LIVE BLOG : आज दिवसभरात... 14 मार्च
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेंबाबत काँग्रेसमध्ये अविश्वास आहे, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत विखे-पाटलांवर तोफ डागली. विखेंनी पक्षाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचीही मागणी थोरातांनी केली
ABP News Bureau Last Updated: 14 Mar 2019 08:55 AM
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर खलबंत, प्रचाराचा मुहूर्त आणि कार्यकर्त्याची नाराजी दूर करण्याबाबत चर्चा2. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखेंच्या भूमिकेकडे लक्ष,...More
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर खलबंत, प्रचाराचा मुहूर्त आणि कार्यकर्त्याची नाराजी दूर करण्याबाबत चर्चा2. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखेंच्या भूमिकेकडे लक्ष, सुजयचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी माझी नाही, शरद पवारांची खोचक टीका3. माढ्याचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार रणजितसिंह गिरीश महाजनांच्या भेटीला, तर काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकरांच्या बॅनरवर मुख्यमंत्र्यांना स्थान4. भारतात बोईंग 737 मॅक्स विमानाच्या वापरावर बंदी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हवाई वाहतूक महासंचालनालयाचा महत्वाचा निर्णय5. भारताचा सर्वात मोठा गुन्हेगार मसूद अजहरचा आज फैसला, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्याची शक्यता, संयुक्त राष्ट्राच्या निर्णयाकडे लक्ष6. 'कलंक' सिनेमाचा टीझर रिलीज, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आलिया भट, वरुण धवन मुख्य भूमिकेत, 17 एप्रिलला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राजू शेट्टी यांच्या जगावाटपावर आज तोडगा निघण्याची शक्यता, जागावाटप संदर्भात शरद पवार यांच्या मध्यस्थीने अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांची फोनवरून चर्चा, राष्ट्रवादीकडून हातकणंगले तर काँग्रेसकडून स्वाभिमानीला वर्धा किंवा सांगलीची जागा मिळण्याची शक्यता