात अंदाजे 50 लाखांची रोकड जप्त, भरारी पथकाची कारवाई, निवडणुकीत वापरासाठी रक्कम आली का? याचा तपास सुरु
मुंबई : काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उत्तर-पश्चिम मुंबईतून उमेदवारी, तर मुंबई काँग्रेसची जबाबदारी मिलिंद देवरांकडे
#BREAKING अहमदनगर : रोहिदास कर्डीले यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश, रोहिदास कर्डीले भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे पुतणे, शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश
#BREAKING मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि अनिता गोयल संचालक मंडळावरून पायउतार, आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेटचा पाय आणखी खोलात
#BREAKING मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि अनिता गोयल संचालक मंडळावरून पायउतार, आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेटचा पाय आणखी खोलात
उत्तर पश्चिम मतदारसंघातून संजय निरुपम यांना उमेदवारी मिळणार आहे. पक्षातून निरुपम यांच्या उमेदवारीला विरोध होता, तरीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी संजय निरुपम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.
प्रकाश आंबेडकर सोलापूरसह अकोल्यातूनही लढणार, उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार, सूत्रांची माहिती
सांगली : महाआघाडीतील तिढ्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार, 'स्वाभिमानी' सांगलीची जागा सोडणार की काँग्रेसमधून बंडखोरीचा इशारा दिलेले वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटलांना स्वाभिमानी ऑफर देणार, याकडे नजरा
उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड उद्धव ठाकरेंच्या भेटीला, गायकवाडांना तिकीट नाकारल्याने कार्यकर्ते होते नाराज, उद्धव ठाकरेंनी समजूत काढत ज्ञानराज चौगुले आणि रवी गायकवाड यांच्यातले गैरसमज केले दूर,लोकसभेसाठी जोमानं काम करण्याचे दोघांनीही आदेश

पालघर : पालघर लोकसभा महायुतीकडून भाजपचे विद्यमान राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता, श्रीनिवास वनगा यांना उमेदवारीपासून दूर ठेवण्याची चिन्हं

उत्तर मुंबई मतदारसंघातून 'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या उमेदवारीची काँग्रेसमध्ये चर्चा, उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी भाजपचे तगडे उमेदवार असून त्यांच्याविरोधात एखादा लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा देण्याची काँग्रेसची रणनीती

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतही नाराजीनाट्य, अमरावतीचे लोकसभा उमेदवार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांच्याविरोधात कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरेंकडे नाराजी, स्थानिक शिवसैनिक 'मातोश्री'वर दाखल
सोलापूर : प्रकाश आंबेडकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना, सोलापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन, कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी
सोलापूर : प्रकाश आंबेडकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना, सोलापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन, कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी
यवतमाळ : काँग्रेस उमेदवार माणिकराव ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल
नांदेड : काँग्रेसतर्फे अशोक चव्हाण यांच्यासोबत अमिता अशोक चव्हाण यांचाही उमेदवारी अर्ज दाखल, अमिता चव्हाण अर्जाची छाननी होईपर्यंत उमेदवार असणार
नांदेड : काँग्रेसतर्फे अशोक चव्हाण यांच्यासोबत अमिता अशोक चव्हाण यांचाही उमेदवारी अर्ज दाखल, अमिता चव्हाण अर्जाची छाननी होईपर्यंत उमेदवार असणार
नांदेड : भाजप उमेदवार प्रताप चिखलीकर आणि काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात
नांदेड : भाजप उमेदवार प्रताप चिखलीकर आणि काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात
मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
3 एप्रिल - स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक. 4 एप्रिल - स्थापत्य शहर आणि स्थापत्य उपनगर समिती निवडणूक. 5 एप्रिल - बाजार, विधी, बालकल्याण समितीची निवडणूक. 8, 9, 12 एप्रिल - महापालिकेच्या 24 प्रभाग समितीच्या निवडणुका. युतीनंतर आता या निवडणुकीत भाजप मुंबई महापालिकेतील आपला सत्तेचा वाटा मागतो का हे पाहावं लागेल.
नांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल, कार्यालयाबाहेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी
नांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल, कार्यालयाबाहेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. 40 जणांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातला एकही नाही.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. 40 जणांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातला एकही नाही.
सातारा : आणेवाडी टोलनाक्यावर गोळीबार, टोलचे पैसे देण्याच्या वादातून मध्यरात्री बंदुकीच्या सात फैरी झाडल्या, एक जण जखमी
सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार,
सोलापुरातील चार पुतळा चौकात कार्यकर्ते जमायला सुरुवात, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती
चंद्रपूर : आईसोबत शेतात गेलेल्या दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू, ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा इथली दुर्दैवी घटना, रात्री 1 वाजता बाहेर मृतदेह काढले, मृत मुलांचं वय 8 ते 10 वर्ष

नागपूर : भाजपकडून नितीन गडकरी तर कॉंग्रेसचे नाना पटोले आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
बसपाने जमाल मोहम्मद यांना उमेदवारी दिल्याचं समजतं. ते देखील दुपारी 12 वाजता फॉर्म भरणार आहेत.
मात्र गडबड आहे ती बहुजन वंचित आघाडीत. अधिकृत उमेदवार सागर डबरासे, जे राज्य महासरचिटणीस आहेत, पण हा उमेदवार नाहीच असा मेसेज अॅड. संदीप नंदेश्वर फिरवत आहेत. तिथे एमआयएमचा माजी शहर अध्यक्ष शकील पटेलनेही फॉर्म भरला आहे.
नागपूरमध्ये लोकसभेसाठी भाजपकडून नितीन गडकरी तर कॉंग्रेसचे नाना पटोले आज अर्ज भरणार, बसपाचे उमेदवार जमाल मोहम्मदही आज दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज भरणार
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील उमेदवार आज अर्ज भरणार. नितीन गडकरी, हंसराज अहिर, अशोक नेते, प्रीतम मुंडे, संजय धोत्रे आज अर्ज दाखल भरतील.
सातारा : आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोरभाऊ तपासे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तपासे यांच्या निधनाने चळवळीतील नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
Background
1. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, दिग्गज नेते पदयात्रा काढून उमेदवारी अर्ज भरणार
2. कोल्हापुरातल्या विराट सभेत प्रचाराचा नारळ फोडत मुख्यमंत्र्यांचं महाआघाडीवर शरसंधान, माढ्यातून माघार घेणाऱ्या शरद पवारांनाही टोला
3. 56 इंचं छातीवाले कुलभूषण जाधवांना का सोडवून आणत नाहीत, महाआघाडीच्या प्रचारसभेत शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
4. वसंतदादा पाटलांचे नातू प्रतिक पाटलांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं जाहीर, 'एबीपी माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्बत
5. एकनाथ गायकवाडांकडे पैसे आहेत, त्यांनी कार्यकर्त्यांकडेही बघावं, काँग्रेसच्या सभेत संजय निरुपमांचं वादग्रस्त विधान
6. आयपीएलच्या बाराव्या मोसमात मुंबई इंडियन्सची निराशाजनक सुरुवात, दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव, तर कोलकाताची हैदराबादवर मात