LIVE BLOG : सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस
विजांच्या कडकडाटसह पाऊस, उन्हामुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा
ABP News Bureau
Last Updated:
12 Apr 2019 11:12 PM
नवी मुंबई : खारघर येथे वाहतूक कोंडी, रस्त्याचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडी, पनवेलला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी
सोलापूर : विजांच्या कडकडाटसह पाऊस, उन्हामुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा
विरार : विरारमध्ये 20 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू, विरार पूर्व 90 फुट रोड जवळील मोहक सिटीसमोरील घटना, आदेश वानखडे असं मृत तरुणाचं नाव
सातारा : आई, वडील आणि मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, कराडच्या विद्यानगर सैदापूर येथील घटना, आत्महत्येचं कारण अस्पष्ट
मुंबई : वादग्रस्त 'पब्जी' गेमबाबत केंद्र सरकारनं पाहाणी करुन योग्य ते निर्देश द्यावेत, पालकांनीही आपले फोन पासवर्ड टाकून मुलांपासून लांब ठेवावेत, हायकोर्टाचा सल्ला, अहद निझाम या 11 वर्षीय मुलानं आपल्या वकील आई-वडीलांमार्फत दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी जुलैपर्यंत तहकूब
काटोल विधानसभा पोटनिवडणूक घेऊ नका, नागपूर खंडपीठाचे निवडणूक आयोगाला निर्देश
मुंबई : वादग्रस्त 'पब्जी' गेमबाबत केंद्र सरकारनं पाहाणी करुन योग्य ते निर्देश द्यावेत, पालकांनीही आपले फोन पासवर्ड टाकून मुलांपासून लांब ठेवावेत, हायकोर्टाचा सल्ला, अहद निझाम या 11 वर्षीय मुलानं आपल्या वकील आई-वडीलांमार्फत दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी जुलैपर्यंत तहकूब
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नांदेडला पोहचले, राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, राज ठाकरे नांदेड येथील सचखंड गुरुद्वारात माथा टेकण्यासाठी जाणार
मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा कोस्टल रोडचं काम थांबवलं, कोर्टाने काम थांबवावं असे आदेश दिल्यानंतरही काम सुरु असल्यानं काम थांबवलं
दंतवैद्यक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत 16 टक्के मराठा आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं प्रवेश प्रक्रियेस दिलेली स्थगिती उठवली. न्यायमूर्ती सुखरे आणि न्यायमूर्ती गनेडीवाला यांच्या खंडपीठाचा निर्णय
सैन्याच्या कामगिरीच्या बळावर राजकारण का करता?, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवृत्त सैनिकांचं पत्र
राज्याच्या अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची 'इलेक्शन ड्युटी'. मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी लागणार ड्युटी. या कामासाठी तीन दिवस काही तासांच्या प्रशिक्षणासाठी लावावी लागणार हजेरी. केंद्रीय निवडणूक आयोगाची हायकोर्टात माहिती
थोड्याच वेळात नरेंद्र मोदींचे अहमदनगरमध्ये आगमन, सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचारसभेला संबोधित करणार
#LIVE : काँग्रेस हरवा, गरीबी हटवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
निवडणूक आयोगाच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील मुकुंद नगर परिसरातून 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके आणि यंत्रणा वाहनांची तपासणी करत असताना ही रक्कम सापडली.
