LIVE BLOG : हाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा' दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 21 Feb 2019 10:55 PM
नाशिक : किसान सभेचा लाँग मार्च स्थगित, गिरीश महाजन आणि आंदोलकांची बैठक संपली, बैठकीत तोडगा निघाल्याचा महाजनांचा दावा, तीन महिन्यात वन हक्क जमिनीचे सर्व दावे निकाली काढण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
भारताच्या दबावासमोर पाकिस्तानने गुडघे टेकले, हाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा' दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी
भारताच्या दबावासमोर पाकिस्तानने गुडघे टेकले, हाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा' दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी
उद्धव ठाकरे धनगर शिष्टमंडळासोबत वर्षा बंगल्यावर दाखल, धनगर आरक्षणावर मुख्यमंत्र्यांसोबत होणार चर्चा, आचारसंहिता लागण्याआधी धनगर आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग
नागपुरात उद्यापासून 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, ज्येष्ठ नाटककार आणि लेखक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन


पाकिस्तानला होणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, नद्यांचं पाणी जम्मू काश्मिर आणि पंजाबकडे वळवणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती



पगारदारांसाठी आनंदाची बातमी, ईपीएफच्या व्याजदरात वाढ, व्याजदर 8.55 वरुन 8.65 टक्क्यांवर
विजयसिंह मोहिते पाटलांचा आग्रह आणि देशातल्या मंडळींमुळे माढ्यातून लोकसभा निवडणूक लढणार, शरद पवारांकडून स्वतःची उमेदवारी घाेषित
नाशिक : किसान सभेच्या लाँग मार्चला सुरुवात, गिरीश महाजन आंदोलकांची भेट घेणार, शेतकरी मोर्चावर तोडगा निघण्याची शक्यता
उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपाचं जागावाटप जाहीर
सपा 37, बसपा 38 जागा,
अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाला 3 जागा मिळण्याची शक्यता
मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत काँग्रेसने अद्यापही आपली भूमिका कळवलेली नाही, होकार कळवल्यानंतर कोणत्या जागा देता येतील, याबाबत चर्चा करणार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती, वंचित आघाडीला महाआघाडीत घेण्याचेही प्रयत्न सुरु
नाशिक : मुख्यमंत्री कार्यलयाकडून लेखी आश्वासन नाशिक प्रशासनाला मिळालं, थोड्याच वेळात हे पत्र घेऊन गिरीश महाजन पुन्हा किसान सभेच्या नेत्यांना भेटण्याची शक्यता

यवतमाळ : युवासेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांकडून 3 ते 4 जम्मू काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण, वैभवनगर परिसरातील घटना, युवासेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु, मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
साहित्यिक ग दि माडगूळकर यांचे पुत्र श्रीधर माडगूळकर यांचं निधन
नाराज अर्जुन खोतकर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीला

, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आदित्य ठाकरे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक सुरु, शिव

