LIVE BLOG | भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञाला निवडणूक आयोगाचा दिलासा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
ABP News Bureau
Last Updated:
18 Apr 2019 11:37 PM
भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला निवडणूक आयोगाचा दिलासा, कायद्यानुसार साध्वी प्रज्ञावर बंदी घालू शकत नसल्याचं स्पष्टीकरण
कल्याण : लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. कल्याण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवा कृष्णमूर्ती अय्यर यांच्यावर 420 च्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने अय्यर यांना 20 एप्रिलपर्यंत मुंब्रा पोलिसांकडे कस्टडी दिली आहे.

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला लोकसभा निवडणूक लढण्याची परवानगी न देण्याबाबत एनआयए कोर्टात याचिका
दाखल झाली आहे. 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटात मुलगा गमावलेल्या नासिर बिलाल यांनी ही याचिका केली आहे. इतर आरोपींसह
साध्वी प्रज्ञासिंहला मुंबईतील एनआयए कोर्टात सुनावणीसाठी नियमित हजेरी लावण्याचे निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

मुंबई : सोहराबुद्दीन कथित बनावट चकमकप्रकरणी 22 आरोपींना निर्दोष सोडण्यात आलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
देण्यात आलं आहे. सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका
दाखल केली आहे. सोहराबुद्दीन शेख, कौसर बी आणि तुलसीराम प्रजापती यांच्या चकमकप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने 21 डिसेंबर 2018 रोजी 22 आरोपी निर्दोष असल्याचा निर्णय दिला होता.
निर्दोष सुटका झालेल्यांमध्ये बहुतांश गुजरात आणि राजस्थान पोलिस दलातील अधिकारी आहेत.

गोवा : माजी आमदार बाबुश मोन्सेरात यांनी समर्थकांसोबत केला काँग्रेसमध्ये प्रवेश, पणजीची पोटनिवडणूक लढवण्यासाठी गोवा फॉरवर्ड सोडला
आयटी अभियंत्याची बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या. वाकडच्या रॉयल रहाडगी ग्रीन सोसायटीमधील घटना. रोहित बापूराव पाटील असं 28 वर्षीय अभियंत्याचे नाव होते. आजारपणातून हे पाऊल उचलल्याची पोलिसांची माहिती. रोहित भावासोबत राहत होता, भाऊ कंपनीत गेल्यावर दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

गीतांजली एक्सप्रेसचे इंजिन ठाणे स्थानकात फेल, गाडी अजूनही ठाणे स्थानकात उभी, सकाळी 6.55 ला कल्याण ला पोचणारी गाडी अजूनही ठाणे स्थानकात,
प्रवाशांचे प्रचंड हाल, यामुळे इतर एक्सप्रेस गाड्या देखील उशिराने
प्रवाशांचे प्रचंड हाल, यामुळे इतर एक्सप्रेस गाड्या देखील उशिराने
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक
Background
1. राज्यात 10 ठिकाणी आज लोकसभेसाठी मतदान, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदेसह दिग्ग्जांची प्रतिष्ठा पणाला
2. देशभरातही आज 12 राज्यातल्या 95 जागांसाठी मतदान, केंद्रातल्या 4 मंत्र्यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार
3. निवडणुकांसाठी सरकारनं 40 जवानांना ठार मारलं, पुलवामा हल्ल्यावरून राज ठाकरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातल्या सभेत परिचारकांवरही हल्लाबोल
4. लोकसभेच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचं ओबीसी कार्ड, मागास असल्यानंच विरोधकांनी लायकी काढल्याचा दावा
5. जेट एअरवेजची सर्व उड्डाणं काल रात्रीपासून बंद, 20 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ, मदत देण्यास बँकांचा नकार
6. चेन्नई सुपर किंग्सला कर्णधार महेंद्रसिंह धोनची पाठदुखी महागात, हैदराबादकडून चेन्नईचा सहा विकेट्सनी धुव्वा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -