LIVE BLOG | पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेशाचा विचार : गिरीश महाजन

देशासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 13 May 2019 09:55 PM
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला एक आठवड्याची मुदतवाढ,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय
अहमदनगर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची सरकारवर टीका, सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही, आचारसंहिता लागू होण्याआधी सरकारने प्रशासनाला सूचना देणं गरजेचं होतं, चारा छावण्यांमध्ये जनावरांच टॅगिंग करणं उचित नाही, छावण्यांना GST कशाला? बाळासाहेब थोरातांचा सवाल
नाशिक : सकाळपासून शहरात 944 हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई, हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी 4 वाजेपर्यंत 4 लाख 72 हजारांचा दंड वसूल
शरद पवारांच्या दुष्काळी दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं पाकीट मारलं : शरद पवार चार छावणीला भेट देत असताना गर्दीत चोरांनी हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीचे पारगाव घुमरा जिल्हा परिषद गट प्रमुख राज घुमरे यांचं पाकीट मारलं गेलं. तब्बल दहा हजार रुपये चोरीला गेले आहेत.
मेळघाटच्या हरिसालमध्ये अवकाळी पाऊस :
अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटमधील हरिसाल गावात आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास अवकाळी पाऊस आल्याने एकच धंदल उडाली. या पावसामुळे उन्हापासून त्रस्त झालेल्या मेळघाटवासियांना गारवा अनुभवायला मिळत आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांमध्ये 'वर्षा'वर बैठक, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर हालचालींना वेग, महाजन आझाद मैदानावर विद्यार्थ्यांची भेट घेणार, आचारसंहिता शिथिल करुन सरकारला प्रवेशाबाबत निर्णय घेण्याची मुभा देण्यासाठी केली विनंती

ठाणे : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचे विद्यार्थी राज ठाकरे यांच्या भेटीला ठाण्यात, विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आझाद मैदानातून ठाण्यात, राज्य सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने राज ठाकरे यांना साकडे
शरद पवारांशी चर्चेनंतर छावणी बंद करण्याच्या निर्णयास छावणी मालकाकडून तूर्तास स्थगिती :-

बीड मधील चारा छावणी मालक उद्यापासून छावणी बंड करणार होते. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. पवारांशी केलेल्या चर्चेनंतर छावणी मालकांनी या निर्णयास तूर्तास स्थगिती दिली आहे.
डोंबिवली : डोंबिवलीत राज्यस्तरीय कॅरम खेळाडूचा अपघाती मृत्यू झाला. जान्हवी मोरे असं मृत कॅरम खेळाडूचं नाव आहे. डोंबिवलीच्या पलावा सिटी सर्कल इथे तिला डंपरने उडवलं. रविवारी संध्याकाळी सुमारास ही दुर्घटना घडली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे.

दुष्काळ दौरा : शरद पवारांनी बीडमधील पाटोदा तालुक्यातील सौताडा गावाला भेट दिली, पिण्यासाठी पाणी नसल्याची चारा छावणीतील लोकांची तक्रार, जनावर आणि लोकांना अशुद्ध पाणी मिळत असल्याने त्रास होत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक थांबवली, लोणावळा एक्झिटजवळ काम सुरु असल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली, दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आले होते. पण मुख्यमंत्री तिथे नसल्याने त्यांना परत जावं लागलं.
प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला
पुणे : हॉटेलचा पत्ता न सांगितल्याने युवकावर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी पुण्यात घडली. सनी चौधरी असं जखमी तरुणाचं नाव आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबादास होंडे याला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या मराठा विद्यार्थ्यांचं मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे.

सात दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलकांची आज अजित पवार यांनी भेट घेतली.

कोणाच्याही तोंडाचा घास नाही तर हक्काचं मागत आहे, असं सांगत राष्ट्रवादीने आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तर आंदोलनाचं राजकारण नको तर प्रवेशासाठी मार्ग काढण्याचा आग्रह विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान अजित पवार गिरीष महाजन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. त्यांच्यासोबत काही विद्यार्थीही आहेत.
व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी चंदा कोचर यांची ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरु, चंदा कोचर आणि पती दीपक कोचर ईडीच्या मुख्यालयात दाखल
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकड़े जाणाऱ्या मार्गावर जाळपोळ, टँकर, दोन सिमेंट काँक्रिट मिक्सर मशीन, रोड रोलर आणि सेंट्रिंग वापराच्या साहित्य जाळलं
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकड़े जाणाऱ्या मार्गावर जाळपोळ, टँकर, दोन सिमेंट काँक्रिट मिक्सर मशीन, रोड रोलर आणि सेंट्रिंग वापराच्या साहित्य जाळलं
अहमदनगर : कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात रोहित पवार यांना उमेदवारी द्या, ते 100 टक्के निवडून येतील, शरद पवार यांच्या दुष्काळ दौऱ्यात गावकऱ्यांची मागणी
अहमदनगर : कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात रोहित पवार यांना उमेदवारी द्या, ते 100 टक्के निवडून येतील, शरद पवार यांच्या दुष्काळ दौऱ्यात गावकऱ्यांची मागणी
ठाण्यात मनसे पदाधिकरी, नगरसेवक यांचं शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, बाबू आगस्कर, परशुराम उपरकर, प्रकाश भोईर असे महत्त्वाचे नेते या शिबिरीला उपस्थित राहणार आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे दुपारी 3 वाजता शिबिराला संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणूक, दुष्काळ दौरा, कार्यकर्त्यांची सध्याची मनस्थिती याचा आढावा घेण्यासाठी हे शिबीर घेण्यात आलं आहे.

हिंगोलीमधल्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार इथे रात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान 7 दुकानांमध्ये चोरी झाली आहे. चोरटे शटर तोडून दुकानात घुसले. राधिका गिफ्ट सेंटर, सावजी गोळी भांडार, शिवशाही रेडिमेड, श्रावणी किराणा, चक्रधर किराणा आणि संदीप बार या दुकानांमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री हात साफ केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

दारुच्या आहारी गेलेल्या तरुण मुलाची जन्मदात्या आई-वडिलांनी विष पाजून हत्या केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे इथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी आई-वडिलांसह मानलेला मामा आणि अन्य दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनिकेत वाळवेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मद्यप्राशन करुन शिवीगाळ आणि पैशाची मागणी करत असल्याने त्याला विष पाजल्याची कबुली आई-वडिलांनी दिली आहे.
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कोपरजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतुकीवर परिणाम, डोंबिवलीहून सीएसटीकडे जाणारी धिम्या लोकलची वाहतूक ठप्प
काँग्रेसच्या 40 पेक्षा जास्त जागा आल्या तर मोदी फाशी घेणार का? काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचं वादग्रस्त विधान
पिंपरी चिंचवड : बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार, चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Background

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

    1. मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा कोरलं विजेतेपदावर नाव; रोमांचक सामन्यात चेन्नईचा अखेरच्या चेंडूवर अवघ्या एका धावेनं पराभव

    1. मोदी सत्तेत आल्यापासून देशानं खूप सोसलंय, मतदानानंतर प्रियंका गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा, सहाव्या ट्प्यात दिल्लीसह सात राज्यात 63 टक्के मतदान

    1. आखाती देशात रक्ताचे पाट वाहणारी दहशतवादी संघटना आयसिसची भारतावर वक्रदृष्टी, काश्मीरमध्ये पाय रोवण्यास सुरूवात, 'विलायाह ऑफ हिंद'ची घोषणा

    1. फोनवरुन महिती घेण्यापेक्षा जमिनीवरुन उतरुन दुष्काळ पाहा, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला, पवारांकडून माण तालुक्यातील परिस्थितीची पाहणी

    1. दादरच्या पोलीस वसाहतीत राहत्या घरी आगीत होरपळून 15 वर्षीय तरूणीचा मृत्यू, दुर्घटनेवेळी बाहेरून दरवाजा बंद असल्याचं उघड, शेजाऱ्यांनी वर्तवली आत्महत्येची शक्यता

    1. पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीमध्ये वायू गळती, तीन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू, उपचार करणारे डॉक्टरही आयसीयूत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.