LIVE BLOG : मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी नाही, चीनचे प्रस्तावाविरोधात मतदान

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेंबाबत काँग्रेसमध्ये अविश्वास आहे, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत विखे-पाटलांवर तोफ डागली. विखेंनी पक्षाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचीही मागणी थोरातांनी केली

ABP News Bureau Last Updated: 13 Mar 2019 11:43 PM
मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी नाही, चीनचे प्रस्तावाविरोधात मतदान , चीनकडून व्हिटो पावरचा वापर
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने फ्रान्सचा प्रस्ताव नाकारला,
आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनचा नकार

कोल्हापूरचे माजी आमदार सुरेश साळोखे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार
लोकसभेची निवडणूक घोषित झाल्यावर मंत्री हंसराज अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, आमची युती कोणा व्यक्तीशी नाही तर शिवसेना या पक्षाशी आहे, आमची युती काल होती, आज आहे आणि उद्याही राहील, शिवसेनेचे कार्यकर्ते आमचं काम करतील, मी कधीच शिवसेनेच्या नेत्यांची तक्रार केली नाही
.
राजू शेट्टी यांच्या जगावाटपावर उद्या तोडगा निघण्याची शक्यता, जागावाटप संदर्भात शरद पवार यांच्या मध्यस्थीने अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांची फोनवरून चर्चा
,
काँग्रेस स्वाभिमानाला वर्धा किंवा सांगली जागा देण्याची शक्यता
,
राष्ट्रवादीकडून हातकणंगले तर काँग्रेसकडून एक जागेवर राजू शेट्टी यांचा पक्ष लढणार
भाजप बरोबर स्वाभिमानी या खोडसाळ बातम्या, शिवारात कमळ उगवण्यात माझा हात होता पण आता कमळ नष्ट करण्यात पण माझा हात असणार : राजू शेट्टी
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यामुळे दिल्लीच्या निर्णायक वन डेत टीम इंडियाला 35 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं पाच वन डे सामन्यांची ही मालिका 3-2 अशी खिशात घातली.

मुंबईच्या घाटकोपर पूर्व येथील 90 फूट रस्त्यावर शिवनेरी चौक येथे आज पहाटे साडे तीनला एक दुचाकी आणि मोटारकारचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. प्रमोद देवकुळे असे दुचाकीस्वाराचे नाव असून ते वर्सोवा पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत आहेत.
पालघर : चालकाचा ताबा सुटल्याने वरई येथे बसला अपघात,
13 विद्यार्थी जखमी 5 विद्यार्थी गंभीर जखमी
सांगली : बेकायदा गुटखा प्रकरणी 106 कोटीची दंडात्मक कारवाई, GST ची कारवाई, जयसिंगपूर, हरिपूर आणि चिप्री येथील कारखान्यांच्या मालकांवर कारवाई
सांगली : बेकायदा गुटखा प्रकरणी 106 कोटीची दंडात्मक कारवाई, GST ची कारवाई, जयसिंगपूर, हरिपूर आणि चिप्री येथील कारखान्यांच्या मालकांवर कारवाई
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे संभाव्य उमेदवार डॉ. जय सिध्देश्वर महास्वामीजी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
चंद्रपूर : होळी आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची अवैध दारु विक्री विरोधात कारवाई, खंजर मोहल्ला परिसरातून जप्त केली 175 पेटी देशी- विदेशी दारु, जप्त दारूची किंमत 19 लाख

अण्णांच्या आंदोलनाला सर्वात जास्त कस लागला. अण्णांचे वय, त्यांची तब्येत बघता ते कठीण परीक्षा होती : गिरीश महाजन

