- Home
-
Election
-
Elections
LIVE BLOG : उद्योग धोरण 2019 या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
LIVE BLOG : उद्योग धोरण 2019 या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
राज्यासह देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
ABP News Bureau
Last Updated:
05 Mar 2019 10:39 PM
मध्यंतरीच्या 8 - 10 वर्षात अनेक राज्यांनी महाराष्ट्राला मागे टाकले होते, पण मागच्या चार वर्षात आम्ही महाराष्ट्राला पुन्हा उद्योगात पाहिल्या क्रमांकावर आणलं : मुख्यमंत्री
ठाण्यातील इंटर्नल मेट्रो सर्किटला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी,
सेंट्रल रेल्वे, वडाळा ते कासारवडवली आणि भिवंडी मेट्रोला जोडणारी ही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतली मेट्रो असणार,
या 29 किमी लांबीच्या मार्गावर एकूण 15 स्थानके असतील,
ज्यापैकी 22 किमी भुयारी मार्ग तर उर्वरित इलेव्हटेड असणार, या प्रकल्पावर 9 हजार 969 कोटी अंदाजित खर्च असून पुढील चार वर्षांत पूर्ण होणार असल्याचा सरकारचा दावा
उद्योग धोरण 2019 या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
निरव मोदी याचा अलिबाग येथील बंगला जमीनदोस्त होणार, उद्या नियंत्रित स्फोटाने केला जाणार जमीनदोस्त, रायगड जिल्हाधिकारी यांनी दिले होते बंगला पाडण्याचे आदेश
सुभाष देसाई यांच्यासारखे सहकारी ज्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केलं ते मला लाभले यांचा मला अभिमान आहे. कठीण प्रसंगी मी यांचे सल्ले घेतो : उद्धव ठाकरे
वंचित बहुजन आघाडीची सर्व 22 उमेदवार जाहीर केलेल्या जागांची मुंबईतील बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मागणी. या 22 जागांमध्ये बारामती, नांदेड, माढा या जागांचा समावेश आहे.
आजकाल मला सरकारची सगळी चांगली कामं दिसायला लागली आहेत : उद्धव ठाकरे
मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, काल घेतली होती उद्धव ठाकरे यांची भेट
एक गोष्ट अभिमानाने सांगतो की महाराष्ट्राच्या हिता आड आम्ही आमचा विरोध कधीच येऊ दिला नाही : उद्धव ठाकरे
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहलीचं झुंझार शतक, कारकिर्दीतलं 40 वं शतक. ऑस्ट्रेलियासमोर 251 धावांचं आव्हान.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वंचित बहुजन विकास आघाडीसोबत बैठक सुरु, आघाडीकडून अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, जितेंद्र आव्हाड, तर बहुजन वंचित आघाडीकडून लक्ष्मण माने आणि इतर सदस्य उपस्थित
उद्योग धोरण 2019 या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेंची उपस्थिती
उद्योग धोरण 2019 या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेंची उपस्थिती
मुंबई : मनसे नगरसेवकांपाठोपाठ आमदारही शिवसेनेच्या वाटेवर, मनसेचे आमदार शरद सोनावणे आज शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता
दिल्लीत काँग्रेस-आपची युती नाही, दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांची माहिती, राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर स्पष्टीकरण
#IndvsAus : नागपूर दुसरी वनडे : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, भारतीय संघात एकही बदल नाही
पुणे : समाजात जर बंधुत्व असेल तर समाज कोणत्याही संकटातुन बाहेर पडू शकतो. नानासाहेब धर्माधिकारी आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी असा बंधुत्वाचा विचार दिला. आज समाजाला अशा बंधुत्वाची गरज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य
कुणी जास्त कोल्हेकुई करू नये, शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अमोल कोल्हेंना टोला, तर राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हेंना मराठा नव्हे तर माळी म्हणून मैदानात उतरवल आहे.
भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट हॅक, आक्षेपार्ह शब्दात काही वाक्य वेबसाईटच्या होम पेजवर पोस्ट, अद्याप भाजपकडून या प्रकरणी कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही
आता समुद्र मार्गाने दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, नौदलप्रमुख सुनील लांबा यांची माहिती
नवी मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांची गाडी फोडल्या प्रकरणी शिवसेना नगरसेवक एम के मढवी, नगरसेवक करण मढवी यांना अटक, रबाळे पोलिसांची कारवाई
सिंधुदुर्ग : चिपी विमानतळ टर्मिनलच्या इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न, हापूस आंब्याचा हार घालून मुख्यमंत्र्यांचे स्वागत
सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची शक्यता, आज राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता
मुंबई : कुख्यात गुंड जानू पवार उर्फ बिल्ला याच्यावर गोळीबार, कुर्ल्यातील हलाव पूल भागातील घटना, एक जण पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : कुख्यात गुंड जानू पवार उर्फ बिल्ला याच्यावर गोळीबार, कुर्ल्यातील हलाव पूल भागातील घटना, एक जण पोलिसांच्या ताब्यात
मुंबई अग्निशमन दलाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी भायखळा मुख्यालयाबाहेर लक्षवेधी धरणं आंदोलन पुकारलं आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, अग्निशमन दलातील रिक्त जागा भरणे, अतिकालीन कामाचा भत्ता देणं, नवनियुक्त अग्निशामकाना गणवेश, गमबूट, ई मस्टर प्रणालीप्रमाणे वेतन अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत.
शिवसेना-भाजप युतीतले नाराज राज्यमंत्री अर्जुन खोतकर आज दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यानंतर संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेटीसाठी जाणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर नाराज अर्जुन खोतकर जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवायची की नाही याचा निर्णय घेणार. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर यांनी दंड धोपटले आहेत. काल त्यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतरही अर्जुन खोतकरांची नाराजी कायम आहे.
रायगड : भीमाशंकर पर्वतावरुन दोन पर्यटक दरीत कोसळले, तरुण आणि तरुणी सोमवार संध्याकाळपासून बेपत्ता, शोध सुरु
नागपूर मेट्रोची प्रतीक्षा संपली, पंतप्रधान नरेंद्र मोदी सात मार्चला व्हिडिओ लिंकने उद्घाटन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित
नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यामुळे माजी आमदार प्रमोद जठार नाराज, मुख्यमंत्र्यांकडे आज भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार, शिवसेनेच्या मनधरणीसाठी नाणार प्रकल्प रद्द केल्यामुळे तळकोकणात भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
रायगड : मुंबई-गोवा हायवेवर ट्रक आणि डंपरची धडक, दोन जण जखमी, नागोठणेजवळ वाळूचा ट्रक आणि ऑईल टँकरचा अपघात, वाकण-पाली-खोपोली मार्गे वाहतूक वळवली
Background
1. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमधील डॉक्टर एटीएसच्या ताब्यात, आयसिसच्या नऊ संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा अंदाज
2. पाकिस्तानला घरात घुसून मारु, अहमदाबादच्या सभेत पंतप्रधान मोदींचा संताप, तर बिकानेरमध्ये पाकच्या मानवरहित विमानाला सुखोई विमानांनी पाडलं
3. एअर स्ट्राईकवेळी पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 300 मोबाईल अॅक्टिव्ह, 'रॉ'ची माहिती, मसूद अजहरचा 13 मार्चला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीत फैसला
4. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज मुख्यमंत्री आणि नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते उद्घाटन, विमानतळासाठी 520 कोटींचा खर्च
5. आयसीआयसीआय बँकेच्या माजी अधिकारी चंदा कोचर यांची ईडीकडून 11 तास कसून चौकशी, व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी प्रश्नांची सरबत्ती
6. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील दुसरा वन डे सामना आज नागपूरमध्ये, पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाची 1-0 अशी आघाडी