LIVE BLOG : प्रियांका गांधींच्या टीममध्ये आता दोन मराठी चेहरे
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
ABP News Bureau
Last Updated:
20 Feb 2019 09:24 PM
अभिनेता रितेश देशमुख 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर' महाराष्ट्राचा गौरव पुरस्काराने सन्मानित
मराठा आरक्षणाचा सर्व्हे करणाऱ्या एका संस्थेचे खुद्द मुख्यमंत्रीच सदस्य, देवेंद्र फडणवीस हे 'म्हाळगी प्रबोधिनी'चे सदस्य असल्याची याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती, मराठा आरक्षणाचे निकष ठरवताना दिलेली गुणपद्धती साशंक असल्याचा विरोधकांचा आरोप
दहशतवाद संपवण्यात भाजप सरकार अपयशी, पुलवामा हल्ल्यात जवान शहीद झाले असताना मोदी यवतमाळमध्ये प्रचारसभेला : शरद पवार

प्रियांका गांधी यांच्या यूपी टीममध्ये आता तीनपैकी दोन मराठी साथीदार. कोल्हापूरचे बाजीराव खाडे यांच्यासह यवतमाळचे सचिन नाईक. दोघेही सहप्रभारी म्हणून पूर्व उत्तर प्रदेश मधे प्रियंका यांच्यासोबत काम करणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत LLB च्या पहिल्या वर्षाच्या (2017 पद्धती) 15 आणि 16 फेब्रुवारीला झालेल्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार, तारखा लवकरच जाहीर करणार

नाशिक : किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री गिरीश महाजन पुन्हा चर्चा करणार, मुंबईत जाऊन चर्चा करण्यापेक्षा नाशिकमध्येच चर्चा करण्याचं आवाहन, किसान सभेच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानं चर्चा करुन तोडगा निघेल, महाजन यांचा दावा

पुण्यात 200 फूट बोअरवेलमध्ये चिमुरडा पडला, सहा वर्षांचा रवी दहा फुटांवर अडकल्याची माहिती, आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावातील घटना, एनडीआरएफ टीम बचावकार्याला
शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षांच्या आमदारांसाठी एकत्रित स्नेहभोजनाचा कार्यक्रम, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सोमवारी 'वर्षा'वर स्नेहभोजन, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी युतीच्या आमदारांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न

अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची बदली बीडच्या जिल्हाधिकारीपदी, राज्य शासनाचा अमरावती विभागातील 'उत्कृष्ट जिल्हाधिकारी' पुरस्कार जाहीर
नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली, पुण्याचे अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती, बालाजी मंजुळे हे मराठी चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांचे चुलत भाऊ

पिंपरी चिंचवड : पिंपळे गुरवमध्ये शंकर मंदिराचा सभा मंडप उभारताना स्लॅब कोसळला, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
परभणी : 2017 मधील शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलल्याचं प्रकरण, गंगाखेड शुगर्स कारखान्याच्या तीन अधिकाऱ्यांना अटक, औरंगाबाद सीआयडी पथकाची कारवाई
राजस्थानच्या जयपूर सेंट्रल जेलमध्ये पाकिस्तानी कैद्याची हत्या, दोन गटांतील भांडणामुळे हत्या झाल्याची प्राथमिक माहिती

मुंबई : नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याबाबत तातडीची बैठक सुरु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्य मंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार उदय सामंत उपस्थित, आजच्या बैठकीत अधिसूचना रद्द करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

कोल्हापूर महापालिकेच्या सभेत पाईपलाईन विषयावरुन गोंधळ, पाईपलाईन योजनेचे काम रेंगळल्याने सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, अधिकारी फैलावर

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळाजवळ रास्तारोको, सकाळी झालेल्या अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांच्या रास्तारोको, गेल्या एक तासापासून कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा
24 फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर होणारा रासपचा मेळावा आता 5 मार्चला, धनगर आरक्षणाबाबत मेळाव्यात घोषणा होण्याची शक्यता, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे मेळावा पुढे ढकलला
मुंबई : काशी मीरा हायवेनजीक बनलेल्या ठाकुर मॉलजवळ स्फोटाचा आवाज, सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान मोठ्या आवाजाने खळबळ, बॉम्ब शोधक पथकासह काशी मीरा पोलीस घटनास्थळी
नाराज मंत्री अर्जुन खोतकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवेंना मदत करण्यास खोतकरांची नाराजीचा सूर
मुंबई : राज्यातील एक हजार बेघर भिक्षुक आणि दगडखान कामगार आक्रमक , मुंबईतील आझाद मैदानात जोरदार घोषणाबाजी, हक्काचे घर मिळावं, मुलांना शिक्षण मिळावं, रोजगार मिळावा या मागण्यांसाठी गेली 3 दिवसांपासून आंदोलन
संबंधित मंत्री यांची भेट होत नसल्याने बेघर भिक्षुक आणि दगडखान कामगार आक्रमक
राज्य मंत्रिमंडळात MMRDA च्या हद्दवाढीचा निर्णय, MMRDA चं कार्यक्षेत्र वाढणार, आता पालघरमधील वसई तालुका, रायगडमधील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर तालुका MMRDA च्या क्षेत्रात येणार
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास ठरवताना ग्राह्य धरलेली मुल्यांकन पद्धती अनाकलनीय असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप, राणे समितीनं जारी केलेली आकडेवारी आणि राज्य मागास प्रवर्गाची आकडेवारी यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचा अॅड. संचेती यांचा दावा
मंत्री गिरीश महाजन नाशिकहून निघणाऱ्या किसान लॉंग मोर्चा मधल्या आंदोलकांची दुपारी तीन वाजता भेट घेणार,
मंत्रिमंडळ बैठकीनंतर गिरीश महाजन नाशिकच्या दिशेने रवाना

