LIVE BLOG : 5 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार : प्रकाश जावडेकर

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची चिन्हं, नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत तरुण नेतृत्वाला संधी देण्याची शरद पवार यांची भूमिका

ABP News Bureau Last Updated: 31 May 2019 09:18 PM
#BREAKING
#मुंबई : धारावीच्या विकासासाठी 200 कोटी रुपये दिले जाणार,
म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांचा निर्णय,
केंद्रात मंत्रीमंडळ स्थापन होताच राज्यात विकास प्रकल्पांचा वेग वाढला
5 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार,
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची पत्रकार परिषदेत माहिती
Cricket World Cup 2019 : वेस्ट इंडिजकडून पाकिस्तानवर 7 गडी राखून धुव्वा
शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत 500 रुपयांची वाढ, मोदींच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत निर्णय
खातेवाटपानंतर नव्या मंत्र्यांकडून पदभार स्वीकारण्यास सुरुवात,
नव्या केंद्रीय मंत्रीमंडळाची थोड्याच वेळात बैठक
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची चिन्हं, नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत तरुण नेतृत्वाला संधी देण्याची शरद पवार यांची भूमिका
मेडिकल पीजी प्रवेशात EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार. EWS आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची मुदत 31 मे ऐवजी आता 4 जून पर्यँत वाढवून मिळणार. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची माहिती
मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, राजनाथ सिंह संरक्षण मंत्री, तर अमित शाह यांच्याकडे गृह खात्याचा कारभार, निर्मला सीतारमण यांना अर्थ मंत्रालय, तर नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी कायम
राज्याच्या दहाव्या कृषी गणनेनुसार महाराष्ट्राची वैयक्तिक जमीन धारणेत दहा गुंठ्यांनी घट, दहा वर्षांपूर्वी 1.44 हेक्टरवरुन आता 1.34 हेक्टरवर, यवतमाळ, नंदुरबार आणि वर्धा जिल्ह्यांत सरासरी 2 हेक्टर जमीन धारणा, सर्वात कमी जमीन धारणांमध्ये कोल्हापूर 0.74, सातारा 0.78, तर गोंदिया 0.81
मध्य रेल्वेचा खोळंबा, , ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने, दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड, बिघाड दुरुस्त
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी, 214 अंकांनी उसळी घेत सेन्सेक्स 40 हजार 44 (40,044) वर
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी, 214 अंकांनी उसळी घेत सेन्सेक्स 40 हजार 44 (40,044) वर


जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये चकमक, भारतीय लष्कराने चार दहशतवाद्यांना घेरले

Background

 




    1. नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात, राष्ट्रपतींनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ, राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा संपन्न



 




    1. एनडीएच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अमित शाहांना मंत्रिमंडळात स्थान, गडकरी, राजनाथ सिंह, सितारमण यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ



 




    1. महाराष्ट्रातल्या 7 नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी, गडकरी, गोयल आणि जावडेकरांना मिळणार महत्त्वाची खाती, अरविंद सावंतांनाही कॅबिनेट



 




    1. शपथविधी सोहळ्यात शरद पवारांना चक्क पाचव्या रांगेतला पास, लक्ष वेधूनही जागा बदलून दिली नाही, पवारांची शपथविधी सोहळ्याला गैरहजेरी



 




    1. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, इंटरसिटी एक्स्प्रेसचा वेळ 45 मिनिटांनी वाचणार, अडीच तासांचा प्रवास



 




    1. विश्वचषकाच्या सलामीलाच यजमान इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर १०४ धावांनी दणदणीत विजय, इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सची अष्टपैलू कामगिरी निर्णायक



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.