LIVE BLOG | डॉ. अमोल कोल्हे शिवसेनेला रामराम करण्याच्या तयारीत, राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाची शक्यता

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 28 Feb 2019 09:54 PM
1954 सालच्या राष्ट्रपती आदेशात बदल, कलम 370 जवळपास शिथिल : अरुण जेटली
एससी, एसटी, ओबीसी आणि आर्थिक सवर्ण आरक्षण जम्मू-काश्मिरातील नागरिकांना लागू, केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय : अरुण जेटली
डॉ. अमोल कोल्हे शिवसेनेला रामराम करण्याच्या तयारीत, राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाची शक्यता
बालाकोटच्या एअर स्ट्राईक बाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साशंकता, बॉम्ब योग्य ठिकाणी पडल्याला दुजोरा काय? परदेशी प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने बॅनर्जींचा सवाल
एल्गार परिषदेतील लोकांवर खटला भरणाऱ्या पुण्याच्या पोलिस आयुक्तांना मी सस्पेंड केलं असतं, शरद पवारांचं वक्तव्य, या देशात विचार मांडायला स्वातंत्र्य आहे, एका खटल्यातून सुटण्याआधीच दुसऱ्या खटल्यात अडकवलं जात असल्याचंही मत
एल्गार परिषदेतील लोकांवर खटला भरणाऱ्या पुण्याच्या पोलिस आयुक्तांना मी सस्पेंड केलं असतं, शरद पवारांचं वक्तव्य, या देशात विचार मांडायला स्वातंत्र्य आहे, एका खटल्यातून सुटण्याआधीच दुसऱ्या खटल्यात अडकवलं जात असल्याचंही मत
पाकिस्तानच्या एफ 16 विमानाने डागलेल्या आराम मिसाईलचे तुकडे भारतात एलओसीजवळ सापडले
दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं उद्दिष्ट पूर्ण, किती दहशतवाद्यांचा खात्मा केला, हे इतक्यात सांगता येणार नाही
भारतीय वायुसीमेत घुसण्यासाठी पाकिस्तानकडून एफ 16 विमानाचा वापर
आमची लढाई दहशतवादाविरोधात, गेल्या दोन दिवसात किमान 35 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन : सेनादलांच्या पत्रकार परिषदेत माहिती
आमची लढाई दहशतवादाविरोधात, गेल्या दोन दिवसात किमान 35 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन : सेनादलांच्या पत्रकार परिषदेत माहिती
पाकिस्तानच्या बॉम्बहल्ल्यात कोणतंही नुकसान नाही : सेनादलांच्या पत्रकार परिषदेत माहिती
पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न : सेनादलांच्या पत्रकार परिषदेत माहिती
पाकिस्तानी विमानांचा ताफा भारतीय वायुसेनेने पाहिला, हल्ल्याचे पुरावे वायुसेना सादर करणार
शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव प्रकरण, सुधा भारद्वाज यांच्या भवितव्याचा फैसला 11 मार्चला, हायकोर्टानं राखून ठेवला निर्णय, भारद्वाज यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण, राज्य सरकारचा जोरदार विरोध
पिंपरी चिंचवड शहरात उद्यापासून पाणीकपात लागू होणार, आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, जलसंपदा विभागाचे पालिकेला आदेश, शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात सध्या 49.85 टक्के पाणीसाठा दिलेत, शहरात प्रत्येक भागासाठी पाणीकपातीचा वेगवेगळा दिवस
पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका होणार, अभिनंदन उद्या पाकिस्तानातून मायदेशी परतणार
विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीनंतर सुहास वारके यांनी पदभार स्वीकारला, सुहास वारके कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलिस महानिरीक्षक, विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलिस आयुक्तपदी बदली
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मूकबधिर संघटनेच्या शिष्टमंडळाची विधानभवनात बैठक सुरू,
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्य मंत्री दिलीप कांबळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित,
पाकिस्तानच्या ताब्यातील भारताचे विंग कमांडर यांची तातडीने बिनशर्त सुटका करुन भारतात पाठवायला हवं, त्यासाठी कसलीही डील किंवा चर्चा करण्याचा प्रश्नच नाही ही भारत सरकारची भूमिका आहे
पाकिस्तानच्या ताब्यातील भारताचे विंग कमांडर यांची तातडीने बिनशर्त सुटका करुन भारतात पाठवायला हवं, त्यासाठी कसलीही डील किंवा चर्चा करण्याचा प्रश्नच नाही ही भारत सरकारची भूमिका आहे
सुरक्षा दलांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मेट्रोच्या सर्व 12 स्थानकांवर रेड अलर्ट जारी.. मेट्रो प्रवाशांना सहकार्य करण्याचं मेट्रो प्रशासनाचं आवाहन
जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विधानपरिषदेतील भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे, शिवसेना नेते दिवाकर रावते यांचा प्रचंड संताप
भारत-पाकिस्तान तणावावर लवकरच चांगली बातमी ,