मला शायनिंग मारायला आवडत नाही, जबाबदारी १०० टक्के पार पाडतो. - गिरीश महाजन
गिरीश महाजन यांची तोंडी परीक्षा : मला शायनिंग मारायला आवडत नाही, दिलेली जबाबदारी 100 टक्के पार पाडतो.
मला हे काम जमत म्ह्णून माझ्याकडे येतेय, यामुळं माझ्याविषयी अन्य मंत्र्यांचा मत्सर नाही. मला एखाद काम जमलं नाही तर ते दुसऱ्याकडे दिले जाते. सुदैवाने माझ्याकडून अनेकदा यशस्वी शिष्टाई होते, माझ्याकडून मुख्यमंत्र्यांनी दिलेलं एकही काम राहिलं नाही, 100 टक्के यशस्वी झालो.
भाजपचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची तोंडी परीक्षा
रायगड : पार्थ पवार यांनी महड येथील गणेशाचे दर्शन घेतले ,
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड येथील गणेशाचे दर्शन घेतले
पवार हे राष्ट्रवादीचे सेनापती आहेत त्यांच्या माघारी घेण्याने त्यांच्या इतर उमेदवारांचे मनोधैर्य खचले आहे. पवारांना मतदारसंघातून मिळालेल्या रिपोर्टमुळेच त्यांनी माघार घेतली, मंत्री सुभाष देशमुख यांची टीका...

वेर्णा(गोवा) झुवारी नदीवरील बांधकाम सुरु असलेला पुलाचा स्लॅब कोसळला, दुर्घटनेत चारजण जखमी, वेर्णामधील केसरव्हाळ हॉटेलजवळील घटना
सांगली : काँग्रेस जर सांगली लोकसभेची जागा राष्ट्रवादीला द्यायला तयार असेल आणि राष्ट्रवादीने माझ्या नावाचा विचार केला, तर मी सांगलीतून लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची माहिती

जालना लोकसभेचा निर्णय संयुक्तिक बैठकीत ठरणार, ज्या दिवशी मला उद्धव ठाकरेंचा आदेश येईल, तेव्हा मी खरं समजेन, उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य आहे, शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य

आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण, माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो, म्हणून शिवसेना सर्वसामान्यांचा पक्ष, उद्धव यांचा शरद पवारांना टोला, लवकरच उमेदवार यादी जाहीर करणार

साताऱ्याच्या जागेवर शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव, तसेच नरेंद्र पाटील याचं नाव चर्चेत, नरेंद्र पाटील सध्या भाजपमध्ये आहेत, पण 1995 साली साताऱ्याची जागा शिवसेनेनं लढवली होती, त्यामुळे ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यास पाटलांचंही नाव चर्चेत

संभाजी ब्रिगेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, शिवसेना-भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला करणार प्रखर विरोध, सोलापूर, पुणे, माढा, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबादसह 18 जागा लढवणार, माढ्यातून विश्वंभर काशिद उमेदवार, पत्रकार परिषदेत घोषणा

पार्थ पवारांसाठी वडील अजित पवारांनी कंबर कसली, पार्थ यांना उमेदवारी मिळण्याचं स्पष्ट झाल्यावर अजित पवारांची पनवेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक, मावळमध्ये जोरबैठका, पार्थ पवारांचाही आज पहिला दौरा, एकविरा देवी आणि महाड अष्टविनायकाच्या दर्शनाने कामाला सुरुवात
जे डे हत्याकांड प्रकरणी निर्दोष सुटलेल्या पत्रकार जिग्ना व्होरा आणि स्थानिक नेता जॉन पॉल्सन जोसेफ यांच्या दोषमुक्तीला सीबीआयकडून हायकोर्टात आव्हान, पॉल्सनविरोधातील याचिका तीन आठवड्यांसाठी तहकूब, तर जिग्ना विरोधातील अपिलावर 18 मार्चला सुनावणी
आम्ही चौथ्या आघाडीत जाणार नाही, मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य, चौथ्या आघाडीत सामील होण्याच्या चर्चांना सदाभाऊ खोत यांच्याकडून पूर्णविराम, रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपसोबतच राहण्याचा निर्णय

