Lok Sabha Election 2019 : चौथ्या टप्प्यात देशभरात 59.25 टक्के मतदान

Lok Sabha Election 2019 : या टप्प्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 17 जागांवर मतदान होत असून, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या प्रत्येकी 13-13 जागांचा समावेश आहे.

ABP News Bureau Last Updated: 29 Apr 2019 06:25 PM
चौथ्या टप्प्यात देशभरात 59.25 टक्के मतदान
पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये तृणमूलची गुंडगिरी, भाजप नेते बाबुल सुप्रियोंच्या गाडीची तोडफोड
देशातील 9 मतदारसंघात दुपारी 12 वाजेपर्यंत 23.93 टक्के मतदान : महाराष्ट्र (17 जागा) - 28.67 टक्के, राजस्थान (13 जागा) - 30 टक्के, उत्तर प्रदेश (13 जागा) - 21.18 टक्के, पश्चिम बंगाल (8 जागा)- 35.10 टक्के, मध्य प्रदेश (6 जागा) - 29 टक्के, ओदिशा (6 जागा) - 20 टक्के, बिहार (5 जागा)- 18.26 टक्के, झारखंड (3 जागा) - 29.21 टक्के, जम्मू काश्मीर (1 जागा) - 4 टक्के

सीपीआय उमेदवार कन्हैया कुमारचं बिहारच्या बेगुसरायमध्ये मतदान

अभिनेता संजय दत्तचं वांद्र्यात मतदान
अभिनेता संजय दत्तचं वांद्र्यात मतदान
अभिनेता संजय दत्तचं वांद्र्यात मतदान
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं मुंबईतील अंधेरी लोखंडवालामध्ये मतदान
पश्चिम बंगालच्या आसनसोलमधील काशीदाना मतदान केंद्राबाहेर भाजप नेते बाबुल सुप्रियो यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचं म्हटलं जात आहे. या कार्यकर्त्यांनी सीआरपीएफच्या जवानांशीही हुज्जत घातली. इतकंच नाही तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रात जाण्यासही मज्जाव केला. दुसऱ्या बाजूला तृणमूलचे कार्यकर्ते मात्र भरभरुन मतदान करत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं जावई सदानंद सुळे आणि नात रेवती यांच्यासह मुंबईत मतदान
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील नऊ राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत 10.27 टक्के मतदानाची नोंद

सकाळी नऊ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? : महाराष्ट्र (17 जागा) - 6.82 टक्के, मध्य प्रदेश (6 जागा) - 11.11 टक्के, ओदिशा (सहा जागा) - 9 टक्के, पश्चिम बंगाल (8 जागा) - 16.90 टक्के,बिहार (5 जागा) - 10.15 टक्के, जम्मू काश्मीर (1 जागा) - 0.61 टक्के, राजस्थान (13 जागा)- 4.49 टक्के, उत्तर प्रदेश (13 जागा)- 7.40 टक्के, झारखंड (3 जागा) 10.94 टक्के मतदान

शिर्डी : 'मला माहिती नाही पण लोकांचे असे म्हणणे आहे की इथे शिवसेनेच्या उमेदवाराचा जोर आहे', राधाकृष्ण विखे पाटलांची मतदानानंतर प्रतिक्रीया
#लोकसभानिवडणूक⁠ ⁠⁠ ⁠ :- दक्षिण मुंबईचे महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी आपल्या कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क, निवडणूक जिंकणार असल्याचाही व्यक्त केला विश्वास

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं छिंदवाडा इथे मतदान

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांचं वरळीत मतदान

मुंबईत पाहिल्यांदाच दिव्यांगांसाठी व्हीलचेअर टॅक्सीची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तीला घरातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवलं जात आहे. मुंबईत एकूण 14 व्हीलचेअर टॅक्सी आज मतदानाच्या दिवशी दिव्यागना सुविधा देत आहेत. यासाठी टोल फ्री क्रमांकावर दिव्यांग व्यक्ती ही सुविधा घेऊ शकते. कौस्तुभ या दिव्यांग नवमतदाराने कुलाब्यात सकाळी मतदान केलं. माझ्यासारखे बाहेर पडा आणि मतदान करा, असं आवाहन त्यांने केलं.