वाद मिटवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करणार

, अनेक वर्षांपासूनचा वाद मिटणार, तणाव निवळण्याच्या मार्गावर - डोनाल्ड ट्रम्प
विधानसभेतून विरोधी पक्षनेते विखे पाटील :
- सभागृहाचे कामकाज संस्थगित करण्याच्या प्रस्तावाला आमचा पाठींबा,
माय भूमीवरच्या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्यात एकजूटता असणं गरजेचं,
सध्या सीमेवरच्या परिस्थितीनुसार भविष्यात काय होईल याचा अंदाज येणं कठीण आहे
, सीमेवर लढत असलेल्या जवानांच्या पाठीशी संपूर्ण, देश खंबीरपणे उभा हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे
मराठा आरक्षणावरील सुनावणी : राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के असलेल्या मराठा सामाजातील केवळ 5 टक्के लोक वरच्या सधन वर्गात आहेत. प्रत्येक समाजात वेगवेगळे वर्ग आहेत. एका वर्गाच्या परिस्थितीनुसार संपूर्ण समाजाबद्दल निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल : राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
हाय अलर्ट आणि सुरक्षा व्यवस्थेवरील ताण कमी व्हावा यासाठी अधिवेशन रद्द, विधानसभा अध्यक्षांची घोषणा
पुलवामातल्या हल्ल्यानंतर भारतीय वायू सेनेने दहशतवादी अड्डे नष्ट केले,

सीमेवर तणावाची परिस्थिती पाहायला मिळते,

अंतर्गत सुरक्षा अबाधित राखणं महत्वाचं आहे,

मुंबई आर्थिक राजधानी असल्याने नेहमीपेक्षा जास्त निगराणी असली पाहिजे
,
पॅनिक होण्याचं काहीही कारण नाही पण जास्त काळजी घेणं गरजेचं आहे
,
आपलं अधिवेशन अजून दोन दिवस चाललं असतं पण 6 हजारांचा पोलीस बळ याठिकाणी तैनात असतो
,
पोलीस प्रशासनाला अधिकच्या फोर्सची गरज असल्याचं कालच्या बैठकीत निदर्शनास आलं
,
काल सुरक्षा आढावा बैठकीनंतर सएव पक्षीय गट नेत्यांनी विचार केला आणि एकमताने अधिवेशन आटोपतं घ्यावं याचा निर्णय घेतला

,अतिरिक्त पोलीस बळ रिलीज करून इतर सुरक्षा व्यवस्थेसाठी उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने हा निर्णय घेतला

,कुठल्याही पॅनिकची स्थिती नाही हे पुन्हा स्पष्ट करतो
पुलवामातल्या हल्ल्यानंतर भारतीय वायू सेनेने दहशतवादी अड्डे नष्ट केले,

सीमेवर तणावाची परिस्थिती पाहायला मिळते,

अंतर्गत सुरक्षा अबाधित राखणं महत्वाचं आहे,

मुंबई आर्थिक राजधानी असल्याने नेहमीपेक्षा जास्त निगराणी असली पाहिजे
,
पॅनिक होण्याचं काहीही कारण नाही पण जास्त काळजी घेणं गरजेचं आहे
,
आपलं अधिवेशन अजून दोन दिवस चाललं असतं पण 6 हजारांचा पोलीस बळ याठिकाणी तैनात असतो
,
पोलीस प्रशासनाला अधिकच्या फोर्सची गरज असल्याचं कालच्या बैठकीत निदर्शनास आलं
,
काल सुरक्षा आढावा बैठकीनंतर सएव पक्षीय गट नेत्यांनी विचार केला आणि एकमताने अधिवेशन आटोपतं घ्यावं याचा निर्णय घेतला

,अतिरिक्त पोलीस बळ रिलीज करून इतर सुरक्षा व्यवस्थेसाठी उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने हा निर्णय घेतला

