LIVE BLOG | लोकसभा निवडणूक 2014 राडा प्रकरण, शिवसेना खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नीला एका वर्षाची कैद

साल 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तुर्भे येथे झालेल्या राड्याचं प्रकरण, हाणामारीत एक पोलीस हवालदार झाला होता गंभीर जखमी, कामिनी शेवाळे यांच्यासह 17 जणांना हायकोर्टात दाद मागण्यासाठी तूर्तास जामीन मंजूर

ABP News Bureau Last Updated: 30 Apr 2019 11:34 PM
शिवसेना खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नीला एका वर्षाची कैद, साल 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तुर्भे येथे झालेल्या राड्याचं प्रकरण, हाणामारीत एक पोलीस हवालदार झाला होता गंभीर जखमी, कामिनी शेवाळे यांच्यासह 17 जणांना हायकोर्टात दाद मागण्यासाठी तूर्तास जामीन मंजूर
सोलापूर : वंचित आघाडीचे जिल्हा संघटक माऊली हळणवर यांच्यासह एका व्यक्तीवर तलवारीने हल्ला, वैयक्तिक वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती
नांदेड : सांगवी येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात पाच जण गंभीर जखमी, स्फोटामुळे स्लॅबचे घर कोसळले, जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल

मुंबई : कलानगरमधील म्हाडा कार्यालयाशेजारील वृक्ष छाटणीविरोधात हायकोर्टात याचिका, महापालिकेच्या उद्यान विभागाला पाहणी करुन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे कोर्टाकडून निर्देश, वृक्ष छाटणीची परवानगी म्हणजे त्यांची कत्तल करण्याचा परवाना नव्हे : हायकोर्ट
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वेधशाळेत आज 47 अंश तापमानाची नोंद
लातूर: राजर्षी शाहू महाविद्यालयाचे 180 विद्यार्थी जेईई अॅडवान्स परीक्षेसाठी पात्र, 99 टक्क्यांच्या पुढील विद्यार्थी संख्या 12
कोल्हापूर: अवैध व्यवसायिकांशी लागेबांधे कोल्हापूर पोलिसांच्या अंगलट, कोल्हापूरचे महादेव रेपे , नारायण गावडे, अमित सुळगावकर हे तीन पोलीस कर्मचारी निलंबित
राज्यातील आचारसंहिता शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवडणूक आयोगाला पत्र, दुष्काळाच्या उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता अडसर ठरु नये यासाठी मागणी
आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा, सूरत सत्र न्यायालयाचा निकाल

Gujarat: Narayan Sai, son of Asaram who was found guilty in a rape case by Surat Sessions Court, has been sentenced to life imprisonment. (file pic) pic.twitter.com/R80kNXo5v6— ANI (@ANI) April 30, 2019

राफेल फेरविचार याचिकेवर 4 मे पर्यंत उत्तर द्या, सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला सूचना, 6 मे रोजी सुनावणी
राफेल फेरविचार याचिकेवर 4 मे पर्यंत उत्तर द्या, सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला सूचना, 6 मे रोजी सुनावणी
अख्ख्या देशाला माहित आहे की, राहुल गांधी भारतीय आहेत. राहुल गांधींचं जन्म आणि पालनपोषण भारतात झाल्याचं लोकांनी पाहिलं आहे. क्या बकवास है यह?, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नोटीसनंतर दिली आहे. राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याची तक्रार भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली होती.

माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंतराव डोळस याचं निधन झालं. हनुमंतराव डोळस यांना आतड्याचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी 10 वाजता माळशिरस इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस मुंबई महापालिका आयुक्तांच्या भेटीला, अंगणवाडी सेविकांच्या समस्यांबाबत चर्चा
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी यांच्याविरोधात आचारसंहिताभंगाच्या तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक सुरु
गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल 89.59 टक्के,
▶️कला शाखा 87.73 टक्के
▶️वाणिज्य शाखा 91.86 टक्के
▶️विज्ञान शाखा 91.76 टक्के
▶️व्होकेशनल शाखा 84.45 टक्के

उत्तीर्णांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण 86.91 टक्के तर विद्यार्थिनींचे प्रमाण 91.97 टक्के
नवी मुंबई : पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप, मनसे कार्यकर्ता गंभीर जखमी
नवी मुंबई : पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप, मनसे कार्यकर्ता गंभीर जखमी
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाबाबत सुब्रमण्यम स्वामी यांची तक्रार, केंद्रीय गृहमंत्रालयाची राहुल गांधींना नोटीस, 15 दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

पुणे : गुरुवार पेठेतील इमारतीत गॅस सिलेंडर लीक झाल्याने स्फोट, मायलेक गंभीर जखमी, अग्निशमन दल घटनास्थळी
नाशिक : एकलहरे रोडवरील ऋषिकेश किराणा दुकानावर गुन्हे शाखेचा छापा, 64 हजार रूपयांचा दारूसाठा पोलिसांनी केला हस्तगत, तर एका संशयिताला अटक, नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई : गोरेगावमध्ये कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमधील करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'च्या गोदामाला रात्री दोन वाजताच्या सुमारास भीषण आग, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न

Background

1. लोकसभेसाठी महाराष्ट्रात चारही टप्प्यात सरासरी 61 टक्के मतदान, मुंबईतलं मतदान 4 टक्क्यांनी वाढलं, राजकीय चित्र पलटणार की नाही यावर जोरदार चर्चा

2. मतदानाच्या टक्केवारीत ग्रामीण महाराष्ट्राची सरशी, शहरांतल्या मतदारांकडून घोर निराशा, गडचिरोली अव्वल, तर कल्याणचा शेवटून पहिला नंबर

3. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसह राजकीय दिग्गज मतदानासाठी रांगेत, विजयाचा निर्धार व्यक्त करत चौथ्या टप्प्यातल्या उमेदवारांचंही मतदान

4. मतदानासाठी बिग बीसह  बॉलिवूडच्या तिन्ही खानची हजेरी, दीपिका, अनुष्का आणि प्रियांका चोप्रानेही बजावला मतदानाचा हक्क, मराठी कलाकारांचाही कौतुकास्पद प्रतिसाद

5. तृणमूलचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात, ममता बॅनर्जींना ललकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

6.  मतदान पार पडल्यानंतर दक्षिण मुंबईत अनोखं चित्र, मिलिंद देवरांचा प्रतिस्पर्धी अरविंद सावंत यांना फोन, शुभेच्छांसह उत्स्फूर्तपणाला दिली दाद

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.