LIVE BLOG : संजय काकडेंना मुख्यमंत्र्यांचा फोन, वर्षावर भेटणार
माढा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून संजयमामा शिंदे यांच्या नावाची चर्चा, तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
ABP News Bureau
Last Updated:
22 Mar 2019 05:52 PM
सोलापूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढातून उमेदवारी, शरद पवार यांची बारामतीत घोषणा
उस्मानाबादमधून आमदार राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार.
मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा पुन्हा स्वगृही परतणार. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपास्थितीत करणार भाजपत प्रवेश
काँग्रेसच्या वाटेवर असलेले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंना मुख्यमंत्र्यांचा फोन,
'वर्षा'वर उद्या संजय काकडे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, लोकसभा उमेदवारीच्या बदल्यात काकडेंवर मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का. ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
नालासोपारा पश्चिमेला कलंब समुद्रकिनारी दोन कुटुंबातील पाच जण बुडाले, एकाचा मृतदेह हाती, चौघे बेपत्ता
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार, संध्याकाळी सात वाजता दिल्लीत पत्रकार परिषद, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित होण्याची चिन्हं, 200 नावं जाहीर होण्याची शक्यता

कोल्हापूर : कोल्हापुरात 20 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त, कोल्हापूर पोलिसांची बचणी एसटी स्टँड परिसरात कारवाई, कॉम्पुटर आणि प्रिंटरसह इतर साहित्य देखील जप्त, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई
माढा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून संजयमामा शिंदे यांच्या नावाची चर्चा, तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
अभिनेता सलमान खान कुठल्याही पक्षाकडून निवडणुका लढवणार नसून कोणाचाही प्रचार करणार नाही, अशी माहिती त्याने स्व:ता ट्विट करुन दिली आहे.
सांगलीत वसंत दादा कुटुंबियांशी चंद्रकांत पाटील यांची चर्चा, विखे, मोहितेंपाठोपाठ वसंतदादा कुटुंबही भाजपत?
राष्ट्रवादीची मुंबईत पोस्टरबाजी,
- ज्यांना आम्ही नाकारलं त्यांना का गोंजारता
- दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार
- स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार
- राष्ट्रवादीचे पोस्टरच्या माध्यमातून सवाल
- मुंबईतल्या विविध भागात पोस्टर
मुंबईतील जुहू भागात आज मॉर्निंग वॉकर्स ग्रुपने आज धुळवाडीचा कार्यक्रम आयोजित केला. या निमित्त खासदार नारायण राणे, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग आणि जवळपास दीडशे ते दोनशे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी होळी सेलिब्रेशनसाठी जमले होते.
बुलडाणा : मकोकाची महिला आरोपी खामगावच्या शिवाजी नगर पोलिसांच्या तावडीतून फरार
घाटकोपरच्या भटवाडी विभागातील जनता सेवा संघाच्या वतीने 25 फूट उंच होलिकेचे दहन करण्यात आलं . क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अजहर याची प्रतिमा या होळीला लावण्यात आली होती.
Background
1. होळीच्या निमित्तानं राज्यभर समाजविघातक प्रतिकांचं दहन, मुंबईत मसूद अजहर, एफ-16 आणि पबजीची प्रतिकृती जाळली, वसर्तही धुलीवंदन साजरं
2. पार्थ आणि रोहित पवारांकडून पिंपरी चिंचवडमध्ये होळी पूजन, त्यांच्या बद्दलच्या वायफळ चर्चांचं दहन केल्याचं विधान
3. भाजपात गेलेल्या सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी, नगरच्या लढतीची चुरस वाढली
4. भारतीय बँकांना 14 हजार कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक, 29 मार्चपर्यंत कोठडी, भारतातल्या संपत्तीचाही लवकरच लिलाव
5. 70 जणांचा जीव घेणाऱ्या 2007 मधल्या समझौता बॉम्बस्फोटप्रकरणी असीमानन्दची सुटका, एनआयए न्यायालयाचा निर्णय
6. नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका, काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांची तारांबळ