#LIVE : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर असून शरदराव तुम्हाला झोप कशी येते? : पंतप्रधान नरेंद्र मोदी
यवतमाळ : मतदान काम आटोपून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात, आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात अपघात अल्टो आणि बोलेरोमध्ये अपघात, घटनेत 1 ठार, 3 जखमी जखमी
#LIVE : काँग्रेसचे लोक जम्मू-काश्मीरला वेगळं करायचं म्हणत आहेत, हे पाप त्यांचीच पैदाईश, मात्र शरद पवारांना काय झालयं?, देशाच्या नावावर तुम्ही काँग्रेस सोडले, पण आता दोन पंतप्रधान होणार यावर तुम्ही गप्प का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना सवाल
#LIVE : तुम्ही एवढ्या उन्हात इथे आल्याने माझ्यावरील कर्ज वाढलं : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी मुंबई : वाशीतील पादचारी पूल दुर्घटना, महापालिका आयुक्तांकडून चौकशीचे आदेश, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर करणार कारवाई
#LIVE : काँग्रेसच्या काळात अनेक बॉम्बस्फोट पाहिले, त्या स्फोटात आपला शेतकरी, विद्यार्थी मजूर सामान्य नागरिक मरायचे, पण गेल्या पाच वर्षात या चौकीदारच्या सरकारच्या काळात हेच बॉम्बस्फोट गेले कुठे? : पंतप्रधान नरेंद्र मोदी
जेट एअरवेजच्या विमानांना डीजीसीएने उड्डाण करण्यास परवानगी न दिल्याने काल रात्री पासून प्रवाशी छत्रपती शिवाजी महाराज इंटरनेशनल विमानतळावर खोळंबले आहेत. रात्रीपासून एकाही विमानाचे उड्डाण न झाल्याने प्रवाशी त्रस्त आहेत. याबाबत प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आणि सीआयएसएफची फौज तैनात करण्यात आली आहे. या ठिकाणी जेट एअरवेजचे अधिकारी उपस्थित असले तरी कोणतीही माहिती देत नसल्याने प्रवाशी प्रचंड चिडले आहेत.
#LIVE : महाराष्ट्र आणि अहमदनगरच्या सर्व बांधवाना उद्याच्या रामनवमीच्या खूप शुभेच्छा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबईतून रात्रीपासून जेट एअरवेजच्या विमानांचं उड्डाण नाही, विमान उड्डाण रखडल्याने प्रवाशांचा खोळंबा, डीजीसीआयकडून विमान उड्डाणाला परवानगी नाही
#LIVE : शिर्डी साईबाबाच्या सानिध्यात असलेल्या या नगरीला माझे नमन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
#LIVE : शिर्डी साईबाबाच्या सानिध्यात असलेल्या या नगरीला माझे नमन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
#LIVE : सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
#LIVE : राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले आणि सात दिवसात 12 वा खेळाडू म्हणून परतले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना मंचावरून भाषण करताना थांबवण्यास सांगितलं, भाषण थांबवण्यास सांगितल्यावर गांधी भडकले, भाषणात विखेंच नाव न घेता मतदारांना मतदान करण्याच आवाहन
#BREAKING
कर्जबुडव्या विजय मल्ल्याप्रकरणी लंडन कोर्टात सुनावणी, लंडन कोर्टानं जामीन अर्ज फेटाळल्यास मल्ल्या भारताच्या ताब्यात
नवी दिल्ली : प्रत्येक पक्षाने 30 मेपर्यंत देणग्यांचा तपशील द्यावा, निवडणूक आयोगाला माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिर्डी विमानतळावर आगमन, विमानतळावर मोदींचं स्वागत, शिर्डीहून हेलिकॉप्टरने अहमदनगरकडे होणार रवाना
Background
1. वाशीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, दोन जण गंभीर जखमी, पालिकेनं पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
2. ठाण्यातील कोपरी पूल धोकादायक अवस्थेत, दोन दिवसांपूर्वी पुलाचे प्लास्टर कोसळलं, अधिकाऱ्यांकडून तात्पुरती मलमपट्टी
3. मोदी सरकारविरोधात राज ठाकरेंच्या राज्यभरात सहा सभा, महाराष्ट्राच्या दौऱ्यावर रेल्वेने रवाना, उद्या नांदेडमध्ये पहिली सभा
4. बोरिवलीत भाजपच्या प्रचार फेरीचा स्थानिकांकडून निषेध, गोपाळ शेट्टींना काळे झेंडे दाखवले, एका स्थानिकाला अटक
5. शाळेतील शिपायाकडून तिसरीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग, बदलापूरच्या चंद्रशेखर मेमोरियल शाळेतील घटना
मनसे कार्यकर्त्यांकडून शिपायाला चोप
6. नवऱ्यानं दाढी वाढवली म्हणून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज, भोपाळमधल्या प्रकरणाची कायद्याच्या वर्तुळात जोरदार चर्चा