LIVE BLOG : अरविंद सावंतांच्या उमेदवारीवरुन मिलिंद देवरांचं टीकास्त्र

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचं ट्विटरवरुन टीकास्त्र सोडलं आहे

ABP News Bureau Last Updated: 22 Mar 2019 11:18 PM

Background

1. लोकसभा उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणीतून, तर अमित शाह गांधीनगरमधून रिंगणात, लालकृष्ण अडवाणींचा पत्ता कापला2. नागपुरातून नितीन गडकरींच्या नावाची घोषणा, तर नगरमध्ये दिलीप गांधींचं तिकीट...More

शिवसेनेने आपली 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात रामदास आठवले यांनी मागितलेली मुंबईतील एकही जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे आता जिथे-जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील, तिथे तिथे रिपाइं त्यांच्याविरोधात उमेदवार देणार, रिपाइंची अधिकृत घोषणा. कल्याण लोकसभेतही आपण शिवसेनेविरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा रिपाइं जिल्हाध्यक्षांनी केली. रामदास आठवले यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती