LIVE BLOG | मुंबईसह कोकणात 'हे' उमेदवार जिंकतील
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पक्षात प्रवेश केला
ABP News Bureau
Last Updated:
27 Mar 2019 11:55 PM
मुंबईसह कोकणातील एकूण 12 जागांपैकी शिवसेनेचे 7 उमेदवार विजयी होतील, भाजपला 3 जागा मिळतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा जिंकता येईल
हिंगोली : शिवसेना पक्षाकडून 2009 हिंगोलीचे खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर हिंगोली लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
, तर शिवसेनेचे हेमंत पाटील यांनीदेखील लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरल्यामुळे आजी-माजी शिवसैनिकांमध्ये हिंगोली लोकसभेसाठी टक्कर होणार आहे.
भिंवडीची जागा काँग्रेसला मिळेल तर रायगडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल.
सिंधुदुर्ग : वातावरणातील बदलामुळे आंबा व काजू उत्पादन धोक्यात , सध्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरण ढगाळ दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी अतिशय तुरळक पाऊस पडून गेला आहे. अशा या ढगाळ व पावसाळी सदृश्य वातावरणात आंबा काजू पिकांची कीड व रोगापासून विशेष काळजी घ्यावी आणि फळ संशोधन केंद्राने जाहीर केलेल्या उपाय योजना करावी असे आवाहन प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.प्रदीप हळदवणेकर यांनी केले आहे.
लोकसभा निवडणूक-2019 :
छाननीमध्ये पहिल्या टप्प्यातील 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध :-
लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघातील नामनिर्देशन पत्रांची काल छाननी झाली. छाननीमध्ये 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली.
पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 184 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. छाननीअंती लोकसभा मतदार संघ निहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : वर्धा लोकसभा मतदार संघात 16, रामटेक मतदार संघात 21, नागपूर मतदार संघात 33, भंडारा-गोंदिया मतदार संघ- 23, गडचिरोली- चिमूर मतदार संघात 6, चंद्रपूर मतदार संघात 17 आणि यवतमाळ- वाशीम मतदार संघात 31 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली.
मुंबईसह कोकणातील एकूण 12 जागांपैकी शिवसेनेचे 7 उमेदवार विजयी होतील, भाजपला 3 जागा मिळतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा जिंकता येईल
ईशान्य मुंबईच्या जागेसाठी इच्छुकांचं मातोश्रीवर लॉबिंग सुरू, प्रवीण छेडा यांनी घेतली उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट, किरीट सोमय्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार अजूनही कायम
पालघर, कल्याण, ठाणे, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या सात मतदार संघांमधून शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील
पालघर, कल्याण, ठाणे, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या सात मतदार संघांमधून शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील
उत्तर मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई या तीन मतदार संघांमधील भाजप उमेदवार जिंकतील
उत्तर मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई या तीन मतदार संघांमधील भाजप उमेदवार जिंकतील
एबीपी माझाच्या सर्वेक्षणानुसार पश्चिम महाराष्ट्रातील 12 मतदार संघांपैकी 4 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होतील, 4 मतदार संघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील, तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होतील, तर हातकणंगले मतदार संघात स्वाभिमानीचे राजू शेट्टी विजयी होतील.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पक्षप्रवेश
