LIVE BLOG : दगडाच्या खदाणीत स्फोट ,दोन मुलांचा जागीच मृत्यू

देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

ABP News Bureau Last Updated: 21 May 2019 11:46 PM
चार वेळा मुख्यमंत्र्यांना भेटूनही आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नाही, विद्यार्थ्यांनी स्वागत समारंभात जेवताना मुख्यमंत्र्यांकडे खंत केली व्यक्त, पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असल्याचे लग्नात हजर असलेल्या अनाथ मुलांची माहिती
यवतमाळ शहरातील ताज कुशन मेकरच्या दुकानात 11 तलवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. पांढरकवडा मार्गावर जिन्नाद खान बशीर खान उर्फ सलीम याचे ताज कुशन मेकरचे दुकान असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याठिकाणी जाऊन पंचासमक्ष झडती घेतली असता दुकानात 11 मोठ्या तलवारी आढळून आल्या. बेकायदेशीरपणे बाळगलेल्या या तलवारी जप्त करून हा शस्त्रसाठा नेमका कशासाठी बाळगण्यात आला याबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
एस्प्लनेड मेन्शनची अवस्था दुरूस्तीच्या पलीकडे, इमारत पाडण्याशिवाय पर्याय नाही,

आयआयटी मुंबईचा अहवाल हायकोर्टाकडे सादर, ४ जूनला हायकोर्टात सुनावणी
मुंबई : राज्यात दुष्काळग्रस्त भागात पुन्हा एकदा क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याच्या सरकारच्या हालचाली, लांबलेला पावसाचा अंदाज आणि धरणातील पाणीसाठ्यात होणारी घट पाहता सरकारच्या दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सरकारची तयारी
जालना : दगडाच्या खदाणीत स्फोट ,दोन मुलांचा जागीच मृत्यू
जालना : दगडाच्या खदाणीत स्फोट ,दोन मुलांचा जागीच मृत्यू
यवतमाळ : वणी शहरातील वेकोली क्षेत्राच्या कैलासनगर येथे शौचालयाचे गटार साफ करताना 2 जणांचा मृत्यू,
हनुमान कोडापे आणि महादेव वाघमारे असे मृतकांची नावे,
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे मजुरांचा मृत्यू झाल्याचा आरोप
नाशिक मुंबई महामार्गावर खर्डी जवळ एचपी कंपनीचा गॅस टँकर पलटी झाल्यानं वाहतूक वळविण्यात आलीय, सायंकाळ च्या सुमारास टँकर पलटी झाल्यानं गॅस गळतीचा धोका असल्यानं सुरवातीला काही काळ दोन्ही मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती.
नाशिक मुंबई महामार्गावर खर्डी जवळ एचपी कंपनीचा गॅस टँकर पलटी झाल्यानं वाहतूक वळविण्यात आलीय, सायंकाळ च्या सुमारास टँकर पलटी झाल्यानं गॅस गळतीचा धोका असल्यानं सुरवातीला काही काळ दोन्ही मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती.
अमरावती : मेळघाटच्या धारणी तालुक्यातील भूलोरी गावात भीषण आग, आगीत अनेक आदिवासी बांधवांचे जवळपास 50 ते 60 घरे जळून खाक, चार बैलांचा होरपळून मृत्यू..
, आग विझविण्यासाठी मध्य प्रदेशच्या शहापूर येथील अग्निशमन दल दाखल
सांगली : तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावाला गारपिटीने झोडपले, गावात गारांचा खच, 325 हेक्टरवरील द्राक्ष बागांचं मोठं नुकसान
हिंगोली : रानडुकराच्या हल्ल्यात माय लेक जखमी, सामाजिक वनीकरण असोलातर्फे औंढा नागनाथ तालुक्यातील लाख या माळरानावर 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदत असताना अचानक रानडुकराचा मायलेकावर हल्ला
अनिल अंबानींकडून काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्डविरोधातील पाच हजार कोटींचा मानहानीचा खटला मागे
सांगली : तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावाला गारपिटीने झोडपले, गावात गारांचा खच, 325 हेक्टरवरील द्राक्ष बागांचं मोठं नुकसान
एनडीएच्या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच यावं यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीला तब्बल 8 वेळा फोन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर दिल्लीला जाण्यासाठी चाटर्ड जेट मधून रवाना
मुंबई : मुंबई भाजप अध्यक्षपदी मनोज कोटक यांची वर्णी लागण्याची शक्यता, विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांची दुसरी टर्म पुढच्या महिन्यात संपणार, पक्षाच्या घटनेनुसार एकाच व्यक्तीला तिसऱ्यांदा अध्यक्षपद देता येत नसल्यानं शेलार यांच्या जागी पर्यायी नावांवर विचार
एनडीएच्या डिनरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जाणार, मंत्री सुभाष देसाईही उपस्थित राहणार
महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासंदर्भात कॅविएट दाखल, अध्यादेशाला मंजुरी देण्याआधी बाजू ऐकून घेण्याची विनंती
ठाणे : वज्रेश्वरी मंदिरावर दरोडा टाकून लाखो रुपयांची जबरी चोरी करणाऱ्या पाच आरोपींना ठाणे ग्रामीण पोलिसांची अटक, एकूण 2 लाख 83 हजार रुपये आणि दोन बाईक जप्त, तिघे फरार
ठाणे : वज्रेश्वरी मंदिरावर दरोडा टाकून लाखो रुपयांची जबरी चोरी करणाऱ्या पाच आरोपींना ठाणे ग्रामीण पोलिसांची अटक, एकूण 2 लाख 83 हजार रुपये आणि दोन बाईक जप्त, तिघे फरार
मुंबई : एक्झिट पोलनंतर भाजपला विजयाचा विश्वास, भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या उत्तर मुंबई या मतदारसंघात मोदींचे मुखवटे घालून मिठाई बनवायला सुरुवात
पुणे: भोसरीमध्ये 'सेंन्चयुरी एन्का' कंपनीला भीषण आग, आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपने विधानसभेची तयारी सुरु केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु आहे. मार्च 2016-17 ते 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन मोठा दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री राज्यभरात विकास यात्रा काढणार आहे. मुख्यमंत्री जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तीन ते चार टप्प्यात यात्रा काढून जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. तसंच गेल्या पाच वर्षांच्या विकासकामांची ब्लू प्रिंट घेऊन जनतेसमोर मांडणार आहेत.
वैद्यकीय प्रवेशासाठीचं मराठा विद्यार्थ्यांचं 15 दिवसांनंतर आंदोलन मागे, अध्यादेशावर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आंदोलन स्थगित
शिवसेनेकडून एनडीएच्या डिनरला कोण जाणार, यावरुन संभ्रमाचे वातावरण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून नेत्यांना अद्याप कोणत्याही सूचना नाहीत, उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावरुन मुंबईत दाखल होणार
डोंबिवलीतील पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा पूल धोकादायक, पूल रहदारीसाठी तातडीने बंद करण्याचं रेल्वेचं महापालिकेला पत्र
मुंबई : शेअर बाजार उघडताच 200 अंकांची उसळी, काल 1400 अंकांच्या वाढीनंतर आज पुन्हा उत्साह, सेन्सेक्स 39 हजार 565 अंकांवर
चंद्रपूर : काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना अटक, विनयभंगाच्या आरोपाखाली अटक, राजुरा येथील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीची प्राचार्य गुरुराज कुलकर्णी, सुभाष धोटे आणि अरुण धोटे यांच्याविरोधात शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार
अंकशास्त्रानुसार 23 तारखेला गुरुवारी दुपारी 3 वाजता भाजप 315 ते 324 मतांनी विजयी होणार, मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार, नाशिकचे अंकशास्त्र अभ्यासक नरेंद्र धारणे यांची भविष्यवाणी
महिला आयोगाच्या नोटिशीनंतर ऐश्वर्या रॉयबद्दलचं वादग्रस्त ट्वीट विवेक ओबेरॉयकडून डिलीट
हिंगोली : औंढा-जिंतूर मार्गावर गोळेगाव येथे दुचाकी व ट्रॅक्टर च्या अपघात, एक जण जागीच ठार

Background

1. निकालापूर्वी भाजपचीही मोर्चबांधणी, दिल्लीत आज एनडीएची बैठक, रात्री सर्व घटक पक्षांसोबत डिनर पार्टी

2. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमची मतं जुळली नाही तर फेरमतमोजणी करा, विरोधकांची मागणी, आज निवडणूक आयोगाची भेट घेणार

3.एक्झिट पोलवर ट्विट करताना विवेक ओबेरॉयकडून ऐश्वर्या रायच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी, महिला आयोगाची विवेक ओबेरॉयला नोटीस, बॉलिवूडकडूनही टीका
4. सुप्रिया सुळे, पार्थ पवार, नितीन गडकरी यांचा विजय निश्चित, एबीपी नेल्सनचा मतदारसंघनिहाय एक्झिट पोल, तर चंद्रपुरात गृहराज्यमंत्री हंसराज अहिरांच्या पराभवाची शक्यता

5.मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचा भाजपचा दावा, विशेष अधिवेशनासाठी राज्यपालांना पत्र, भाजप घोडेबाजार करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

6.अमूलचं दूध तब्बल दोन रुपयांनी महाग, कच्चा मालाची किंमत वाढल्यानं निर्णय, आजपासून नवी दरवाढ लागू

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.