Loksabha Election 2019 : तिसऱ्या टप्प्यात राज्यात 14 मतदारसंघांमध्ये मतदान

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

ABP News Bureau Last Updated: 23 Apr 2019 05:39 PM
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 55.08 टक्के मतदान,
कोल्हापुरात सर्वाधिक 65.49 टक्के मतदान, ताखालोखाल हातकणंगल्यात 62.98 मतदान,
पुणेकर यावेळीदेखील सर्वात मागे, पुण्यात केवळ 42.40 टक्के लोकांनी मतदान केले आहे.
जळगाव - ५१.७८,
रावेर - ५३.५०,
जालना- ६०.५९,
औरंगाबाद- ५६.३७,
रायगड- ५३.१५,
पुणे- ४२.४०,
बारामती- ५२,
अहमदनगर-५३.८८,
माढा-५०.२०,
सांगली-५९.४२,
सातारा-५१.६७,
रत्नागिरी-सिंधुदुर्ग-५५.७९,
कोल्हापूर-६५.४९,
हातकणंगले- ६२.९८,
शरद पवार हे मुंबईचे मतदार, बारामतीत थांबून सुप्रिया सुळेंसाठी काम करणं नियमानुसार चुकीचं, शरद पवारांवर नियमानुसार कारवाई, विनोद तावडेंचं स्पष्टीकरण
जळगाव : वाढत्या तापमानामुळे भोईटे शाळेच्या मतदान केंद्रावरील होमगार्डची प्रकृती ढासळली
जळगाव : चोपडात माजी आमदार डॉ सुरेश पाटील यांनी त्यांच्या 96 व्या वर्षी आपले मतदान केले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, त्यांच्या पत्नी डॉ स्मिताताई पाटील यांनीही मताधिकार बजावला
सिंधुदुर्ग : आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी कणकवली भिरवंडे येथील जि.प शाळा जांभूळ येथे मतदानाचा हक्क बजावला
इस्लामपूर : उन्हाचा पारा वाढल्याने मतदान केंद्रावरील मतदारांच्या रांगा झाल्या विरळ, 38 डिग्री सेल्सिअस तापमान झाल्याने मतदारांनी सकाळीच बजावला मतदानाचा हक्क
गोव्यात मतदारांमध्ये उत्साह, दुपारी 1 पर्यंत 45.26 टक्के मतदान, गोव्यात आज लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकांसाठी मतदान
रोह्यात पोलिंग एजंटवर  गुन्हा दाखल करण्याचे आदेश, रोहा शहरातील मतदान केंद्र क्रमांक 14 वर पोलिंग एजंट हा मतदारांना शाई लावत असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. यावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी तातडीने या केंद्रावरील सर्व कर्मचारी बदलण्याचे तसेच पोलिंग एजंटवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले

औरंगाबाद : झाकिर हुसेन शाळा येथे बोगस मतदान करणाऱ्या एकास पकडले. एमआयएमचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती
पोलिंग एंजेटनेच माळशिरस तालुक्यातील गिरझणी येथे मशीनचे काढले फोटो
औरंगाबाद टिकटॉक वर मतदान व्हायरल केल्याने गुन्हा दाखल. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशाने गुन्हा दाखल, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
औरंगाबाद टिकटॉक वर मतदान व्हायरल केल्याने गुन्हा दाखल. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशाने गुन्हा दाखल, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
सांगली : स्ट्रेचरवरून जाऊन एका रुग्णाने आपला मतदानाचा हक्क बजावला. अंथरुणाला खिळून असणाऱ्या संपतराव पाटील या निवृत्त शिक्षकाने सांगली लोकसभेसाठी सांगलीवाडी येथे प्रशासनाच्या मदतीने आज सकाळी मतदान केले
मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत चितराळी शाळेत मतदानाचा हक्क बजावला
बुलडाणा :
मतदानापासून वंचित ठेवलेल्या नागरिकाची मलकापूरध्ये प्रेत यात्रा काढली.

शासनाने मलकापूर शहरातील काही नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप,

घरच्यांच्या उपस्थित काढली अंत्ययात्रा
पुणे : पुण्यातील भानूसाहेब हिरे हायस्कूलमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचं मतदान
पुणे : पुण्यातील भानूसाहेब हिरे हायस्कूलमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचं मतदान
कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडीमध्ये मतदान प्रक्रिया ठप्प, 2 तासांपासून मशीनमध्ये झाला बिघाड, मतदारांमध्ये संताप, मतदार मतदान केंद्रावरवर भर उन्हात ताटकळत थांबले
सकाळी 11 वाजेपर्यंत 21.38 टक्के मतदान - जळगाव - 20.34 टक्के, रावेर - 21.24 टक्के, जालना - 23.28 टक्के, औरंगाबाद - 20.97 टक्के, रायगड - 23.94 टक्के, पुणे - 15.50 टक्के, बारामती - 21.33 टक्के, अहमदनगर - 20.26 टक्के, माढा - 19.63 टक्के, सांगली - 20.09 टक्के, सातारा - 28.67 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 24.96 टक्के, कोल्हापूर - 25.49 टक्के, हातकणंगले - 23.45 टक्के

हातकणंगले : राजू शेट्टी यांनी कुटुंबासमवेत शिरोळ मतदान केंद्रावर केले मतदान
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान 100% व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यातच आजरा तालुक्यातील उत्तूर या गावात आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. हे मतदान केंद्र जर आपण पाहिलं तर जणू काही या ठिकाणी एखादा घरगुती कार्यक्रम आहे की काय अशा पद्धतीची सजावट आणि रेड कार्पेट घालण्यात आला आहे. या मतदान केंद्राबाहेर मंडप घालण्यात आला असून जागोजागी फुलांची सजावट करण्यात आली आहे. गावातील मतदान 100% व्हावे यासाठी प्रशासनाने मोठे प्रयत्न केले आहेत
औरंगाबाद : रामनगर भागात नवरीने लग्नाआधी मतदान केले. सुप्रिया बाबासाहेब निकम असं तिचं नाव.

औरंगाबाद वेरुळ आश्रमातील शांतिगिरी महाराज यांनी ट्रॅक्टरवर जाऊन मतदान केलं. शांतिगिरी महाराजांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

भारतीय महिला संघाची कर्णधार आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती स्मृती मानधनाने सांगलीतील श्रीमती सुंदराबाई दडगे गर्ल्स हायस्कूल मधील मतदान केंद्रावर मतदान केले, स्मृतीने यावेळी तरुण-तरुणींनी आपला नेता निवडण्यासाठी मतदान करण्यास बाहेर पडावे असे आवाहन केले.

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे मतदान केले

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे, पत्नी मंदाकिनी खडसे, मुलगी शारदा खडसे, मुलगी रोहिणी खडसे यांच्या समवेत कोथळी गावातील जिल्हा परिषद शाळेत मतदान केले
पंढरपूर: अकलुज येथे विजयसिंह मोहिते पाटलांचं पत्नी नंदिनीसह मतदान
रायगड: शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांचं सकाळी आंबेपुर पेझारी, अलिबाग येथे मतदान
पुण्यात व्यावसायिकांची मतदानासाठी नवीन शक्कल: मतदारांना मत दिल्यानंतर एकावर एक मिसळ फ्री, एकावर एक पॅटीस फ्री, खाद्यपदार्थांवर 10 टक्के डिस्काउंट, अशा ऑफर्स
पुण्यात व्यावसायिकांची मतदानासाठी नवीन शक्कल: मतदारांना मत दिल्यानंतर एकावर एक मिसळ फ्री, एकावर एक पॅटीस फ्री, खाद्यपदार्थांवर 10 टक्के डिस्काउंट, अशा ऑफर्स
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे येथे मतदान
कोल्हापूर: कसबा बवड्यात अनेक मतदारांना मतदान केंद्र शोधण्यात अडचण, मतदार संतप्त, केंद्रप्रमुखांशी वादावादीचे प्रकार
सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
कोल्हापूर : 6.71 टक्के ,
पुणे : 8.71 टक्के ,
माढा : 7.25 टक्के,
बारामती : 6.1 टक्के,
सांगली : 7 टक्के ,
अहमदनगर : 4 टक्के,
औरंगाबाद : 9 टक्के ,
सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
कोल्हापूर : 6.71 टक्के ,
पुणे : 8.71 टक्के ,
माढा : 7.25 टक्के,
बारामती : 6.1 टक्के,
सांगली : 7 टक्के ,
अहमदनगर : 4 टक्के,
औरंगाबाद : 9 टक्के ,
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यात दरेगाव येथे सपत्नीक मतदान केलं

