LIVE BLOG | लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
ABP News Bureau
Last Updated:
10 Mar 2019 10:14 PM
IND vs AUS 4th ODI: चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर चार विकेट्सने मात, मालिकेत ऑस्ट्रेलिया-भारताची 2-2 ने बरोबरी
भाजपाच्या निवडणूक समनवय समितीची उद्या (11 मार्च) मुंबईत बैठक, जिल्हाध्यक्ष-पदाधिकाऱ्यांना देणार प्रचाराचे नवे फंडे,
या बैठकीला भाजपाच्या 25 लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष आणि महत्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले असून यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काय रणनीती आखायची, आचारसंहितेचे पालन करून कसा प्रचार करायचा याची माहिती देण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात 65 लाख 33 हजार 661 मतदार वाढले आहेत.
नागपूर : काटोल विधानसभा पोटनिवडणुकही जाहीर, ज्या दिवशी त्या लोकसभा मतदारसंघात मतदान, त्याच दिवशी विधानसभेसाठी मतदान
महाराष्ट्रात 4 टप्प्यात होणार निवडणूक
मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्यात येणार ,
दिव्यांगांना मतदान करण्यासाठी व्हीलचेयरची व्यवस्था करणार, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा
23 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान होणार
18 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान होणार
लोकसभेसाठी 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान, 23 मे 2019 रोजी निवडणुकांचा निकाल
11 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार
बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार
महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यांमध्ये मतदान होणार
23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार
निवडणूक कालावधीत रात्री 10 ते सकाळी 06 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी. आजपासूनच आचारसंहिता लागू - निवडणूक आयोग
लोकसभा निवडणूक ।आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यासाठी मोबाईल अॅप, तक्रार दाखल झाल्यास तात्काळ दखल घेतली जाणार : केंद्रीय निवडणूक आयोग
निवडणुकीतल्या गैरव्यवहाराबात सामान्य नागरिकही निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार करु शकणार. 100 मिनिटांच्या आत तक्रारींना प्रतिसाद दिला जाईल. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल : निवडणूक आयोग
देशभरात आचारसंहिता लागू, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा
लोकसभा निवडणूक । २०१४ च्या तुलनेत ७ कोटी मतदार वाढले : केंद्रीय निवडणूक आयोग
यंदा लोकसभेसाठी एकूण 10 लाख मतदान केंद्र असणार, ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटोदेखील उपलब्ध असणार : सुनील अरोरा, मुख्य निवडणूक आयुक्त
नऊ टप्प्यात होणार लोकसभा निवडणूक
देशातल्या मतदारांची संख्या 90 कोटींच्या घरात, 2014 च्या तुलनेत 7 कोटीने मतदार वाढले : सुनील अरोरा, मुख्य निवडणूक आयुक्त
लोकसभा निवडणूक । देशभरात आचारसंहिता लागू, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु :
निवडणुकीचे वेळापत्रक ठरवताना सीबीएसई परीक्षा, काही महत्त्वाचे सण, पेरणीचं वेळापत्रक यांचा विचार करण्यात आला आहे - सुनील अरोरा, मुख्य निवडणूक आयुक्त
लोकसभा निवडणूक । ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो असणार : केंद्रीय निवडणूक आयोग
आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई , केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु
महाराष्ट्र निवडणूक आयोग संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार, लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर पत्रकार परिषद
लोकसभा निवडणूक । देशातील मतदारांची संख्या 90 कोटींच्या घरात, दीड कोटी नोकरदार बजावणार मतदानाचा हक्क : केंद्रीय निवडणूक आयोग
लोकसभा निवडणूक । देशातील मतदारांची संख्या 90 कोटींच्या घरात, दीड कोटी नोकरदार बजावणार मतदानाचा हक्क : केंद्रीय निवडणूक आयोग
लोकसभा निवडणूक : राजकीय पक्षांशी चर्चा झाली आहे : केंद्रीय निवडणूक आयोग
तिसरं सर्जिकल स्ट्राईक मतदार करतील : सुष्मा स्वराज
ते फक्त सुपारी घेऊन भाषण करतात, विचलीत होऊ नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राज ठाकरेंवर हल्लाबोल
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची घोषणा, शेवाळेंना उमेदवारी दिल्याने रामदास आठवलेंची अडचण, आठवलेंचाही याच जागेच्या उमेदवारीसाठी होता आग्रह
तलासरी डहाणू पुन्हा भूकंपाने हादरले, 1.55 वाजेच्या दरम्यान भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याची नागरिकांची माहिती
राज ठाकरेंची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते : मुख्यमंत्री
राज ठाकरेंची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते : मुख्यमंत्री
भारत वि. ऑस्ट्रेलिया : मोहालीतील चौथा वन डे : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा भारताचा निर्णय #INDvsAUS
भारत वि. ऑस्ट्रेलिया : मोहालीतील चौथा वन डे : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा भारताचा निर्णय #INDvsAUS
भारत वि. ऑस्ट्रेलिया : मोहालीतील चौथा वन डे : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा भारताचा निर्णय #INDvsAUS
पुणे : काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करणार, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची घोषणा
लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज संध्याकाळी जाहीर होणार, संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
मुंबई : हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ला स्टेशनजवळ डाऊन मार्गावरील रुळांना तडे, पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प
मेक्सिको : नाईट क्लबमधील गोळीबारात 15 जणांचा मृत्यू, चौघं गंभीर जखमी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काँग्रेस राष्ट्रवादीला शेवटचा अल्टिमेटम, दोन दिवसात जागावाटपाचा निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी 15 उमेदवारांची नावं करणार जाहीर, सत्ता परिवर्तनाबाबत काँग्रेस राष्ट्रवादी गंभीर नसल्याचा स्वाभिमानीचा गंभीर आरोप
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. लोकसभा निवडणुकांपूर्वी मनसे-राष्ट्रवादीची एकत्र सभा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राज ठाकरेंची तोफ राष्ट्रवादीच्या मंचावरुन धडाडण्याची शक्यता
2. निवडणुकांच्या तोंडावर पुलवामासारखा हल्ला घडवून आणला जाईल, राज ठाकरेंचा गंभीर आरोप, लोकसभा लढवण्याबाबत मात्र सस्पेन्स कायम
3. घोटाळ्याच्या आरोपांच्या कचाट्यात अडकलेल्या पंकजा मुंडेंचा पाय खोलात, पोषण आहाराचं 6 हजार कोटींचं कंत्राट सुप्रीम कोर्टाकडून रद्द
4. अहमदनगर लोकसभेच्या जागेबाबत राहुल गांधी लक्ष घालणार, सोमवारी दिल्लीत बैठक, काल सुजय विखे आणि गिरीश महाजनांचा एकत्र हेलिकॉप्टर प्रवास
5. आकाश अंबानी-श्लोका मेहता यांचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, बॉलिवूड, क्रिकेट, उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी, सेलिब्रिटीजचे ठुमके
6. मोहालीत आज भारत-ऑस्ट्रेलियामध्ये चौथा वन डे सामना, टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर, धोनीला पुढील दोन्ही सामन्यांसाठी विश्रांती