LIVE BLOG | राज ठाकरे हे लोकसभेसाठी महाआघाडीने आऊटसोर्स केलेले नेते, नरेंद्र मोदींचा राज ठाकरेंना टोला

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 28 Apr 2019 11:25 PM
बीडमधील बनसारोळा येथे उष्माघाताने पोस्टमनचा मृत्यू, विक्रम गायकवाड असं मृत पोस्टमनचे नाव
शेततळ्यात पोहायला गेलेल्या बहीण भावाचा बुडून मृत्यू,
लातूरमधील हरीजवळगा या गावातील धक्कादायक घटना
राज ठाकरे म्हणजे लोकसभेसाठी महाआघाडीने आऊटसोर्स केलेले नेते, निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीकास्त्र
अमरावतीमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात, दोन जण जागीच ठार,
अमरावती-वलगाव मार्गावरील वडूरा फाट्यावर आज दुपारी 3 च्या सुमारास ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला,
या अपघातात बेलोरा येथील ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद मानकर यांच्यासह एकाचा जागीच मृत्यू
कल्याण : उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू, भगवान मगरे (52) असं मृत कर्मचाऱ्याचं नाव, इलेक्शन ड्युटीवर तैनात असताना दगदग आणि उन्हाच्या त्रासाने कोसळले
अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व आस्थापना म्हणजे हॉटेल, दुकान येथील कर्मचारी, असंघटित कामगार यांना उद्या 29 एप्रिल रोजी मतदानासाठी भर पगारी सुट्टी, राज्य सरकारच्या कामगार विभागाचे आदेश, उद्या मतदानासाठी सुट्टी घेतल्यास एक दिवसाचे वेतन न कापण्याचे निर्देश
नागपूरच्या जरीपटका भागातून गेले 2 दिवसापासून बेपत्ता असलेले ट्रान्सपोर्ट व्यापारी बॉबी माकन यांची हत्या, नागपूरमधील कोंढाळीजवळ आढळला मृतदेह

अकोल्यात मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अकोल्याचा आजचा पारा 47.2 अंशांवर, काल तापमान 46.7 अंश सेल्सिअस होतं, अकोल्यात जगातील सर्वाधिक तापमान
निवडणूक आयोगाच्या पथकाची पनवेलमध्ये कारवाई, शेकापच्या कार्यकर्त्यांना पकडले, पार्थ पवारांच्या प्रचारासाठी वाटण्यासाठीची 200 रुपयांची पाकिटं जप्त
नवी मुंबई : देवत गावात शिवसेना कार्यकर्त्याला 26 हजार आणि मतदान स्लिपसहीत पकडण्यात आले आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
कोल्हापूर : भारतीय हवामान खात्याने आज कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, विजेच्या गडगडाटासह पाऊसाचा अंदाज वर्तविला आहे, कोल्हापूरला अलर्ट
बीड ते पुणे वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सने काल रात्री 1 च्या दरम्यान पिंपळवंडीत अचानक पेट घेतल्याने ट्रॅव्हल्स जळून खाक झाली, सुदैवाने चालकाच्या सावधानतेमुळे सर्व प्रवाशी सुखरूप बचावले
नंदुरबार : सापुतारा येथे बसला अपघात, 12 प्रवासी किरकोळ जखमी, बसवरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती
सुरक्षेच्या कारणावरून राहुल गांधी यांचे पायलट आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये वाद, ओझर विमानतळावर शनिवारी सकाळी घडला प्रकार, राहुल गांधी यांनी मध्यस्ती केल्याने वाद निवळला
पालघर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याकरीता पालघर जिल्हयातील 36 सराईत गुन्हेगारांना स्थानबध्द केले आहे.
एनडीएला बहुमत न मिळाल्यास ममता, मायावती किंवा चंद्राबाबू पंतप्रधानपदाचे दावेदार, 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना शरद पवारांचं विधान, पवारांच्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
रामकृष्ण पराडकर आणि वैभव पाटील अशी पैसे वाटणाऱ्या आरोपींची नावं, 20 हजाराची रोकड आरोपींकडून ताब्यात घेतली
नवी मुंबई : मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी मतदारांना पैसे वाटणाऱ्या दोन आरोपींना कामोठे पोलिसांनी केली अटक. काल संध्याकाळी पार्थ पवार यांची मतदान स्लिप, मतदार यादी आणि रोख रक्कम मतदारांना वाटताना घेतले होते ताब्यात.

Background

1. मतदान केंद्रावर मोबाईल नेल्यास गुन्हा दाखल होणार, फेसबुक लाईव्ह, टीकटॉकसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय़


2. चौथ्या टप्प्यातल्या 17 मतदारसंघातला प्रचार थंडावला, मुंबई, ठाणे, नाशिकात महत्त्वाच्या लढती, मावळमध्ये पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला


3.राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हीडिओला भाजपचं 'बघाच तो व्हिडीओ'ने उत्तर, मुंबईत आशिष शेलारांकडून अनेक मुद्द्यांवर पोलखोल, मित्रा चुकलास म्हणत भावनिक उद्गार


4. दक्षिण मुंबई वगळता इतर 5 मतदारसंघात अडीच लाखांनी मतदार घटले, तर सलगच्या सुट्ट्यांमुळं मुंबईतील उमेदवारांची धाकधुक वाढली


5. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेत जिल्ह्यात पारा पंचेचाळीशी पार, परभणीत उष्माघातामुळं शेतकऱ्यांचा मृत्यू, मात्र कोल्हापूर आणि चंदगडात गारांचा तडाखा


6. नालासोपाऱ्यात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारत जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या,   आजारपणाला कंटाळून जीवन संपवल्याचा पोलिसांचा अंदाज

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.