सेना-भाजप युतीनंतरही नाराज अर्जुन खोतकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकला
मुंबई : महापालिका खाजगी प्राथमिक शाळा वेतन अनुदान कृती समितीच्या सदस्यांची आज शिवसेनाभवनावर बैठक,
शाळांना अनुदान मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार, 700 शिक्षकांचं गेले अकरा दिवस आंदोलन सुरु, आंदोलनासंदर्भात उद्धव ठाकरे तोडगा काढण्याची शक्यता
शिवसेनेसोबतच्या युतीनंतर अडगळीत पडलेल्या घटक पक्षांना भाजपकडून गोंजारण्याचा प्रयत्न, राज्यातील रिक्त महामंडळांची पदांवर नियुक्ती करण्यास सुरुवात, घटकपक्षांसोबतच शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पदं देऊन युतीसाठी अनुकूल वतावरण करण्याचा प्रयत्न
थोड्याच वेळात आमदार छगन भुजबळ किसान मोर्चात होणार सहभागी
भाजपसाठी पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही म्हणून शिवसेनेशी युती केली, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचं वक्तव्य
सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पाटील यांचं नाव पुढे, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, सातारा, वाई, कोरेगाव, पाटण येथे माथाडी मतदारांवर पाटील यांची पकड
निर्माता राजकुमार बडजात्या यांचे मुंबईत निधन, दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे वडिल होते.
रायगडच्या आपटा येथील वस्तीच्या बसमध्ये सापडलेली वस्तू बॉम्बच असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. शिवाय त्या बॉम्बमध्ये 3 किलो युरिया पावडर असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. कर्जतहून आपट्याला जाणाऱ्या एसटीत बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याची चर्चा रात्रीपासून होती. त्यानंतर कर्जतहून बॉम्बशोधक पथक आपट्यात दाखल झालं आणि त्यांनी तो बॉम्ब निकामी केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर आता आपट्यासारख्या गावात एसटीत बॉम्ब ठेवण्यात आल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी तपासाचा वेग वाढवल्याचंही कळतंय
नाशिक : किसान लाँग मार्चचा बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका, मोर्चा निघाल्याने ठिकठिकाणी पोलिसांनी वाहतूक थांबवली, अनेक परीक्षार्थी आणि शिक्षक, सुपरवायझर अडकले
विदर्भ आणि मराठवाड्याला वादळी पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 20 आणि 21 फेब्रुवारीला काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.
विदर्भ आणि मराठवाड्याला वादळी पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 20 आणि 21 फेब्रुवारीला काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.
नाशिक : किसान मार्च सुरु होताच मुंबई नाका परिसरात वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अंदाजे 7 ते 8 हजार आंदोलक मोर्चात सहभागी, शहर पोलिसांसह नगर, मालेगावमधून पोलिस बंदोबस्त तैनात, पोलिस आयुक्तांसह, पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर
नाशिक : किसान मार्च सुरु होताच मुंबई नाका परिसरात वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अंदाजे 7 ते 8 हजार आंदोलक मोर्चात सहभागी, शहर पोलिसांसह नगर, मालेगावमधून पोलिस बंदोबस्त तैनात, पोलिस आयुक्तांसह, पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर
पुणे : बोअरमध्ये 12 तासांपासून अडकलेला चिमुरड्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश.
अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री अवकाळी पाऊस
किसान सभेच्या मोर्चाला सुरुवात, सुरुवातीला वाहने पुढे काढली जात आहेत. त्यानंतर आंदोलनकर्ते पायी निघणार
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात अनेक भागात रात्री 2 वाजता विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, गहू, हरभरा, आंबा, कांदा, संत्रा, पिकाचे नुकसान होण्याची शक्यता
रायगड : आपटा येथील एसटी बसमध्ये सापडलेली बॉम्बसदृश्य वस्तू निकामी करण्यात यश, बॉम्ब शोधक पथकाला बॉम्ब निकामी करण्यात यश, रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्करांनी केली घटनास्थळाची पाहणी
येवला : शिर्डी महामार्गावरील पिंपळगाव जलाल जवळील टोलनाक्याजवळ अज्ञात वाहनाने रात्रीच्या सुमारास बिबट्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.
किसान सभेचा लॉंगमार्च सकाळी 9 वाजता निघणार, किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा,
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या बरोबर झालेल्या बैठकी नंतर घोषणा
पिंपरी चिंचवड : मंदिर सभा मंडप स्लॅब कोसळल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल, सांगवी पोलिसांकडून ठेकेदार राहुल जगतापला अटक
पिंपरी चिंचवड : मंदिर सभा मंडप स्लॅब कोसळल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल, सांगवी पोलिसांकडून ठेकेदार राहुल जगतापला अटक
रायगड : पेण ते आपटा येथे जाणाऱ्या वस्ती एसटी बसमध्ये बाँम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ, अलिबाग इथून बाँम्ब स्क्वॉड आपटाला रवाना, एसटी बस पोलीस संरक्षणात, आपटा गावाला छावणीचं स्वरुप

Background

1. शेतकऱ्यांच्या मोर्चावर तोडगा निघाल्याचा गिरीश महाजनांचा दावा, तर लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे नाही, आमदार जेपी गावितांचा पवित्रा

2. राज्यात आजपासून बारावीची परीक्षा, जवळपास पंधरा लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणार, अर्धा तास आधी हजेरी लावणं बंधनकारक

3. रश्मी वहिनींच्या हातची साबुदाणा खिचडी आणि वड्यामुळे युतीची दिलजमाई, मुख्यमंत्र्यांचं खुमासदार उत्तर, लोकमत पुरस्कार सोहळ्यात दिलखुलास मुलाखत

4. पुलवामा हल्ल्यानंतर लगेच प्रचार सभा घेणं सुचू कसं शकतं? नांदेडमधील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सभेत शरद पवारांचा मोदींना सवाल, सभेत पुलवामातील शहीदांनाही श्रद्धांजली

5. धनगर आरक्षणासाठी उद्धव ठाकरे आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, त्याआधी शिवसेनेतील सर्व धनगर पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावणं

6. अयोध्या प्रकरणी 26 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी, पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर प्रकरणाची सुनावणी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.