कोल्हापूर : सकाळी 9 वाजेपर्यंत 6.71 टक्के मतदान
काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच सोनसळ गावी कुटुंबासह मतदान

अहमदनगर: बोलहेगाव गाडीलकर शाळा येथे ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड, संग्राम जगतापांची मतदानाला जाण्याऐवजी ऐवजी तिथे धाव
अहमदनगर: बोलहेगाव गाडीलकर शाळा येथे ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड, संग्राम जगतापांची मतदानाला जाण्याऐवजी ऐवजी तिथे धाव
भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे कुटुंबासह मतदान, शाह गांधीनगरमधून मैदानात

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात गारज येथे सकाळी सात वाजेपासून मतदान यंत्रामध्ये बिघाड
औरंगाबाद: गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे बुथ क्रमांक 329 सकाळी सात वाजेपासून मतदान यंत्रामध्ये बिघाड, मतदारांची बूथवर गर्दी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये केले मतदान ,
मतदान केंद्रावर नागरिकांनी गर्दी
पुण्यातील कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा निवडणूक यंत्रणेवर आरोप, महर्षीनगर भागातील मतदानकेंद्रांच्या बाहेर असलेले कॉंग्रेसचे बुथ हलवल्याचा पक्षपातीपणाचा आरोप, मतदानकेंद्राबाहेरील मंडप हा भाजपच्या झेंड्याच्या रंगाचा
सांगली लोकसभेचे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी चिंचणी या मूळ गावआपला मतदानाचा हक्क बजावला
कापूस वाडगाव येथील केंद्र क्रमांक 273 चे सकाळी सात वाजल्यापासून बंद पडलेले मशीन अद्याप सुरु नाही
कापूस वाडगाव येथील केंद्र क्रमांक 273 चे सकाळी सात वाजल्यापासून बंद पडलेले मशीन अद्याप सुरु नाही
औरंगाबाद: विहामांडवा गटातील टाकली अंबड येथे मतदान यंत्रामध्ये बिघाड
पुण्यातील कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी सॅलीसबरी पार्क भागातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचले.
पुण्यातील कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी सॅलीसबरी पार्क भागातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सहपरिवार मतदान
कोल्हापूर लोकसभा राष्ट्रवादी उमेदवार धनंजय महाडिक यांचं सहकुटुंब कागल सहकारी केंद्र येथे मतदान
कोल्हापूर लोकसभा राष्ट्रवादी उमेदवार धनंजय महाडिक यांचं सहकुटुंब कागल सहकारी केंद्र येथे मतदान
जालना : रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव आमदार संतोष दानवे त्यांच्या पत्नी असे सहपरिवार मतदान केले
बेळगाव: लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी बेळगावात मतदानाला सुरुवात, अनेक मतदान केंद्रात यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदारांचा खोळंबा
औरंगाबाद: इम्तियाज जलील यांचं औरंगाबादमध्ये सहकुटुंब मतदान
सांगली : स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी त्याच्या पद्माळे या मूळ गावी मतदान केलं. आज सकाळी 7.15 च्या सुमारास पाटील यांनी पद्मळे गावी मतदान केलं
रायगड: मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी रायगडमध्ये जय्यत तयारी, रांगोळी काढून, फुले, फुग्यांचे डेकोरेशन करून मतदानाला सुरुवात
जळगाव: जळगाव तालुक्यातील कुवर खेडा येथे जळगाव लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी उमेदवार गुलाबराव देवकरांचं पत्नी छाया देवकरसह मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केले, गुजरातमधील अहमदाबादमध्ये मोदींचे मतदान, मतदान करण्याआधी आईची भेट घेतली
भाजप अध्यक्ष अमित शाह मतदान केंद्रावर दाखल
जळगाव लोकसभा वंचित आघाडी उमेदवार अंजली बाविस्कर यांच देवदर्शन करून मतदान

जळगावच्या रत्ना जैन प्राथमिक विद्यालयातील मशीनमध्ये बिघाड, अद्याप मतदान सुरु नाही, पाहणीसाठी
तहसीलदार शाळेत पोहोचले
औरंगाबाद गोदावरी शाळेतील कंट्रोल युनिट खराब, डमी मतदान करतानाच यंत्रात बिघाड, दहा मिनिटे उशिराने मतदान सुरू होणार
अजित पवार कुटुंबासह बारामतीतील काटेवाडी जिल्हा परिषद शाळेत मतदानासाठी उपस्थित
गोवा : लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज, 7 वाजता सुरु होणार मतदान