पालघर : डहाणू, तलासरी भागात पुन्हा भूकंपाचा धक्का, दुपारी 1.30 च्या दरम्यान जाणवला मोठा धक्का, धुंदलवाडी,कासा,वाणगाव, डहाणू परिसरात बसला हादरा
सातारा : फलटणमधील प्रसिद्ध डॉक्टर संजय राऊत यांचं अपहरण, रात्री दवाखान्यातून घरी परतत असताना अपहरण,
डॉ. राऊत यांच्याच मोबाईलवरुन पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी, फलटण पोलिसात गुन्हा दाखल
तब्बल सहा तासांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश,
ठाण्यातील बिबट्या वनविभागाच्या ताब्यात
मुंबई उच्च न्यायालयाचा एनआयएला दणका, मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी झेरॉक्सच्या प्रती पुरावे म्हणून वापरण्यास हायकोर्टाची तूर्तास मनाई, साक्षीदारांच्या जबानीच्या मूळ प्रती एनआयएकडून गहाळ, याला विरोध करत आरोपी समीर कुलकर्णीची हायकोर्टात याचिका,
मात्र खटल्याला स्थगिती नाही

ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये शिरलेला बिबट्या आता सत्कार हॉटेलमध्ये दिसून आला. वन विभाग, पोलिस, अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी इथे दाखल झाले आहे. सत्कार हॉटोलच्या बेसमेंटमध्ये एका खोलीत या बिबट्याला अडकून ठेवल्याची माहिती मिळत आहे.
कोल्हापूर : जमिनीच्या बनावट दस्तऐवजाच्या आधारे फसवणूक, करवीरचे तत्कालीन तहसीलदार योगेश भीमराव खरमाटे आणि उत्तम विठ्ठल दिघेसह 17 जणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, महसूल विभागात खळबळ
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, स्फोटात दोन मुलांसह दाम्पत्याचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, एरिक्सनचे 453 कोटी रुपये चार आठवड्यात परत करण्याचा आदेश, पैसे परत न केल्यात तीन महिन्यांची कैद होणार, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण
ठाण्यात हॉटेल सत्कारच्या बेसमेंटमध्ये बिबट्या सापडला, वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, 21 फेब्रवारी म्हणजेच उद्या रात्री ८ वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार
पालघर : भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईत बैठक आहे. पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्याने भाजप पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाल्याने राजीनामे सत्र सुरु झालं आहे. याच पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती, वन विभाग आणि पोलिसांकडून शोध सुरु

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि समीक्षक नामवर सिंह यांचं निधन, वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास
Background
1. भारताकडे पुरावे मागणाऱ्या इम्रान खानच्या मंत्र्यांचे अतिरेक्यांशी संबंध, एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडीओत इम्रानचे मंत्री हाफिजच्या दहशतवाद्यांसोबत
2. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ, महागाई भत्ता 9 टक्क्यावरुन 12 टक्के होणार, अर्थमंत्री अरुण जेटलींची माहिती
3. युतीच्या तहात जिंकलो आता युद्धात जिंकायचं, उद्धव ठाकरेंची कार्यकर्त्यांना चेतना, शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार असल्याचा पुनरुच्चार
4. खासदार किरीट सोमय्यांविरोधात शिवसैनिकांचा दबाव वाढला, शिशिर शिंदेंसह शिवसैनिक मातोश्रीवर, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन घमासान
5. लोकसभा निवडणूक शरद पवार लढवणार, पहिल्यांदाच माध्यमांसमोर पवारांचं वक्तव्य, तर पवारांची तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरणार नसल्याचं स्पष्टीकरण
6. विदर्भ, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता, तर शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठेवावा, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन