LIVE BLOG : दक्षिण मुंबईतून तब्बल 135 किलो सोनं जप्त, डीआरआयच्या पथकाची कारवाई

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 29 Mar 2019 10:22 PM
दक्षिण मुंबईतून तब्बल 135 किलो सोनं जप्त, डीआरआयच्या पथकाची कारवाई , सोनं तस्करांवर करण्यात आलेली आतापर्यंतची ही मोठी कारवाई
बीड : वाहन तपासणी दरम्यान एका कारमध्ये तब्बल साडे आठ लाख रूपयांची रोकड आढळून आली. ही रक्कम जप्त करून निवडणूक विभागाच्या आचारसंहिता पथकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
गोवा : मगो नेते दीपक ढवळीकर यांनी शिरोडा पोटनिवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज, शिरोडा पोटनिवडणुकीतून माघार न घेतल्याने भाजपने सुदिन ढवळीकर यांना दिला होता उपमुख्यमंत्री पदावरुन डच्चू
बीड : बीड लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 79 अर्ज आले होते. त्यापैकी 53 उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. तर पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले. यापैकी सतरा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता एकूण 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
नाशिक : मनमाड-शिर्डी मार्गावर येवल्याजवळ खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर 8 ते 10 प्रवासी जखमी, अपघातामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प


भिवंडी

त काँग्रेसचे भिवंडी महानगरपालिका सभागृह नेता मतलूब सरदारला खंडणीच्या गुन्ह्यात अटक,

बिल्डरकडून पाच लाखांच्या खंडणीची केलेली मागणी,

शांतीनगर पोलिसांनी केली अटक
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी नक्की, विश्वसनीय सूत्रांनी माहिती


मुंबई : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू, भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीच्या पाठपुराव्याला अखेर यश, भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीकडे जीआर कॉपी सुपूर्द


मराठीत बोलण्याचा आग्रह धरल्याने एका बांग्लादेशीय तरुणाने केला 2 महिलांवर हल्ला, बांग्लादेशीय तरुण कुरिअर घेऊन आल्या नंतर महिलानी त्याला मराठीत बोलण्याची केली विनंती, संताप आल्याने त्याने हातातील पेन ने केला हल्ला, हल्लेखोर तरुण शिवाजी पार्क पोलिसांच्या ताब्यात
भंडारा : शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक रुण भेदे यांचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष अंगावर रॉकेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न, वारंवार निवेदन देत आंदोलन करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप , प्रशासनाला आठ दिवसांपूर्वीच दिला होता आत्मदहनाचा इशारा
नांदेड : प्रेमी युगुलाची आत्महत्या, मुखेड तालुक्यातील कासारवाडी शिवारात झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या, दोघेही लातूर जिल्ह्यातील राहिवाशी
24 वर्षीय गणपती उर्फ पारस निवृत्ती नरोटे
20 वर्षीय धनश्री माधव चोले यांची आत्महत्या
, जळकोट तालुक्यातील कोळनूर येथील दोघेही राहिवाशी
नांदेड : प्रेमी युगुलाची आत्महत्या, मुखेड तालुक्यातील कासारवाडी शिवारात झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या, दोघेही लातूर जिल्ह्यातील राहिवाशी
24 वर्षीय गणपती उर्फ पारस निवृत्ती नरोटे
20 वर्षीय धनश्री माधव चोले यांची आत्महत्या
, जळकोट तालुक्यातील कोळनूर येथील दोघेही राहिवाशी
पुणे : पुण्यात दिवसाढवळ्या सेव्हन लव्ह चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया चोरट्याने मारला कॅश पेटीवर डल्ला, 27 लाख रुपये लंपास केले असल्याची माहिती
शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव प्रकरण, प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 27 फेब्रुवारीपर्यंत तहकूब, मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला दिलासा तूर्तास कायम
मराठा आरक्षणावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी, आरक्षण देण्यासाठी कोणतीही जात नव्यानं मागास ठरवण्याचे अधिकार राज्य सरकार आणि केंद्र सरकारला नाहीत, हे केवळ राष्ट्रपतींनाच आहेत, हा महत्त्वपूर्ण मुद्दा माहीती असूनही गायकवाड समिती याकडे दुर्लक्ष कसं करू शकते?, याचिकाकर्त्यांचा सवाल, रझा अकादमीच्यावतीनं मराठा आरक्षणाला विरोध करत अॅड. सतीश तळेकर यांचा युक्तिवाद सुरू
कोल्हापूर : राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडून ऐतिहासिक रंकाळा तलावाची पाहणी, रंकाळा तलावाच्या प्रदूषित परिस्थितीची राज्यपालकडून पाहणी, कोट्यवधी रुपये खर्चूनही रंकाळा तलाव प्रदूषित


मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.
परभणीतील भाविकांच्या गाडीला मध्यप्रदेशमध्ये अपघात, एकाच कुटुंबातील 14 जण गंभीर, मध्यप्रदेशमधील सागर येथे भीषण अपघात, काशीला जात असताना पहाटे झाला अपघात

प्रवासी ट्रॅव्हलर आणि ट्रकची समोरासमोर धडक, सर्व जखमी छतरपूर येथील रुग्णालयात दाखल
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार आज निश्चित होण्याची शक्यता,
पुण्यात आज होणाऱ्या बैठकीत उमेदवार ठरणार
कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे बंद, कालपासून लाखो रुपयांचा गूळ बाजार समितीमध्ये पडून, हमालांनी अतिरिक्त वेळ काम करायला नकार दिल्याने व्यापाऱ्यांनी सौदे बंद ठेवले, मार्केट यार्डात तणावाचे वातावरण
कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे बंद, कालपासून लाखो रुपयांचा गूळ बाजार समितीमध्ये पडून, हमालांनी अतिरिक्त वेळ काम करायला नकार दिल्याने व्यापाऱ्यांनी सौदे बंद ठेवले, मार्केट यार्डात तणावाचे वातावरण
नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाचे छापे सुरु, तीन दिवसात नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे, 20 हून अधिक डॉक्टरांच्या हॉस्पिटल, पॅथॉलॉजी लॅबवर छापे, सहा कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची सूत्रांची माहिती, अकाऊंटमध्ये उल्लेख नसलेल्या बेहिशेबी रिसीट आढळल्या तपास सुरु
सोलापूर : राज्यातील पहिलं अत्याधुनिक कचरा संकलन केंद्र सोलापुरात, इंदूरच्या धर्तीवर चार कचरा संकलन केंद्र कार्यान्वित
पुणे : प्रविण गायकवाड यांनी काल कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील घरी पुणे कॉंग्रेस मधील नेत्यांची थोड्या वेळात बैठक
नाट्यसृष्टीची सैन्याला अनोखी मानवंदना,
यापुढे दर प्रयोगाला रंगदेवता, नाट्यरसिक आणि भारतीय सैन्याला विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत अशी उद्घोषणा होणार, नाट्य निर्माता संघाने एकमताने प्रस्ताव मंजूर केला
औरंगाबाद वाळुज परिसरात चोरट्यांनी फोडली दुकाने, बजाजनगर येथे एकाच रात्रीत सात दुकाने फोडली, पोलीस घटनास्थळी
औरंगाबाद वाळुज परिसरात चोरट्यांनी फोडली दुकाने, बजाजनगर येथे एकाच रात्रीत सात दुकाने फोडली, पोलीस घटनास्थळी
मुंबईची लाइफलाइन लोकलवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, सर्व स्थानकांवर अलर्ट, मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर येत्या 3 महिन्यात दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे.
त्या धर्तीवर रेल्वेने सुरक्षाव्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा जारी
मुंबईची लाइफलाइन लोकलवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, सर्व स्थानकांवर अलर्ट, मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर येत्या 3 महिन्यात दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे.
त्या धर्तीवर रेल्वेने सुरक्षाव्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा जारी
मुंबईच्या लाईफलाईनवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, सर्व रेल्वे स्टेशनवर अलर्ट जारी, सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेची सूचना
नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांची बदली, विश्वास नांगरे पाटील नवे आयुक्त,
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली झाल्याची
सूत्रांची माहिती

Background

1. मुंबईच्या दिशेने येणारं लाल वादळ थांबवण्यात सरकारला यश, किसान मोर्चावर सकारात्मक तोडगा, वन हक्क जमिनीचे दावे तीन महिन्यात निकाली काढणार

2. धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यासोबतची बैठक निष्फळ, सरकारने तोंडाला पानं पुसल्याचा नेत्यांचा आरोप, धनगर आंदोलन सुरु होण्याची शक्यता

3. 2018-19 आर्थिक वर्षासाठी ईपीएफच्या व्याजदरात वाढ, 8.55 टक्क्यांवरुन 8.65 टक्के व्याजदर करण्याचा निर्णय

4. सांताक्रुझच्या बेस्ट कँटीनमध्ये उंदरांचा सुळसुळाट, अस्वच्छतेचा कळस, कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांचेही आरोग्य धोक्यात

5. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी, भारताच्या वाट्याचं पाकिस्तानला जाणारं पाणी रोखण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

6.  ठाकुर्ली रेल्वे स्थानकात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, दोन रुळांच्या मध्ये पडल्याने जीव वाचला, काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत

7. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध, तर पाकिस्तानकडून हाफीज सईदच्या 'जमात-उद-दावा' संघटनेवर बंदी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.