उन्नावमधील भाजपचे उमेदवार साक्षी महाराज यांचं मतदान, रांगेला फाटा देत साक्षी महाराज थेट मतदान केंद्रात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशातील फारुखाबादचे उमेदवार सलमान खुर्शीद यांनी मतदानाचा हक्क बजावला

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील भाजपचे उमेदवार आणि अभिनेते रवी किशनचं मुंबईतील गोरेगावमध्ये मतदान

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे शिंदे यांचं झालवाडमध्ये मतदान

Background

Lok Sabha Election 2019 : सतराव्या लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात नऊ राज्यांच्या 71 जागांवर आज मतदार होत आहे. या टप्प्यात जवळपास 13 कोटी मतदार 961 उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. या टप्प्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 17 जागांवर मतदान होत असून, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या प्रत्येकी 13-13 जागांसाठी आज मतदान पार पडेल.

कोणत्या राज्यात किती जागांवर मतदान?
महाराष्ट्र : 17
राजस्थान : 13
उत्तर प्रदेश : 13
पश्चिम बंगाल : 8
ओदिशा : 6
मध्य प्रदेश : 6
बिहार : 5
झारखंड : 3
जम्मू काश्मीर : 1

2014 मध्ये कोणी किती जागा जिंकल्या?
भाजप : 46
काँग्रेस : 2
शिवसेना : 9
एलजेपी : 2
बीजेडी : 6
टीएमसी : 6
एसपी : 1

23 टक्के उमेदवार डागाळलेले
एडीआरच्या अहवालानुसार, या टप्प्यात 928 पैकी 23 टक्के म्हणजेच 210 उमेदवारांविरोधात गुन्हेगारी खटले दाखल आहेत. यापैकी 17 टक्के म्हणजेच 158 उमेदवारांवर गंभीर गुन्हेगारी प्रकरणांची नोंद आहे. शिवसेना आणि भाजपने या टप्प्यात 46 टक्के गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिली आहे.

33 टक्के उमेदवार कोट्यधीश
या टप्प्यात 928 पैकी सुमारे 33 टक्के म्हणजेच 306 उमेदवार कोट्यधीश आहे. चौथे टप्प्यातील उमेदवारांची सरासरी संपत्ती 4.53 कोटी रुपये आहे. या टप्प्यात कोट्यधीशांना तिकीट देण्याच्या बाबतीत भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सर्वात आघाडीवर आहेत. काँग्रेस आणि भाजपने 57 पैकी 50-50 उमेदवारांनी कोट्यधीश असल्याची माहिती दिली आहे. बसपा या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. बसपाचे 54 पैकी 20 उमेदवार कोट्यधीश आहेत. मात्र तीन उमेदवार असेही आहेत, ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची संपत्ती नाही.

14 उमेदवार पीएचडीधारक
या टप्प्यात निवडणूक लढवणारे 14 उमेदवार पीएचडीधारक आहेत. याशिवाय 162 उमेदवार हे पदव्युत्तर आहेत. 201 उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. तर 77 उमेदवारांनी व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी मिळवली आहे. मात्र या टप्प्यातील 9 उमेदवार निरक्षर आहेत.

व्हीआयपी उमेदवारांचं भविष्य पणाला
या टप्प्यात भाजपचे गिरीराज सिंह, सीपीआय कन्हैया कुमार, राजदचे ज्येष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी, भाजपचे नित्यानंद राय, राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांचं भवितव्य पणाला लागलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ छिंदवाडातून, कन्नौजमधून अखिलेश यादव की पत्नी डिंपल यादव, फारुखाबादमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद, जोधपूरमधून अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत, आसनसोलमधून बाबुल सुप्रियो आणि अभिनेत्री मुनमुन सेन, मिलिंद देवरा, उर्मिला मातोंडकर या दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.