Background

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांचा समावेश आहे. उदयन राजे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, चंद्रकांत खैरे यासारख्या दिग्गजांचं भवितव्य मतयंत्रांमध्ये बंद होणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर सतत चर्चेत राहिलेल्या माढा, अहमदनगर, जालना, सातारा, जळगाव या जागांचा समावेश या टप्प्यात आहे. देशभरातील 15 राज्यांमधल्या 116 जागांसाठी मतदान होईल.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

या टप्प्यात दोन कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये एक कोटी 33 लाख 19 हजार 10 पुरुष तर एक कोटी 24 लाख 70 हजार 76 महिला आणि 652 इतर नागरिक मतदान करणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यात 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार आहेत. बारामती मतदारसंघात सर्वाधिक (चार) महिला उमेदवार आहेत. पुणे आणि माढा मतदारसंघात सर्वाधिक (प्रत्येकी 31) उमेदवार असून सर्वात कमी (9) उमेदवार सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत.

तिसऱ्या टप्प्यासाठी 56 हजार 25 बॅलेट युनिट तर 35 हजार 562 कंट्रोल युनिट आहेत. 37 हजार 524 व्हीव्हीपॅट यंत्रे या चौदा मतदार संघात देण्यात आली आहेत. एकूण 1 लाख 41 हजार 113 कर्मचारी नियुक्त असून 17 हजार 192 कर्मचारी राखीव आहेत.

ऐनवेळी अपेक्षित उमेदवारांचं कापलेलं तिकीट, दुसऱ्या पक्षातील 'आयारामां'ना दिलेली उमेदवारी, त्यावरुन झालेले रुसवे-फुगवे यामुळे यापैकी बहुतांश मतदारसंघ चर्चेत राहिले होते. सगळ्याच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे प्रचारही जोरदार झाला. आता मतदारराजा ईव्हीएमचं बटण दाबून कुणाला कौल देतो, यावरच दिग्गजांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील रंगतदार लढती

पुणे : गिरीश बापट (भाजप) vs मोहन जोशी (काँग्रेस)
बारामती : कांचन कुल (भाजप) vs सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) 
माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर  (भाजप) vs संजय शिंदे (राष्ट्रवादी)
सांगली : संजय पाटील  (भाजप) vs विशाल पाटील (स्वाभिमानी शेतकरी संघटना - महाआघाडी)
सातारा :  नरेंद्र पाटील (शिवसेना) vs उदयनराजे भोसले  (राष्ट्रवादी)
कोल्हापूर :  संजय मंडलिक (शिवसेना) vs धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
हातकणंगले : धैर्यशील माने (शिवसेना) vs राजू शेट्टी  (स्वाभिमानी शेतकरी संघटना - महाआघाडी)
जळगाव :  उन्मेष पाटील (भाजप) vs गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
रावेर :  रक्षा खडसे (भाजप) vs उल्हास पाटील (काँग्रेस)
अहमदनगर :  सुजय विखे (भाजप) vs संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
जालना :  रावसाहेब दानवे (भाजप) vs विलास औताडे (काँग्रेस)
औरंगाबाद :  चंद्रकांत खैरे  (शिवसेना) vs सुभाष झांबड (काँग्रेस)
रायगड :  अनंत गीते  (शिवसेना) vs सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग :  विनायक राऊत  (शिवसेना) vs नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस) vs निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)

महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, ओदिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ही तेरा राज्य आणि दादरा नगर हवेली, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील 116 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. गुरुवार 23 मे 2019 रोजी निकाल जाहीर होणार आहे.

तिसरा टप्पा - (115)

आसाम - 4
बिहार - 5
छत्तीसगड - 7
गुजरात - 26
गोवा - 2
जम्मू काश्मिर - 1
कर्नाटक- 14
केरळ - 20
महाराष्ट्र - 14
ओदिशा - 6
त्रिपुरा - 1
उत्तर प्रदेश- 10
पश्चिम बंगाल - 5
दादरा नगर  - 1
दमण - दीव - 1

भाजपाध्यक्ष अमित शाह हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले असून गांधीनगरमधून त्यांचा फैसला होईल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पहिल्यांदाच वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय मुलायम सिंह यादव, पप्पू यादव, संबित पात्रा यासारख्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.