बारामती, माढा आणि सातारा मतदार संघांमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा राहणार एबीपी माझाचे सर्वेक्षण
बारामती, माढा आणि सातारा मतदार संघांमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा राहणार एबीपी माझाचे सर्वेक्षण
शिर्डी, मावळ, शिरुर, कोल्हापूर मतदार संघांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांची सरशी होणार, एबीपी माझाच्या सर्वेक्षणाचा अंदाज
अभिमान आणि आनंदाची गोष्ट, 'ऑपरेशन शक्ती'चं उद्धव ठाकरेंकडून कौतुक, जवान असो की शास्त्रज्ञ, प्रत्येक जण आपली कामगिरी बजावतो. त्यांना सरकारच्या पाठबळाची गरज, हे पाठबळ सरकार देतं, ही आनंदाची गोष्ट. देशाची प्रतिमा उचवण्याचं काम शास्त्रज्ञांनी केल्याचीही भावना
मावळ मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार जिंकणार, पार्थ पवार निवडणुक हरणार एबीपी माझाच्या सर्वेक्षणाचा अंदाज
मावळ मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार जिंकणार, पार्थ पवार निवडणुक हरणार एबीपी माझाच्या सर्वेक्षणाचा अंदाज
पश्चिम महाराष्ट्र : पुणे, सांगली, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये भाजपच्या उमेदवारांची सरशी होणार, एबीपी माझाचे सर्वेक्षणाचा अंदाज
सोलापूर : भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेशवर शिवाचार्य महास्वामी, सुशीलकुमार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज वैध, अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर, तर महास्वामींच्या जात प्रमाणपत्रावर घेतली होती हरकत
एबीपी माझाच्या सर्वेक्षणानुसार उत्तर महाराष्ट्रातील 06 मतदार संघांपैकी 4 जागांवर भाजपचे उमेदवार विजय होतील तर शिवसेना, काँग्रेसला प्रत्येकी जागा मिळेल
मुंबई : भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का, खडसे समर्थकांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केलेल्या अब्रु नुकसानीच्या 32 पैकी 21 खटल्यांना हायकोर्टाची स्थगिती, उर्वरीत 11 खटल्यांबाबत स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे दमानियांना निर्देश
उत्तर महाराष्ट्र : धुळे, जळगाव, रावेर आणि दिंडोरी या चार मतदार संघांमध्ये भाजपचा दबदबा राहणार
#BREAKING जालना : रावसाहेब दानवे दुसऱ्यांदा शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांच्या घरी, शिवसैनिकांच्या मनोमिलनाचा प्रयत्न, रावसाहेब दानवे-अर्जुन खोतकर यांची शिवसैनिकांसोबत संयुक्त बैठक
नाशिकमध्ये शिवसेनेचा उमेदवार विजयी होणार
औरंगाबाद : शिवसेनेने औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडली, महापौर बंगल्यावर झालेल्या शिवसेना-भाजपच्या बैठकीनंतर सेना खासदार चंद्रकांत खैरे यांची घोषणा
नंदुरबारमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार
नंदुरबारमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार
एबीपी माझाच्या सर्वेक्षणानुसार मराठवाड्यातील 08 मतदार संघापैकी 3 मतदार संघांमध्ये भाजप, 2 मतदार संघांत शिवसेना, 2 मतदार संघात काँग्रेस आणि एका मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 25 टक्के पाणीसाठा शिल्लक, गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 टक्के कमी पाणीसाठी, वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होण्याचीही भीती, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन
परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जिंकणार
लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब एकवीरा देवीच्या चरणी
औरंगाबाद आणि उस्मानाबादेत शिवसेनेचे उमेदवार जिंकणार
औरंगाबाद आणि उस्मानाबादेत शिवसेनेचे उमेदवार जिंकणार
जालना, बीड आणि लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकणार, एबीपी माझाचे सर्वेक्षण
यू ट्यूबवर पंतप्रधान मोदींच्या संदेशाची जवळपास 15 हजार जण वाट पाहत आहे.
हिंगोली आणि नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकणार
हिंगोली आणि नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकणार
चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमुर मतदार संघांमध्ये भाजपची सरशी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला उद्देशून संदेश देणार, स्वत: मोदींची ट्वीटद्वारे माहिती
विदर्भातील कोणत्या मतदार संघात कोणाचा खासदार होणार
बुलडाणा – शिवसेना,
अकोला – भाजप,
अमरावती – शिवसेना,
रामटेक – काँग्रेस,
वर्धा – भाजप,
नागपूर – भाजप,
भंडारा - गोंदिया भाजप,
चंद्रपूर – भाजप,
गजचिरोली-चिमुर – भाजप,
यवतमाळ-वाशिम - शिवसेना
भाजपाध्यक्ष अमित शाह 30 मार्चला गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज भरण्यापूर्वी अहमदाबादमध्ये रोड शो करणार
नागपूर आणि भंडारा-गोंदिया मतदार संघांमध्ये भाजपचे उमेदवार जिंकणार, एबीपी माझाचे सर्वेक्षण
रामटेक आणि वर्धा मतदार संघांमध्ये भारतीय जनता पक्षाची सरशी होणार
नवी दिल्ली : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज दुपारी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासह उर्मिला दिल्ली विमानतळावर दाखल
अमरावती आणि यवतमाळमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकणार, एबीपी माझाचे सर्वेक्षण
अमरावती आणि यवतमाळमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकणार, एबीपी माझाचे सर्वेक्षण
अकोल्यात भाजपचा उमेदवार जिंकणार, #Kaulmarathimanacha #MoodDeshacha
अकोल्यात भाजपचा उमेदवार जिंकणार, #Kaulmarathimanacha #MoodDeshacha
बुलडाण्यात शिवसेनेचा उमेदवार जिंकणार, एबीपी माझाचे सर्वेक्षण
मुख्यमंत्र्यांच्या नावे ‘लेडीज बार' तर महापालिका आयुक्तांच्या नावे ‘हुक्का पार्लर’, पडताळणीविना ऑनलाईन प्रमाणपत्र देताना मुंबई महापालिकेचा सावळागोंधळ
पुणे : पुण्याचे भाजप उमेदवार गिरीश बापट राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या भेटीला, कोथरुडमधील गिरीश बापटांच्या पहिल्या सभेला काकडेंच्या अनुपस्थितीमुळे काकडेंची नाराजी दूर न झाल्याची चर्चा
नांदेड : सांगलीचे नगरसेवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भेटीला, चव्हाणांच्या नांदेड मधील निवासस्थानी बैठक, 22 नगरसेवक, तीन जिल्हा परिषद सदस्य चव्हाणांच्या भेटीला, विशाल पाटील यांना तिकीट देण्याची नगरसेवकांची मागणी
गुजरात : पोरबंदरजवळ गुजरात एटीएस आणि ड्रग्ज माफिया भिडले, 500 कोटींचं ड्रग्ज घेऊन पाकिस्तानहून बोट येताना कारवाई, 9 इराणी नागरिकांना अटक
#Loksabha2019 भाजपकडून आज माढ्याचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता, रणजितसिंह निंबाळकरांचं नाव मागे पडून पुन्हा मोहिते पाटील यांचं नाव चर्चेत
#Loksabha2019 भाजपकडून आज माढ्याचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता, रणजितसिंह निंबाळकरांचं नाव मागे पडून पुन्हा मोहिते पाटील यांचं नाव चर्चेत
औरंगाबाद : पडेगावमधील कासंबरी दर्गा परिसरातील रबिया बसरिया लीलबनात मदरशातील 67 जेवणातून मुलींना विषबाधा झाली आहे. या मुलींना रात्री उशिरा घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. यापैकी दोन मुलींची तब्येत बिघडली असून इतर मुलींची तब्येत स्थिर आहे. या मुलींनी सिल्लेखाना परिसरातील दावतमध्ये बिर्याणी खाल्ली होती. मदरशात पोहोचल्यानंतर मुलींना उलट्या आणि मळमळ सुरु झाली.
मुंबई : किरीट सोमय्यांसमोरील अडचणी वाढल्या, मुख्यमंत्र्यांकडे शिवसैनिकांची पुन्हा तक्रार, राज्यात शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकत्र, तरी ईशान्य मुंबईत सोमय्यांना तिकीट देऊ नका, मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या बैठकीत मागणी, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. राहुल गांधींच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकरचा आज काँग्रेस प्रवेश, गोपाळ शेट्टींविरोधात तिकीट मिळण्याची शक्यता तर उद्या शत्रुघ्न सिन्हांचाही प्रवेश
2. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमधल्या बैठकीतही सोमय्यांच्या उमेदवारीचा फैसला नाही, शिवसेनेविरोधातली आगपाखड भोवण्याची शक्यता
3. भाजपमधील बड्या नेत्याने ऑफर दिल्याचा सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, 'एबीपी माझा'ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, मात्र भाजप नेत्याचं नाव सांगण्यास नकार
4. आघाडी करुनही कुत्र्या-मांजरांसारखं भांडतात, गुजरातमधील सभेत पूनम महाजन यांचा घणाघात, मनसेवरही जोरदार टीकास्त्र
5. गिरीश महाजनांनी घात केला, तिकीट कापल्यानंतर खासदार एटी पाटलांची जाहीर नाराजी, महाजन निशाण्यावर
6. अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जची दिल्ली कॅपिटल्सवर सहा विकेट्सनी मात, अखेरच्या षटकात चेन्नई विजयी