,कुठल्याही पॅनिकची स्थिती नाही हे पुन्हा स्पष्ट करतो
औरंगाबाद :
सिल्लोड पालिका निवडणूक :
सिल्लोड पालिका काँग्रेसच्या ताब्यात ,
27 पैकी 25 जागेवर विजयी तर भाजपला केवळ 2 जागा .
सुरक्षा यंत्रणेवर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी अधिवेशन स्थगित करत आहोत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशाची सुरक्षा आणि सामर्थ्याचा संकल्प करुन आपला जवान सीमेवर उभा आहे. आपण सगळे पराक्रमी भारताचे नागरिक आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना देशाची समृद्धी आणि सन्मानासाठी दिवस-रात्र एक करावा लागेल : नरेंद्र मोदी
संपूर्ण जगाचं आपल्याकडे लक्ष, लोकांचा स्वतःवर आणि सरकारवर विश्वास हिच आमची ताकद आहे, आपल्याला खंबीरपणे उभे रहावे लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागरिकांना आवाहन
शत्रूचा भारताला अस्थिर करण्याचा कट आहे, मी तो यशस्वी होऊ देणार नाही : नरेंद्र मोदी
विधानसभा: मुख्यमंत्र्यांचं निवेदन सुरू
भारताला अस्थिर करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही : नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय गट नेत्यांच्या बैठकीत आज अधिवेशनाचे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा सभागृहात केली जाईल.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडरला परत आणण्यासाठी एकमताने ठराव मंजूर करून राज्यपालांकडे सुपूर्द करावा.
, राज्यपालांना हा ठराव राष्ट्रपतींकडे पाठवण्याची विनंती करावी अशी भूमिका विरोधी पक्षांनी मांडली
साल 1980 पासून साल 2014 पर्यंत मराठा समाज आरक्षणाच्याबाबतील शांत का होता? अचानक त्यांनी आरक्षणाची मागणी का लावून धरली? - हायकोर्ट

कारण या दरम्यान त्यांनीच निवडून दिलेल्या सरकारनं त्यांना आरक्षणाची कधी गरज भासू दिली नाही, राज्य सरकारचं उत्तर
'भविष्यात गरज पडल्यास 16 टक्के आरक्षणाच्या गटात आणखीन काही जातींचाही समावेश होऊ शकतो,' मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ युक्तिवाद करताना राज्य सरकारतर्फे अॅड. विजय थोरात यांची मुंबई उच्च न्यायालयात माहिती
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सुबोधकुमार जायस्वाल यांना बढती, संजय बर्वे मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
अधिवेशन कामकाज आज संपणार, कामकाज अजून एक तासात संपवणार
, आजच्या बैठकीत राज्यात 14-15 ठिकान हायलर्ट वर असल्याची माहिती, मुंबई, पुणे ,नागपूर सगळ्यात जास्त हाय अलर्ट म्हणून अधिवेशन संपणार
मुंबई आणि राज्यातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी बोलवली बैठक, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी बैठकीसाठी विधानभवनात दाखल
पाकिस्तानकडून आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन ,

कृष्ण घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार
पाकिस्तानची चहुबाजूनं कोंडी होण्यास सुरुवात, मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करा असा प्रस्ताव अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या तिन्ही देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परीषदेत ठेवला

Background

भारतीय हवाई हल्ल्याला भेदरलेल्या पाककडून बैठकीचं निमंत्रण, पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारतासमोर लोटांगण

आधी भारताचा वैमानिक अभिनंदन वर्धमानला सोडा, भारताची पाकला तंबी, पाकच्या विमानाचा फडशा पाडणारा वीर पाकच्या ताब्यात असल्याचा दावा

जर अमेरिका पाकिस्तानमध्ये घुसून ओसामाला मारु शकते तर काहीही शक्य, अर्थमंत्री अरुण जेटलींचा पाकिस्तानला इशारा

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची अमेरिकेकडे धावाधाव, अमेरिकेनं उलट पाकचेच कान टोचले, तर चीननंही पाकची साथ सोडली

कंगाल पाकिस्तानच्या भारतासोबत युद्धाच्या बाता, युद्ध स्थितीत पाककडे 6 दिवसांपुरतंच परकीय चलन, अर्थव्यवस्था कोलमडल्यानं पाकिस्तान भिकेला

जवानांच्या बलिदानाचं मोदी सरकारकडून राजकारण, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा गंभीर आरोप तर विरोधक पाकला आयतं कोलीत देत असल्याचा भाजपचा दावा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.