नाशिक : सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथक, आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर थेट कारवाई, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा निर्णय
नाशिक : सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथक, आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर थेट कारवाई, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा निर्णय
वॉर्डात कुणीही बेकायदेशीर होर्डिंग लावल्यास नगरसेवक म्हणून तुम्हीच तक्रार केली पाहिजे, हायकोर्टाची सूचना, बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी भाजप नगरसेवकाच्या अडचणी वाढल्या, मुरजी पटेल यांनी त्यांच्या वॉर्डात एकही बेकायदेशीर होर्डिंग लागणार याची व्यवस्था करावी, हायकोर्टाने फर्मावलं, पालिका कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीची जबाबदारी घेणार की नाही? आठवड्याभरात उत्तर देण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
मनमाड | येवला तालुक्यातील राजपूरमध्ये पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको, पाच दिवसांपासून पाण्याचे टँकर न आल्याने गावात पाणीटंचाई, येवला-नांदगाव रस्त्यावर हंडा-कळशीसह रास्ता रोको सुरु
जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच लढणार आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. मात्र ईशान्य मुंबईचं काय होणार हा प्रश्नही कायम आहे. कारण किरीट सोमय्यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईची जागा कोण लढणार असा सवाल सध्या दोन्ही पक्षांसमोर आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नियामक आणि परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची निवडणुकांच्या कामामधून सुटका, निवडणूक आयोगाचे आदेश, शिक्षक संघटनांच्या मागणीला यश

अहमदनगर : माझ्या राजीनाम्याची माध्यमांनाच घाई, दोन दिवसांनी माध्यमांशी बोलणार, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

अहमदनगर : माझ्या राजीनाम्याची माध्यमांनाच घाई, दोन दिवसांनी माध्यमांशी बोलणार, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील पुस्के गावात रस्त्याच्या कामासाठी असलेली चार वाहनं काल नक्षलवाद्यांनी जाळली. तसंच दोन दिवसांपूर्वी याच गावात एका रोडरोलरही जाळण्याचा प्रयत्न केला होता. 
पुणे : पुण्यातील भाजपच्या नगरसेविकेकडून ससून हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरला मारहाण, मंगळवार रात्री दोन वाजताची घटना, बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल
पुणे : पुण्यातील भाजपच्या नगरसेविकेकडून ससून हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरला मारहाण, मंगळवार रात्री दोन वाजताची घटना, बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा, नैतिकेच्या मुद्द्यावरुन राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा, नैतिकेच्या मुद्द्यावरुन राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती
मुंबईच्या चिंचपोकळी भागात एका चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाला. काल (12 मार्च) दुपारी ही मुलगी बिल्डिंगमध्ये खेळत असताना बेपत्ता झाली. तेव्हापासून तिचा शोध सुरु होता. मात्र संध्याकाळी त्याच बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर ती मृतावस्थेत आढळली. काळाचौकी पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना आणि तिच्या आई-वडिलांना हा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. ही मुलगी केवळ दीड वर्षांची होती. तिची आज वैद्यकीय चाचणी केल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असताना, युतीच्या प्रचाराचा कार्यक्रम ठरला आहे. कोल्हापुरात युतीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ फुटणार आहे.

24 मार्चला कोल्हापुरात

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप युतीची एकत्रित सभा होणार होणार आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रचाराला शुभारंभ करणार आहे.

भाजप प्रवेशानंतर सुजय विखे पाटील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार, लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेची साथ मिळावी यासाठी विनंती, दुपारी 12.30 वाजता 'मातोश्री'वर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन करणार

Background

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर खलबंत, प्रचाराचा मुहूर्त आणि कार्यकर्त्याची नाराजी दूर करण्याबाबत चर्चा

2. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखेंच्या भूमिकेकडे लक्ष, सुजयचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी माझी नाही, शरद पवारांची खोचक टीका

3. माढ्याचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार रणजितसिंह गिरीश महाजनांच्या भेटीला, तर काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकरांच्या बॅनरवर मुख्यमंत्र्यांना स्थान

4. भारतात बोईंग 737 मॅक्स विमानाच्या वापरावर बंदी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हवाई वाहतूक महासंचालनालयाचा महत्वाचा निर्णय

5. भारताचा सर्वात मोठा गुन्हेगार मसूद अजहरचा आज फैसला, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्याची शक्यता, संयुक्त राष्ट्राच्या निर्णयाकडे लक्ष

6. 'कलंक' सिनेमाचा टीझर रिलीज, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आलिया भट, वरुण धवन मुख्य भूमिकेत, 17 एप्रिलला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.