LIVE BLOG | साध्वी प्रज्ञाच्या वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड यांचा मोदी-शाहांना सवाल

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 19 Apr 2019 07:09 PM
बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती


मिलिंद देवरा यांच्यावर आचार संहिता भंग केल्या प्रकरणी कारवाई होणार, आचार संहिता भंग केल्याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश
बारामती : अमित शहा यांच्या सभेत गोंधळ होवू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव बारामती शहर पोलिसांनी धनगर समाजाच्या 12 जणांवर केली प्रतिबंधात्मक कारवाई




भाषण सुरु असताना काँग्रेस नेते हार्दिक पटेलच्या कानाखाली लगावली, गुजरातच्या सुरेंद्रनगर येथील प्रचारसभेत प्रकार
जळगाव : अंमळनेरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर धरणग्रस्तांची निदर्शनं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दाखवले काळे झेंडे, गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित पडलसे धरण प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याची मागणी, 7 ते 8 जण पोलिसांच्या ताब्यात
सांगोला तालुक्यातल्या जवळा गावात खासगी प्रवासी बस जळालीय. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बस पूर्णपणे जळून खाक झालीय.
कॉंग्रेसच्या माजी प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार
नागपूर- उद्योगपती रतन टाटा यांची संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी भेट, टाटा फाऊंडेशनद्वारे देशातील, विशेषत) विदर्भातील आदिवासी क्षेत्रात केल्या जाणाऱ्या सेवाकार्यांच्या संदर्भात भेट झाल्याची माहिती
मुंबई शहरात तीन वेगवेगळ्या घटनेत काल रात्री 75 लाख रुपयांची संशयित रक्कम जप्त, निवडणूक निर्णय अधिकारी श्री बन्सी गवळी यांची माहिती
कोल्हापूर : विवाहितेची दोन मुलांसह पेटवून घेवून आत्महत्या, शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावातील धक्कादायक घटना, स्वाती पाटील असं विवाहितेच नाव
कोल्हापूर : कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर मध्यरात्री अपघातात ग्रामसेवक ठार, क्रुझर जीप-दुचाकीच्या अपघातात मोटार सायकलस्वार शिवाजी पुलावरून नदीमध्ये पडला
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्याविरोधात मराठा मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. तर नाव चुकुन टाकले गेल्याचा पोलिसांचा खुलासा

Background

1. दुसऱ्या टप्प्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मतदान, उस्मानाबादेत मतदानाचं फेसबुक लाईव्ह केल्यानं खळबळ, तर आंबेडकरांचा ईव्हीएमवर संशय

2. जातीय हिंसाचारावर मौन बाळगणारे मोदी आता मतांसाठी जात काढताहेत, पुण्यातल्या सभेत राज ठाकरेंचा घणाघात, बलात्कारच्या वाढत्या प्रमाणावरही हल्लाबोल

3. भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह निवडणूक लढण्याची शक्यता, कायद्यानं बंदी लावण्याचा निर्णय आमच्या हाती नाही, निव़डणूक आयोगाचं स्पष्टीकरण

4. पत्रकार परिषदेत डॉक्टरानं भाजप नेत्यावर बूट भिरकावल्यानं खळबळ, आर्थिक तोट्यामुळं हताश झाल्यानं शक्ती भार्गवचा सरकारवर संताप

5. जेट एअरवेजनं सेवा बंद केल्यानं 20 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार, सरकारनं तातडीची मदत न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

6. दिल्लीच्या स्वप्नांना मुंबईचा सुरुंग, मुंबईचा दिल्लीवर 40 धावांनी दणदणीत विजय

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.