- Home
-
Election
-
Elections
LIVE BLOG : BREAKING : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या अरविंद सावंतांचा समावेश, उद्या शपथविधी, सूत्रांची माहिती
LIVE BLOG : BREAKING : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या अरविंद सावंतांचा समावेश, उद्या शपथविधी, सूत्रांची माहिती
देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा
ABP News Bureau
Last Updated:
30 May 2019 12:01 AM
नागपूर :
नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी विकास गुडधे (42वर्ष) यांची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या,
विकास राणा प्रतापनागर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते, आत्महत्येच कारण अस्पष्ट
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्लीसाठी रवाना, मोदींच्या शपथविधीला हजेरी लावणार
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या अरविंद सावंतांचा समावेश, उद्या शपथविधी, सूत्रांची माहिती
जालना : वडीगोद्री रोडवर बाईक आणि ट्रकची समोरासमोर धडक, बाईकवरील तीन युवक जागीच ठार
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी नरेंद्र मोदींच्या शपथविधीला जाणार
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी नरेंद्र मोदींच्या शपथविधीला जाणार
पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ठ पूर्ण न केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बँकर्सची कानउघडणी,
यापुढे बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे टार्गेट पूर्ण केले नाही तर त्यांच्यावर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा
शिवसेनेचा एकच खासदार उद्या मंत्रीपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती
सेनेच्या कोट्यातील इतर मंत्र्यांचा अधिवेशनानंतर शपथविधी
चंद्रपूर येथे आज मौसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद,
कमाल तापमान : 48 अंश सेल्सिअस
परभणी : गंगापूर रोडवर रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात अभिजीत शिंदे या तरुणाचा मृत्यू झाला, नुकताच त्याचा साखरपुडा झालेला
कोल्हापूर : कोल्हापूर- गोवा मार्गावर करूळ घाटात वॅगेन आर कारला अपघात, गगनबावडा जवळील करूळ घाटात वॅगेन आर कार 300 खोल दरीत अडकली, गगनबावडा पोलीस आणि सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल
,
स्थानिकाकडून बचाव कार्य सुरू
,
खोल दरीतून जखमी चालकाला बाहेर काढण्यात यश
मुंबई : राज ठाकरे आणि शरद पवार यांची भेट, पवारांच्या निवासस्थानी भेट, विधानसभा निवडणुकीत मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचालींना सुरुवात झाली असल्याची चर्चा
महाराष्ट्रातल्या सेना भाजपच्या दोन जेष्ठ नेत्यांना राज्यपाल पद मिळण्याची शक्यता ,
शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या गळ्यात राज्यपाल पदाची माळ गळ्यात पडण्याची शक्यता
,
शिवसेनेला मंत्रिपद कमी मिळाल्यास राज्यपालपद शिवसेनेच्या पदरात पडू शकते,
असं झाल्यास शिवसेनेला पहिल्यांदा राज्यपाल पद मिळू शकतं
भाजपकडून लोकसभा निवडणुक चांगलं काम केलेल्या एका जेष्ठ नेत्याला राज्यपाल पदाची संधी
महाराष्ट्रातल्या सेना भाजपच्या दोन जेष्ठ नेत्यांना राज्यपाल पद मिळण्याची शक्यता ,
शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या गळ्यात राज्यपाल पदाची माळ गळ्यात पडण्याची शक्यता
,
शिवसेनेला मंत्रिपद कमी मिळाल्यास राज्यपालपद शिवसेनेच्या पदरात पडू शकते,
असं झाल्यास शिवसेनेला पहिल्यांदा राज्यपाल पद मिळू शकतं
भाजपकडून लोकसभा निवडणुक चांगलं काम केलेल्या एका जेष्ठ नेत्याला राज्यपाल पदाची संधी
प्रकृतीच्या कारणामुळे नव्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची जबाबदारी देऊ नका, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरमधून पराभूत झालेले माजी खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कारखान्याच्या कामासाठी भेट घेतल्याचे महाडिकांकडून स्पष्टोक्ती, काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याने चर्चेला सुरुवात
पाण्यात विषबाधेमुळं 10 रानडुक्कर, 19 नीलगाईंचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील सामरोद जंगलातील
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वाडी मध्ये खुशी उर्फ रिया सिंह ( वय 17 वर्ष ) या बारावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली,
खुशीला 66 टक्के गुण मिळाले होते, मात्र, तिला यापेक्षा जास्त गुणांची अपेक्षा होती, निकाल पाहून घरी परतलेल्या खुशीने तिच्या रूममध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली
गोंदिया : शहराच्या नेहरु चौकात मध्यरात्री 22 वर्षीय मुन्ना शर्मा या तरुणाची अज्ञान इसमाने धारदार शस्त्राने वार करत डोक्यावर दगडाने ठेचून हत्या
भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी सोमवारी रात्री 14 किमी अनवाणी चालत जाऊन दादरच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत एकता कपूरही होत्या. एकता कपूर यांनी या बाबतचा एक व्हिडीओ सोशल मिडीयात टाकला आहे.
Background
1. संभाव्य मंत्रिमंडळाबाबत नरेंद्र मोदी आणि अमित शाहांमध्ये दिल्लीत 5 तास चर्चा, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
2. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी अजूनही ठाम, अध्यक्षपदासाठी स्वच्छ प्रतिमेच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाचीही चर्चा
3. विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घ्या, आघाडीच्या बैठकीत उमटला नवा सूर, तर मावळच्या पराभवाची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारली
4. पायल तडवी प्रकरणात 2 जण अटकेत, पायलची आत्महत्या नाही तर हत्या, कुटुंबियांचा आरोप, दोषींवर कारवाईचं महाजनांचं आश्वासन
5. लठ्ठपणावरुन होणाऱ्या सततच्या टोमण्याला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार, पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा
6. अश्विनी बिद्रे खटल्यातून सरकारी वकील माघार घेण्याच्या तयारीत, नवी मुंबई पोलिस सहकार्य करत नसल्याचा प्रदीप घरत यांचा आरोप