LIVE BLOG | मुंबईत हार्बर मार्गावर पूर्वसूचना न देता ब्लॉक, प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : दुपारी 12.25 पासून हार्बर लाईन ठप्प, अचानक ब्लॉक घेतल्याने हार्बर लाईन विस्कळीत, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मध्य रेल्वेचा ब्लॉक, प्रवाशांचा स्थानक आणि लोकलमध्ये खोळंबा, जनसंपर्क अधिकाऱ्यांनाही कल्पना नसल्यामुळे आश्चर्य

ABP News Bureau Last Updated: 16 Apr 2019 05:34 PM
मुंबई : कोस्टल रोडच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाची तूर्तास स्थगिती, वरळीसह अन्य ठिकाणी सुरू असलेलं काम थांबवून परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे हायकोर्टाकडून आदेश, नरिमन पॉईंट ते कांदिवली अंदाजे 35 किमी लांबीचा प्रकल्प
मुंबई : दुपारी 12.25 पासून हार्बर लाईन ठप्प, अचानक ब्लॉक घेतल्याने हार्बर लाईन विस्कळीत, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मध्य रेल्वेचा ब्लॉक, प्रवाशांचा स्थानक आणि लोकलमध्ये खोळंबा, जनसंपर्क अधिकाऱ्यांनाही कल्पना नसल्यामुळे आश्चर्य
बुलडाणा : मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात शाळकरी मुलीची आत्महत्या,
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
बुलडाणा : मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात शाळकरी मुलीची आत्महत्या,
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
नाशिक महापालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात केवळ 31 टक्के पाणीसाठा, एप्रिलच्या मध्यावरच धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने प्रशासनाचा खबरदारीचा उपाय
धुळ्यात शिवसेनेची स्थापना करणारे माजी जिल्हाप्रमुख देविदास उर्फ बापू दादा शार्दूल यांचं मुंबईत निधन, वयाच्या 82 व्या वर्षी उपचारांदरम्यान अखेरचा श्वास
नागपूरमधील प्रसिद्ध अंबाझरी तलावात हजारोंच्या संख्येने मासे मृत्यूमुखी पडल्याने खळबळ,
प्रदूषणामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
नागपूरमधील प्रसिद्ध अंबाझरी तलावात हजारोंच्या संख्येने मासे मृत्यूमुखी पडल्याने खळबळ,
प्रदूषणामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक गो. मा. पवार यांचं निधन, वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळाने प्राणज्योत मालवली, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावरही कार्य
मुंबई: अंधेरीत गाडीतून 10 लाखांची रोकड जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारीची कारवाई

Background

आझम खान, योगी, मायावती, मनेका गांधींना निवडणूक आयोगाचा दणका, बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक प्रचार करण्यावर बंदी

सुप्रीम कोर्टानेही 'चौकीदार चौर है' मान्य केल्याचा दावा करणारे राहुल गांधी अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, 22 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश

मी लाभार्थी जाहिरातीतल्या तरूणाला मंचावर बोलवत राज ठाकरेंकडून सरकारची पोलखोल, जातीयवादाचे विष पेरण्यासाठी आरक्षणाचा घाट, घातल्याचा आरोप

उर्मिला मातोंडकरच्या रॅलीत मोदी-मोदीच्या घोषणा, भाजप कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याचा आरोप, मात्र पोलिसांकडून आरोपांचं खंडन

बळीराजासाठी गुड न्यूज, सरासरीच्या 96 टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, निवडणुकीच्या तोंडावरच्या भाकीतामुळं नेत्यांचेही डोळे आभाळाकडे

आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, दिनेश कार्तिक आणि केएल राहुल, विजय शंकरला संधी, तर पंत आणि रायुडूला वगळलं

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.