LIVE BLOG | सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणारच : राहुल गांधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर, सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी 15 एप्रिलला सोलापुरात सभा घेणार

ABP News Bureau Last Updated: 06 Apr 2019 12:11 AM
घराणेशाही ही लोकशाहीला लागलेली कीड आहे,
एकाच कुटुंबाच्या पक्षाला माझा नेहमीच विरोध : पंतप्रधान नरेंद्र मोदी
निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या पूजा मुळे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 11 वा रँक मिळवून यश मिळवले. मुळे यांनी भारताच्या परराष्ट्र खात्यात सचिव पदावर काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केलं आहे.
सोलापूर : भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा, उजनी धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यापर्यंत सोडण्याची मागणी, तीन दिवसात प्रश्न निकाली न काढल्यास मतदानावर बहिष्कार, सोलापूर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी
शिवीला सोने बनविणे ही माझी ताकत आहे, मी केवळ देवाला आणि सव्वाशे कोटी जनतेला घाबरतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोठ्या उद्योजकांचे कर्ज कसं माफ होतं? राहुल गांधींचा सवाल
माझं सरकार मुस्लिमांसाठी कटिबद्ध आहे, देशातील प्रत्येकासाठी मी काम करतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी
सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर, सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी 15 एप्रिलला सोलापुरात सभा
एक्सक्लुझिव्ह मुलाखत । मुस्लिमांनी पाकिस्तानात जावं असं म्हणणाऱ्यांचा निषेध करतो, अशांवर कारवाई देखील केलीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
एक्सक्लुझिव्ह मुलाखत । मुस्लिमांनी पाकिस्तानात जावं असं म्हणणाऱ्यांचा निषेध करतो, अशांवर कारवाई देखील केलीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
राहुल गांधी यांची चंद्रपुरात प्रचार सभा,
सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणारच, गरिबांना दरवर्षी इतके पैसे देणे शक्य आहे : राहुल गांधी
राहुल आणि प्रियांका या दोघांनाही मी वैयक्तिक ओळखत नाही, राहुल-प्रियांका हे चांगले की वाईट हे काँग्रेस ठरवेल : पंतप्रधान मोदी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर, सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी 15 एप्रिलला सोलापुरात सभा घेणार
चौकीदार हा श्रीमंतांच्या घरासमोर उभा असतो : राहुल गांधी
भिवंडी : एसएससी पेपरफुटी प्रकरणात आरोपी मोबीन मेहमूद फकी याला अटक, एसएससी पेपरचे फोटो काढल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांची कारवाई, आतापर्यंत पाच आरोपींना अटक
प्रत्येकाला 15 लाख रुपये देणे कधीही शक्य नाही, नरेंद्र मोदींचं 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन फसवं आहे : राहुल गांधी
मुंबई : किरीट सोमय्या मनोज कोटकांसोबत प्रचार करत असल्याने शिवसैनिक प्रचारापासून लांब, प्रचारात सौमय्या असतील तर शिवसैनिकांनी प्रचार कसा करायचा, शिवसैनिकांचा मनोज कोटकांना सवाल, सोमय्यांना प्रचारापासून दूर ठेवण्याची शिवसैनिकांची मागणी
नंदुरबार : काँग्रेस नेते माणिकराव गावित यांचे स्वीय सहाय्यक भगवान रामचंद्र गिरासे यांचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, नवापूर शहरातील कुवर रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृती चिंताजनक
शिर्डी : युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे विनापरवानगी सभा घेतल्याने कारवाई
कल्याणमध्ये आचारसंहिता पथकाने तीन लाखांची रोकड पकडली, पौर्णिमा टॉकीज चौकात एका गाडीतून रोकड जप्त
कल्याण : कल्याणमध्ये आचारसंहिता पथकाने तीन लाखांची रोकड पकडली, पौर्णिमा टॉकीज चौकात गाडीतून गुरुवारी रात्री रोकड जप्त
कल्याण : कल्याणमध्ये आचारसंहिता पथकाने तीन लाखांची रोकड पकडली, पौर्णिमा टॉकीज चौकात गाडीतून गुरुवारी रात्री रोकड जप्त
मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांचा रविवारी राजभवनात सकाळी 10.30 वाजता शपथविधी सोहळा, विद्यमान मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील शनिवारी सेवानिवृत्त होणार, न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग सध्या राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत
पार्थ पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे राहुल गांधींच्या भेटीला, पुण्यातील वेस्टीन हॉटेलमध्ये भेट
छत्तीसगडमधील धमतरी भागात नक्षलवाद्यांशी चकमक, सीआरपीएफचे दोन जवान शहीद
पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पुण्यात, सकाळी साडे दहा वाजता युवा स्वराज प्रतिष्ठान व पुणे शहर युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाला संबोधित करणार

Background

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. लोकसभा निवडणुकीआधाची पंतप्रधान मोदींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, सकाळी 8 वाजता एबीपी माझावर प्रक्षेपण

2.चौकीदाराची चौकशी करुन तुरूंगात टाकणार, नागपुरातल्या सभेत राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, आज चंद्रपूर आणि वर्ध्यात सभा

3.भाजपच्या विचारधारेशी असहमती म्हणजे देशविरोध नव्हे, ब्लॉगच्या माध्यमातून अडवाणींनी सोडलं मौन, भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्याची चर्चा

4. महाआघाडीत मनसेला नाकारणाऱ्या काँग्रेसकडूनच राज ठाकरेंच्या सभेचा आग्रह, माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा गौप्यस्फोट, राज 8 सभा घेण्याची शक्यता

5. निवडणूक आयोगाला तुरूंगात टाकण्याची भाषा करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरोधात गुन्हा दाखल, यवतमाळच्या सभेत केलेलं वादग्रस्त विधान भोवण्याची शक्यता

6. सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर पाच विकेटसनी विजय, जॉनी बेअरस्टोची 48 धावांची निर्णायक खेळी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.